YouTube Special: In Search of the Giant Anaconda
By vrusathalye on मन मोकळे from marathisumane.blogspot.com
असे चक्रावून जाऊ नका - "हे काय? सलग तिसरा भाग सापांवर?? " म्हणून. मी तरी काय करू? साप आणि ऑस्टिन महाशय असे आणखीन एक combination मला YouTube वर सापडले. हा anaconda वरील भागसुद्धा मी कितीतरी दिवस शोधत होते. पण अडचण तीच. कार्यक्रमाचे नाव काही केल्या सापडत नव्हते. अखेरीस सापडले एकदाचे. आता YouTube वर लिहीतेच आहे तर हा भाग शेअर न करून कसे चालेल?तर Anaconda - त्याच्यावरील भयंकर Hollywood चित्रपट पाहून आपल्याला माहित झाला आहेच. :) (त्या चित्रपट मालिकेतील तिसरा भाग तर अगदी कहर आहे - काय तर म्हणे साठ फुटी anaconda !! त्याची भीती वाटण्याऐवजी हसूच येते.)असो, पण इथे मात्र ऑस्टिन महाशय निघाले आहेत खऱ्याखुऱ्या green anaconda च्या शोधात. जाऊन पोचले आहेत थेट amazon नदीवर. :) या नदीवरचा त्यांचा मनोरंजक प्रवास आणि शेवटी त्यांच्या प्रयत्नांना आलेले यश हे सर्व चित्रित करणारी अतिशय सुंदर documentary - त्याची लिंक: http://www.youtube.com/watch?v=bENFSFR9LMwHappy Viewing. :)