Bhogichi Bhaji (भोगीची भाजी)

By Purva on from marathifoodfunda.blogspot.com

नव्या वर्षाचे स्वागत केल्यावर येणारा पहिला सण मकरसंक्रात ! महाराष्ट्रात मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. भोगीच्या दिवशी अनेक प्रकारच्या भाज्यांची एकत्र भाजी केली जाते…हीच ती भोगीची लेकुरवाळी भाजी.  संक्रांतीच्या सुमारास म्हणजेच जानेवारी महिन्यात भाजीपाला व फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. हेमंत ऋतूचे हे दिवस हे मस्त थंडीचे असतात. या काळाला धुंदुर मास असही म्हणतात. याकाळात नैसर्गिकरित्या खूप भूक वाढते, पचनशक्ती सुधारते तसेच खाल्लेले अन्न शरीरालाही लागते. त्यामुळे  थंडीमध्ये पोषक ठरतील, असे पदार्थ केले जातात. बाजरी उष्ण असल्याने ती हिवाळयात खाणे अधिक हितकारी आहे. बाजरी ही बलकारक, उष्ण, अग्निदीपक, कफनाशक असते. त्यामुळे भोगीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी बनवावी. थापताना वरून तीळ लावावेत. तीळ आणि शेंगदाणे स्निग्ध असल्याने शरीरातील, त्वचेतील रुक्षपणा कमी करण्यास मदत करतात. यासोबत दुध, तुप, दही , लोणी, ताक यासारख्या पदार्थांचे मोठया प्रमाणात सेवन करावे.Read this recipe in English....click here. साहित्य:वांग्याच्या फोडी - १/२ कपबटाट्याच्या फोडी-  १/२ कप तुरीचे दाणे - १/४ कप मटारचे दाणे - १/४ कप वालाचे/पावट्याचे दाणे- १/४ कप ओल्या हरभऱ्याचे दाणे - १/४ कप ओले शेंगदाणे/भुईमुग- १/४ कप गाजराचे तुकडे - १/४ कप घेवडा, सोलून मोडलेला - १/४ कप शेवग्याचे ३ इंचाचे तुकडे, सोलून  - ६ नग तोंडली- १/४ कप पिकलेली घट्ट बोरे - ५ ते ६ नग *उसाचे १ इंचाचे तुकडे, सोलून- ३कोथिंबीर- मुठभर  सुके खोबरे, किसून भाजून- १ टेबलस्पून तीळ - १ टेबलस्पून + १ टीस्पून शेंगदाणे, भाजून सोलून-  १ टेबलस्पूनचिंचेचा घट्ट कोळ - १ टीस्पून गूळ - चिमुटभर काळा मसाला / गोडा मसाला - १ टेबलस्पूनमिरची पूड / लाल तिखट - १ टीस्पून किंवा आवडीप्रमाणे मोहरी - १ टीस्पून जिरे- १ टीस्पून हिंग - १/४  टीस्पून हळद - १/२ टीस्पून मीठ - चवीनुसारतेल - ४ ते ५ टेबलस्पूनकृती: सगळ्या भाज्या चिरून-निवडून व धुवून घ्याव्यात. तीळ खरपूस भाजावेत. थंड झाल्यावर तीळ, शेंगदाणे व सुके खोबरे एकत्र वाटून घ्यावेत. तेल तापवून त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद फोडणी करावी. त्यात मिरची पूड घालून लगेच थोडे पाणी टाकावे. त्यात तुरीचे, मटारचे दाणे, हरभऱ्याचे दाणे, पावट्याचे दाणे, शेंगदाणे घालून ५ मिनिट मंद आचेवर वाफवावे. नंतर गाजर, वांगे, घेवडा, उस आणि शेवगा घालून शिजवावे. जरुरीप्रमाणे पाणी घालावे. मध्ये मध्ये हलवावे. भाज्या शिजत आल्या की त्यात बोरे, कोथिंबीर, तयार केलेला कूट, काळा मसाला, चिंचेचा कोळ, गुळ आणि मीठ घालून मिक्स करावे. जरूर असल्यास पाणी शिंपडावे. एक वाफ आणावी. गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर भाजीचा आस्वाद घ्या. शिवाय जोडीला मुगाची खिचडी, ताकाची कढी आणि तीळाची झणझणीत चटणी हवीच.   टिपा: भाजीला फार रस्सा ठेवायचा नाही, अंगाबरोबर रस्सा ठेवा.   ज्या भाज्या आवडत असतील आणि उपलब्ध असतील त्या वापरा, आवडत नसतील त्या वगळा. भाज्यांचे प्रमाण आपल्या आवडीनुसार बदलावे.वालपापडी व मुळ्याचे तुकडे पण घालू शकता. सुक्या खोबऱ्याऐवजी खवलेले ओले खोबरे पण वापरू शकता. अगदी शेवटी कोथिंबीर बरोबर घालावे.      
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!