Marathi Humor Story: My First Date (Part - 1)
By kattaonline on धार्मिक from www.kattaonline.com
कांदेपोहे (मराठी विनोदी कथा - भाग १)(मूळ लेखक: अज्ञात)माझ्या मागासलेपणाचं मला परवा किती वाईट वाटलं! इतकी वर्षे पुण्यात राहून देखील आधुनिक जीवनशैली मला समजली नाही ही खंत अजूनही मनाला बोचते आहे. जरा सविस्तर सांगतो. यंदा लग्नकर्तव्य असल्याने एका मुलीसोबत परिचयभेटीचा कार्यक्रम ठरला. रविवारची दुपार तशी निवांत पहुडण्यासाठी असते ही म्या पामराची भ्रामक कल्पना त्यादिवशी मोडीत निघाली. दुपारी पावणेतीनच्या सुमारास माझा भ्रमणध्वनीसंच केकाटला. हो, केकाटलाच म्हणेन मी. सकाळची रम्य किंवा सायंकाळची रोमॅटिक वेळ असती तर "किणकिणला" असा मंजुळ शब्द मी वापरला असता. पण भर दुपारी भरपेट जेवण झाल्यावर तेही रविवारी भ्रमणध्वनीसंच (सध्या इंग्लिश शब्द सोडून अतिअवघड मराठी शब्द वापरण्याची प्रथा आहे म्हणून…) बोंबलत असेल तर "केकाटणं" हाच शब्द योग्य आहे असे मला वाटते. असो.पुढे वाचा »