La La Land.. The Musical Masterpiece of our times...

By vrusathalye on from marathisumane.blogspot.com

नमस्कार,निमित्त आहे गोल्डन ग्लोब पुरस्कारांचे आणि त्यावर आपली मोहोर उठवणाऱ्या "La La Land" या चित्रपटाचे.गेल्या वर्षी १६ डिसेंबरला हा चित्रपट पाहण्याचा योग आला. इथे भारतात त्याला (का कोण जाणे, पण) सेन्सॉरचे "ए" प्रमाणपत्र मिळालेले असल्यामुळे रीतसर सुट्टी टाकून आणि चिरंजीवांना शाळेत पाठवून मगच आम्ही दोघे चित्रपट पाहायला गेलो. पण परत येताना मात्र एका सुरेख संगीत मैफिलीला त्याला मुकावे लागले याचेच वाईट जास्त वाटले. कोणत्याही मोजमापाने हा चित्रपट  "A" या कॅटेगरीत मोडत नाही. खरं सांगायचं तर अशा चित्रपट-अनुभवांना सहकुटुंब जावे. त्यातील स्ट्रगल अनुभवावा. थोडावेळ स्वप्नांच्या दुनियेत वावरावे. आणि परत आपली स्वप्ने प्रत्यक्षात उतरलेली बघताना त्याच्याबरोबर थोड्याश्या अप्रिय अशा अटळ सत्याचाही समंजसपणे स्वीकार करावा...एक नायिका बनण्यासाठी धडपड करणारी मुलगी मिया आणि अतिशय pure, original संगीत तयार करतानाच पोटापाण्यासाठी काही तडजोडी कराव्या लागणारा नायक सबॅस्टिअन. दोघांची स्वप्ने, एकमेकांना दिलेली साथ आणि मग पुढे काय होते या सगळ्याची साधी सरळ गोष्ट. या चित्रपटाचा आत्मा अर्थातच संगीत. प्रत्येक मूडला साजेसे. काही नोट्स तर इतक्या शुद्ध आणि काळजाला भिडणाऱ्या आहेत की they are still haunting me... त्यातही ती पियानोवरची विशिष्ट ट्यून सुरु झाली की अगदी खोलवर भिडते काहीतरी..चित्रपटाचा नायक रायन गोसलिंग आणि नायिका एमा स्टोन या संगीताची उत्तम जाण असलेल्या जोडीने नृत्यातही कमाल केली आहे. या जोडीचा हा तिसरा चित्रपट. त्यामुळे त्यांच्यामधील comfort level अप्रतिम. एकूणच या चित्रपटाचे presentation आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जाते. शुद्ध काही जीवघेणे... असेच वर्णन करावे लागेल या सांगीतिकेचे. एकदा तरी जरूर घ्यावा असा हा सुरेख अनुभव... !!या चित्रपटाला Oscars किती मिळतात ते लवकरच कळेल :). तोपर्यंत YouTube वरील हे साउंडट्रॅक नक्की अनुभवावेत असेच ....!!!City of StarsAnother Day of SunPlanetariumEpilogue
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!