Marathi Blog Directory : तुमचा ब्लॉग जोडा

By vijayshendge on from maymrathi.blogspot.com

 मित्रहो,'रिमझिम पाऊस ' हा ब्लॉग, ब्लॉगची डिरेक्टरी नाही. हा तुमच्या ब्लॉग सारखा एक सामान्य ब्लॉग आहे. परंतु आमच्या बरोबर इतर लेखकांच लेखन वाचकांपर्यंत पोहोचवलं किती बरं होईल या हेतूनच आम्ही इतर लेखकांचे ब्लॉग  ' रिमझिम पाऊस ' ला जोडण्याचे ठरवले आहे.  यामुळे आमच्या ब्लॉगला भेट देणारे बहुसंख्या वाचक आपल्या ब्लॉगला भेट देतिल. याशिवाय आम्ही आपला ब्लॉग नियमितपणे तपासणार असल्यामुळे आम्ही आपल्या ब्लॉगला वरचेवर भेट देणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक फार छोटीशी गोष्ट करायची आहे.मनात काहीच साठू द्यायचं नाही. जे जे मनात येईल ते ते लिहित रहायचं. या प्रमुख हेतूनं ' रिमझिम पाऊस ' हा ब्लॉग सुरु करण्यात आला.ब्लॉग लिहितात एवढंच माहित होतं. कुठं ? कसा ? मराठीतून कसं लिहितात ? प्रतिक्रिया कशा देतात ? पोस्ट मध्ये फोटो कसा आणतात ? यापैकी काहीच माहित नव्हतं. त्या पायरीपासून आज स्वतःचा विजेटकोड तयार करण्याच्या पायरीपर्यंत ' रिमझिम पाऊस ' नं झेप घेतली. अर्थात हे सारं शक्य झालंय ते इतर ब्लॉगर मित्रांच्या मार्गदर्शना मुळे.आता आम्ही इतर लेखकांचे ब्लॉग ' रिमझिम पाऊस ' ला जोडण्याचे ठरवले आहे.    त्यासाठी आपल्याला केवळ आमचा विजेटकोड आपल्या ब्लॉगवर जोडायचा आहे. पुढचं काम आमचं आहे. आपण आमचा विजेटकोड आपया ब्लॉगवर चिटकवलात कि आम्हाला आमच्या पानावरील डाव्या बाजूला असलेला contact form भरून तसे कळवा.  आम्ही आपली इमेल आम्हाला पोहचल्यावर ४८ तासाच्या आत आपला ब्लॉग रिमझिम पाऊस च्या डाव्या बाजुला जोडला जाईल. तांत्रिक कारणामुळे अधिक वेळ लागू शकतो.मित्रहो यामुळे माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्या वाचकांपैकी बहुतांश वाचक आपल्या ब्लॉगला भेट देतील. यामुळे लेखकांना वाचक भेटतीलच परंतु वाचकांनाही विविधांगी लेखन वाचावयास मिळणार आहे.एकच नोंद, कविता, लेख स्वत:च्याच दोन निरनिराळ्या ब्लॉग्सवर प्रकाशित केलेले ब्लॉग जोडले जाणार नाहीत.आपल्या ब्लॉगमधे कोणत्याही स्वरूपाचे अश्लिल लेखन, छायाचित्रे, चलचित्रे असू नये. आपल्या ब्लॉगवर असे काही आढळल्यास आपला ब्लॉग रिमझिम पाऊस वरून त्वरित काढून टाकण्यात येईल.आपल्या ब्लॉगर मित्रांना, रसिक वाचकांना अपमानित व्हावे लागेल असे लेखण आपल्या ब्लॉगवर असू नये.    आपण जेव्हा नवीन पोस्ट लिहुन पोस्ट कराल तेव्हा आपली ती पोस्ट काही तासात ' रिमझिम पाऊस ' च्या डाव्या रकान्यात दिसू लागेल. लक्षात ठेवा नव्यानं पोस्ट लिहिले ब्लॉग सर्वात वरच्या बाजूला दिसतील.तेव्हा -   <a href="http://maymrathi.blogsopt.com/" target="_blank"><img title=" रिमझिम पाऊस " src="http://bit.ly/1vQUIsf " width=”125” height=”125”/>हा विजेटकोड आपल्या ब्लॉगवर चिटकवा आणि आपला ब्लॉग रिमझिम पाऊसला जोडा.होय, मान्य आहे विजेटकोड फार मोठा आहे. पण लवकरच तो छोटा करण्यात येईल आणि नवीन कोड आपल्याला कळविण्यात येईल. तोपर्यंत येथून सुरवात करू या. 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!