..........
By Ramesh on कविता from www.rameshthombre.com
..........देता येईल, एक स्वप्न दे, पहाटलेले नकोत मजला सन्मानाचे उधार शेले दु:खाला मी वाट मोकळी करून देता सुखही थोडे त्याच्या सोबत निघून गेले. विसरलीस तू, आणा-भाका, सगळे सगळे आठवते मज, अंग जरासे, शहारलेले जरी सांगतो 'भरले गोकुळ दौलत असते,' खुणावती मज आठवणींचे रितेच पेले !म्हणालीस तू 'जगात नाही माझे कोणी' तू गेलीस अन दुनियेने बघ मुंडन केले - रमेश ठोंबरे