Aalepak (आले पाक / आल्याच्या वड्या)
By Purva on पाककृती from marathifoodfunda.blogspot.com
लहानपणी एक आजोबा आलेपाक विकायला आणायचे. "सर्दी-खोकला, झटकन मोकळा" अशी त्यांची खणखणीत आवाजातली साद ऐकून आम्ही पटकन बाहेर यायचो. आजही 'आलेपाक' हा शब्द ऐकला की जुनी आठवण ताजी होते. आले हे कफनाशक, पित्तनाशक व पाचक आहे. कुठल्याही रुपात आल्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.