Marathi Humor Story: My First Date (Part - 2)
By kattaonline on धार्मिक from www.kattaonline.com
कांदेपोहे (मराठी विनोदी कथा - भाग २)(मूळ लेखक: अज्ञात)मागील भागावरून पुढे चालू: भाग १ इथे वाचा"कसा असतो आईस्ड टी? म्हणजे मी पण तोच घेतो. तसही मला इथला दुसरा पदार्थ किंवा पेय माहित नाही. काहीतरी भलतच घ्यायचो आणि माझी पंचाईत व्हायची!""पंचाईत" ह्या शब्दाला ती ठेचकाळली आणि मंद हसली. मला वाटलं की माझ्या बावळटपणाला हसली असेल."चांगला असतो", ती म्हणाली आणि आम्ही रांगेतून पुढे सरकलो.काउण्टरवरच्या माणसाला म्हणालो, "टू आईस्ड टीज प्लीज."तो अमेरिकेतून डायरेक्ट इम्पोर्ट झालेला असावा. म्हणाला, "व्हिच फ्लेवर सर?"पुन्हा आली का पंचाईत? मी प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पहिले. ती तत्काळ उतरली, "पीच फ्लेवर". ती सराईत होती बहुतेक."वूड यु लाईक टू ट्राय आवर क्रीम फ्लेवर, सर?"मी पुन्हा तिच्याकडे पाहिलं. कसा दिसतं असेन मी तेंव्हा? ती ठामपणे म्हणाली, "नो, पीच फ्लेवर फॉर मी."मी जास्त चिकिस्ता न करता आणि वेळ न दवडता उत्तरलो, "पीच फ्लेवर फॉर मी टू."मला वाटलं ३०-४० रुपये बिल होईल. दोन कप चहासाठी ३०-४० रुपयेदेखील "लई जास्त होत्यात. पन म्हनल ठीक हाय. बरिश्तामंधी आलो आपुन तर तेवढं द्यायाचं पायजे." पण त्याने निर्विकारपणे ९० रुपयांचा आकडा सांगितला. मी काढलेली ५० रुपयांची नोट ठेवून १०० ची काढली. मी पुढचा हिशोब करू लागलो.पुढे वाचा »