World Cinema Special: The Lives of Others (German)

By vrusathalye on from marathisumane.blogspot.com

गेले काही दिवस आम्ही घरच्या घरीच European Film Festival भरवला आहे. फ्रेंच, जर्मन, इटालियन, ग्रीक अशा भाषांमधील चित्रपट पाहणे म्हणजे खरोखरच एक आनंदसोहळा असतो. एक विलक्षण अनुभव. कथा काहीही असो, पण ती पडदयावर कशी पेश करावी याची एकापेक्षा एक सरस अशी उदाहरणे डोळ्यासमोर येत राहतात. हे चित्रपट पाहिल्यावर अगदी Hollywood चित्रपटही पाहणे नको वाटते तिथे बऱ्याचश्या हिंदी मसाला चित्रपटांची तर गोष्टच सोडा. वाटेल तशी कथेला अनावश्यक आणि सुमार दर्जाची गाणी, धडधड अंगावर आदळणाऱ्या आणि एकमेकांशी काही संबंध नसलेल्या बेसुमार फ्रेम्स, शब्दांची अर्थहीन पखरण असलेले संवाद-विसंवाद .. या साऱ्या गोष्टीना फाटा देऊन जे काही कसदार, आणि दर्जेदार उरते त्या सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे हे चित्रपट.असे काही चित्रपट पाहिल्यावर मनात आले, की जो अमर्याद आनंद या चित्रपटांनी आम्हाला दिला आहे, तो तुमच्याशी का शेअर करू नये? म्हणून पुढचे काही भाग World Cinema वर. :) आपला अभिप्राय आवर्जून कळवा. त्यानिमित्ताने तुमचेही काही अनुभव शेअर झाले तर सोने पे सुहागा !या मालिकेतील पहिला सिनेमा आहे - The Lives of Others हा जर्मन सिनेमा. २००७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला त्या वर्षीचे "सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचे " ऑस्कर मिळाले होते.-----------------------------------------------------------------------------------------------------------काळजी करू नका, तुमच्या कॉम्पुटरवर एकाएकी format problem झालेला नाही आहे. ती 'dotted line' मी मुद्दामच टाकली आहे. माझ्या मनाची अवस्था  वर्णन करण्यासाठी...खरे सांगू का, माझी साधारण लेखनशैली अशी आहे, की एखादा विषय मिळाला की पुढचे एक दोन दिवस तो विषय मनात चघळला जात असतो, आणि त्यातूनच त्याचा एक कच्चा आराखडा बनत जातो. मग हळूहळू शब्द सहजपणे स्क्रीनवर उतरत जातात.. पण या वेळी परिस्थिती अगदी वेगळी झाली आहे..या दिवाळीत आम्ही आमच्या पार्ल्याच्या घरी एकत्र जमलो होतो. त्या दोन दिवसांच्याच मुक्कामातही आम्ही उभयता फोर्ट मधील rhythm house ला जाऊन भरपूर परदेशी सिनेमांच्या DVDs बरोबर घेऊन आलो. :) त्यानंतर लगेच आलेल्या विकांताला -शनिवारी रात्री - हा चित्रपट बघायला बसलो. झोप अनावर झाल्यामुळे नाईलाजाने चित्रपट अर्ध्यावरच सोडला व सकाळी बघण्याचे ठरवले. पण रात्रभर बचैनी जाणवत होती. चित्रपट मनात रुंजी घालत होता. पुढे काय होणार आहे, याची सारखी उत्कंठा लागून राहिली होती. म्हणून सकाळी उठल्या उठल्या पटकन सर्व आवरून चित्रपट बघायला बसलो.....शेवटचा डायलॉग- "no, it's for me."...... चित्रपट संपतो. आम्ही दोघेही freeze झालेलो... डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या.. जीवाची घालमेल. काय वाटतेय नक्की समजतच नाहीये...चित्रपट अनुभवून साधारण पंधरा दिवस उलटून गेलेले आणि हा लेख लिहायला घेतलेला - (म्हणजे dotted lines च्या आधीचा भाग हा साधारण आठवडाभरापूर्वी लिहिलेला आहे. ) काही सुचतच नाही. एरवीचे -शहाण्या मुलासारखे हाती लागणारे - शब्द कुठेतरी गायब झालेत. अजूनही असे वाटत आहे की माझे हे चित्रपट जगणे चालूच आहे. हा चित्रपट अजून उलगडतोच आहे... गेला आठवडाभर जवळपास रोज मी तो "शेवटचा सीन" बघतच आहे. आणि डोळ्यात पाणी आणतच आहे. वेड लागलेय कि काय आपल्याला?... इतके भारावून गेलो आहोत आपण ?म्हणून ठरवले  -  काहीच बोलायचे नाही आता. सरळ  लिंक देऊन टाकायची तुम्हाला- तुम्हीच बघा तो चित्रपट आणि  अनुभवा स्वतःपुरतेच...काही जाणवले अंतर्यामी, तर  जरूर कळवा..The Lives of Othersइतकेच सांगेन शेवटी, चित्रपट बघा मात्र नक्की...Otherwise, you will miss something real good...!! आणि हो, या चित्रपटातील central character निभावणारे Ulrich Muhe आता आपल्यात नाहीत......!!!!
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!