१७ अक्टोंबर ते १५ नोव्हेंबर २०१९ काळासाठी रवी तुळ राशीत असताना महिन्याचे राशीभविष्य
By gmjyotish on ज्योतिष from https://gmjyotish.blogspot.com
नमस्कार! हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर महिन्याचे राशीभविष्य हे सदर आपल्याआग्रहास्तव पुन्हा ब्लॉगवरआणले आहे.. दरमहिन्यात साधारण पणे१५- १६-१७ तारखेला रविअर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एकमहिना एकाच राशीतअसतो. मी अश्या रविमहिन्याचे राशीभविष्य सांगतो. अनेकांना ते आवडतेतसेच अनुभवाला येते.यामहिन्यात रवि कन्याराशीमधून तुळ राशीत१७ अक्टोंबर २०१९ ला जाणारआहे.बुध तुळ राशीमधून वृश्चिक राशीत २३अक्टोंबर जाणार आहे.शुक्रतुळ मधून वृश्चिक राशीत २८ अक्टॊंबरला जाणार आहे.गुरु हा वर्षात एकदा रास बदलणारा ग्रह वृश्चिक राशीतून धनु राशीत ४ नोव्हेंबर २०१९ ला जाणार आहे. ( या बद्दल प्रत्येक राशीवर होणारे परिणाम आपण दिवाळी अंकात पाहू. )बुध वृश्चिक राशीमधून वक्री गतीने तुळेत ७ नोव्हेंबर २०१९ ला जाणार आहे.मंगळ कन्या राशीतून तुळ राशीत १० नोव्हेंबर ला जाणार आहे.या महिन्यात २७ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०१९ काळात दिवाळीचे मुख्य दिवस आहेत. त्यातही बलीप्रतिपदा म्हणजे २८ नोव्हेंबर २०१९ ला विक्रमसंवत ही कालगणना अर्थात व्यापारी वर्ष २०७६ सुरु होत आहे. हे वर्ष कसे जाईल हे आपण दिवाळी अंकात पाहू.आता पाहू १७ अक्टोंबर २०१९ ते १५ नोव्हेंबर २०१९ या महिन्याचे राशीभविष्य. हे राशीभविष्य लग्नराशीकडून पहावे. जर लग्नराशीकडून पहाणे शक्य नसेच तर चंद्र राशीकडून अनुभवता येईल.मेष रास : आपल्या राशीला मी एक आनंदाची बातमी सांगत आहे. दिवाळी संपली की लगेचच गुरु धनु राशीत जाणार आहे. इतके दिवस आठवा असलेला गुरु आपल्यावर बंधने टाकून होता ती आता संपतील. गुरु बदलाचे आपल्या राशीला होणारे परीणाम नक्षत्रप्रकाश दिवाळी अंकात पाहूच पण आत्ता गुरु सोडून इतर ग्रहांचे परीणाम इथे पाहू. आपल्या राशीचा मालक मंगळ सहाव्या स्थानी आहे. तो दहा नोव्हेंबर म्हणजे अगदी शेवटी तुळ राशीत जाईल. हा महिना तो कन्या राशीत आहे. अजूनही काही शत्रू शिल्लक असतील तर फ़टाक्यांच्या आवाज करा म्हणजे नुसती हूल दिली तरी पुरे आहे. या महिन्यात मंगळ ३१ अक्टोंबर २०१९ ला चित्रा नक्षत्रात गेल्याने विपत्ती अर्थात संकटे संपुन जातील. चित्रा हे मंगळाचे स्वत: चे नक्षत्र आहे. मुलांच्या चिंता असतील तर या महिन्यात संपतील. दिवाळीत गोड पदार्थ असतात पण डायबेटीस असेल तर जपून खा आणि आपल्या जोडीदाराला सुध्दा आरोग्याची काळजी घेत दिवाळी करायला सांगा. असे वागलात तर दिवाळी आनंदातच जाईल यात शंका नाही.वृषभ रास : तुमच्या राशीचा मालक २८ अक्टोंबरला सातव्या स्थानात जात आहे. इतके दिवस शुक्र सहाव्या स्थानात म्हणजे बंदीवासात होता तो आता सातव्या स्थानात म्हणजे एक तर रोमेंटीक स्थानी जाणार आहे. शिवाय वृश्चिक ही राशी सर्व काही गुप्त ठेवणार आहे. यामुळे जे काय घडेल ते फ़क्त तुम्हालाच माहीत असेल. याची जाहीर चर्चा होणार नाही. पंचमेश बुध २३ तारखेला सातव्या स्थानी येऊन बसलेला आहे त्यामुळे तुम्हा दोघांच्या रोमान्स ला बहार येईल. व्यापार्यांना उत्तम व्यावसायीक संधी येतील. या दिवाळीत सिझनल विक्री असेल तर छप्पर फ़ाड विक्री होणार आहे.गुरु बदल पुढील वर्षभर तुम्हाला फ़ारसा अनुकूल नाही परंतु तुमच्या सारखे धोरणी कुणीच नाही त्यामुळे या आठव्या गुरुचा त्रास तुम्हाला फ़ारसा नाही. गुरु बदल झाल्यावर काय करायचे हे दिवाळी अंकात सांगणारच आहे पण योगाभ्यास हा जास्त या काळात करणे हीताचे असेल.दिवाळीला सुरू होणार्या नविन वर्षाला दररोज योगाभ्यासाचा संकल्प केलात तर गुरू अनुकूल होईल आणि दिवाळीच काय वर्ष ही चांगले जाईल.मिथुन : तुमच्या राशीचा मालक २३ अक्टोंबरला वृश्चिक या शत्रु राशीत जात आहे. काही क्रिएटीव्ह सुचले असेल तर लिहून काढा किमान मुद्दे तरी लिहा. २३ अक्टोंबर नंतरचा काळ जरी लिखाणाला अनुकूल नसला तरी वाणीने घायाळ करण्यासाठी चांगला आहे. २३ तारखेनंतर एखादा शत्रू शोधून मनात नसेल तर वर्मी शाब्दीक घाव घालण्याची उर्मी येणारच आहे.भावंडे या महिन्यात काही शुभ वार्ता घेऊन येतील. मुलांच्या पेक्षा मुलींच्या चिंता करण्याची वेळ येणार नाही असे पहा. होणारा गुरुबदल आपल्याला काय काय संधी देणार आहे ते दिवाळी अंकात पाहू. सप्तमेश सप्तमात तो ही गुरु बदल झाल्याने अविवाहीत असाल तर या वर्षभरात बार उडवून द्याल असे दिसत आहे. विवाहानंतर कसे वागायचे याचा विचार करा. मिथुन राशीचा प्रभाव असला म्हणजे बालीशपणा दिसतो. असे आता वागून चालणार नाही. सुन असो की जावई पदोपदी तुमची परीक्षा असते. याचा विचार केलात तर वर्ष सुध्दा आनंदात जाईल.कर्क रास: या महिन्यात संपुर्ण महिनाभर रवि तुळ या राशीत असणार आहे. वंशपरंपरागत काही मिळणे असल्यास या महिन्यात मिळायला हरकत नाही. अनेक जण आलेल्या धनाचा उपयोग प्रॉपर्टी खरेदीसाठी करण्याचे योग या महिन्यात आहे. कलाकारांची लॉटरी लागण्याचे योग आहेत पण त्याच बरोबर इनकम टॅक्स खात्याकडून नोटीस येणार नाही ना या कडे लक्ष द्यावे.महिनाभर पराक्रम करण्याची उर्मी रहाणार आहे मग ती बौध्दीक असो की शारिरीक. कर्क लग्नाला हा पराक्रम शारिरीक आणि बौध्दीक पेक्षाही भावनीक जास्त असेल. या महिन्यात कम्युनिकेशन अर्थात मिडीया, लेखन, प्रकाशन, पत्रकारीता या सारख्या व्यवसायातले लोक काही वेगळे करुन चमकदार कामगिरी करतील. या महिन्यात लहान भावंडांची चांगली बातमी समजेल आणि भावंड जर गायन वादन करत असेल तर त्याबाबत एखादी घटना लक्षात राहील.या महिन्यात अनेक कर्क राशीच्या लोकांना २८ तारखे पर्यंत अनेकदा प्रणय करण्यास संधी लाभेल. प्रेम गीत जोडीदाराला गाऊन दाखवण्यापासून ते सिनेमाला एकत्र जाण्यापर्यंत फ़क्त नाही तर अनेक बाबीत लक्षात राहील असे काही घडेल. इतके काही घडल्यावर दिवाळी आनंदात तर रहाणारच ना ?सिंह रास : तुमच्या राशीचा मालक महिनाभर तुळ या राशीत रहाणार आहे. खर तर स्थान पराक्रमाचे पण रास मात्र नीच, अश्या परिस्थितीत सिंह महिनाभर असेल. यामुळे सिंहाने डरकाळी फ़ोडली तरी स्वर घशाच्या बाहेर पडणार नाहीत. यासाठी आजारपण असेल तर वेळीच उपचार करा. पुढारी मंडळींना काळ अनुकूल नाही म्हणून नमते घेण्याशिवाय पर्याय नाही.प्रवचन कार, व्याख्याते मंडळींना हा महिना जोरदार असेल. नाटककार, संगीतकार आणि गायक सुध्दा दिवाळी पहाट पासून अनेक रियालीटी शो मधे अनेकांना दिसतील. आपला आवाज आणि गायकी यांना मोठे प्रोत्साहन या महिन्यात मिळेल.या महिन्यात अनेकांना रोख रक्कम कुठे गुंतवावी यावर विचार करायला लागणार आहे. दिवाळी व लक्ष्मीपुजन मोठ्या आनंदात आणि समाधानात करण्याचे योग आहेत कारण या महिन्यात तरी आपल्याला फ़ारशी चणचण जाणवणार नाही.कन्या रास : आपल्या मालक बुध तेवीस अक्टोंबर पर्यंत धनस्थानी नंतर पराक्रम स्थानी जाऊन १ नोव्हेंबरला वक्री होऊन ७ नोव्हेम्बरला पुन्हा धनात म्हणजे दुसर्या स्थानी जात आहे. एखादा ग्रह वक्री झाला म्हणजे ५० % फ़ळ देतो म्हणून महत्वाची कामे १ नोव्हेंबर पर्यंत संपुर्ण करा.या महिन्यात आपल्याला व्यापारात, बौध्दीक खेळात म्हणजे कोडी सोडवणे इत्यादी आणि लेखन कार्यात धन मिळण्याचे जोरदार योग १ नोव्हेंबर पर्यंतच आहेत. आपले पैसे वसूल करणे जर सोपे नसेल तर १ तारखेच्या आधी किमान पोस्ट डेटेड चेक मिळतो का ते पहा. २३ तारखेपर्यंत जमा झालेली पुंजीची नीट गुंतवणूक करा.या महिन्यात दिवाळीच्या फ़राळासोबत चटकदार भेळ्पुरी इ. जिभेला पाणी आणणार्या पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी २३ तारखे पर्यंत आहे. या तारखेपर्यंत घरात स्त्री पाहूणे येण्याची शक्यता सुध्दा आहे. मावस बहीणी, मामे बहीणी, सख्खी बहीण त्याची मुले याने घर भरुन जाईल.दिवाळीच्या पुर्व असे घरगुती संमेलन मोठ्या आनंदाचे असेल यात शंका नाही.तुळ रास : तुमच्या राशीचा मालक शुक्र २३ अक्टोंबर पर्यंत तुळ राशीतच असणार आहे. गेले काही दिवस तो तुम्हाला यश देत आहे त्याबरोबर तुमचे व्यक्तीमत्व, तुमच्या कला यांना मोठे प्रोत्साहन देत आहे. हे सगळे जर पैशात कॅश झाले नाही तर काय उपयोग ? ही संधी २३ तारखेनंतर जेंव्हा शुक्र धनस्थानी जाईल तेंव्हा येईल. आपण साधना करुन मिळवलेल्या कलागुणांचे कौतूक आणि सोबत मानधनही मिळेल.सध्या आपण निवडणूक लढवत असाल तर यश मिळण्याची संधी आहे. येण केण प्रकारेण आपल्याला निवडणुकीतच नाही तर महिनाभर यश मिळण्याचे योग आहेत. अनेक दिवस भिजत पडलेली प्रकरणे या महिन्यात सहजपणे मार्गी लावाल. प्रयत्न करावेच लागतील पण यश मिळेल.आजवर बुडीत खात्यावर लिहलेले पैसे या महिन्यात २३ तारखेनंतर १ नोव्हेंबर पर्यंत वसूल करु शकाल. दिवाळी असली तरी अनेक व्यावसायीकांना दुर देशात व्यवसायानिमीत्ताने फ़िरावे लागणार आहे. आजकाल संवाद सोपा झाल्यामुळे व्हिडीओ कॉन्फ़रन्सींग करुन दिवाळीला घरातच आहोत असे समाधान सहज मिळवू शकाल. सणासुदीला घरच्यांशी संवाद आनंद मिळणे महत्वाचे आहे.वृश्चिक रास : नोकरीच्या निमीत्ताने किंवा व्यवसायाच्या निमीत्ताने आपल्यालाही परदेशगमन किंवा दुर प्रवासाला जावे लागणार आहे. ज्यांना हे नेहमी करावे लागत नाही त्यांना ही दिवाळी घरापासून लांब रहाण्याने आनंद हिराऊन घेतल्यासारखे वाटेल परंतु पुर्वी पोस्ट कार्ड ने साधला जाणारा घरच्या लोकांशी संवाद तंत्रज्ञान विकसीत झाल्यामुळे आता जास्त आनंद देणारा झालाय हे काय थोडे आहे ?या महिन्यात अनेक ग्रह व्ययस्थानात बसल्यामुळे जर खर्च, प्रवास, श्रम आणि चिंता यामुळे व्यापला असाल तर दिवाळीच्या आधी अनेकांना दिलासा मिळेल. बुध २३ ताराखेला बदलून लग्नी येत असल्याने खर्च नियंत्रणात येईल. २८ तारखेला शुक्र लग्नी आल्यामुळे चिंता किंवा ताण असल्यास संपेल. हे सगळे जरी असले तरी काही प्रमाणात अपेक्षीत घडत असल्यामुळे त्याचा आनंद कुणाला नाही समजला तरी तुम्हाला समजणार आहे यामुळे दिवाळीच्या पार्श्वभुमीवर चेहेर्यावर तुम्ही स्थितप्रज्ञ दाखवत असाल तरी मनात खुष असाल.धनु रास : झुम झुम के नाचो आज गाओ आज आए खुशी के गीत हो असे शब्द असलेले बहुदा मुकेश साहेबांचे गाणे ब्लॅक अॅड व्हाईट असले तरी पहावेसे वाटेल. https://youtu.be/k7aWtLcTaT4 वर्षभर गुरु महाराज व्यय स्थानी होते. नेकी करो दर्या में डालो असा हा अनुभव होता. फ़ायदा जाऊ दे पण चांगले केले असही कोणी म्हणत नाही असा काळ होता. या महिन्यात गुरु महाराज तुमच्या राशीत येतील आणि आत्मसन्माना पुढे जाऊन आपल्याला समाजात स्थान देतील यात शंका नाही.गुरु महाराज बदलले म्हणजे लगेचच आपल्याला यश देणार असे होणार नाही परंतु नोव्हेंबर महिना अखेरीस याची चांगली फ़ळे मिळू लागतील. गुरु बदलाचे राशीवार भविष्य आपण दिवाळी अंकातच पहाणार आहोत.खेळाडूंना ४ नोव्हेंबर नंतर होणार्या स्पर्धेत जोरदार यश मिळून चमकण्याची संधी मिळणार आहे. अनेक व्यावसायीकांना नफ़ा मिळवण्याच्या अनेक संधी या महिनाभरात चालून येतील आणि दिवाळी जोरदार आणि चमकदार होणार आहे.मकर रास : आपल्याला अजूनही वाटच पाहायची आहे पण जानेवारीत शनि मकर राशीत येणार आहे. आपल्याकडे उतावीळ पण नाही धैर्य आहे म्हणून होणार्या कष्टाचे किंवा नुकसानीचे फ़ारसे दु:ख आपण चेहेर्यावर दाखवत नसाल कारण पुढे चांगले दिवस आहेत याचा आत्मविश्वास आपल्याला नवा उत्साह देतो.काहींना या महिन्यात बॉसच्या अचानक बदलीमुळे तात्पुरती अधिकाराची जागा मिळणार आहे. आपल्या वरिष्ठांना आपल्यावर ही औट घटकेची जबाबदारी देण्याचा विश्वास आहे यात सारे काही आले. जरा हळूच ही जबाबदारी कायमची मिळते का याबाबत चाचपणी करा. लगेचच प्रमोशन नको म्हणाव पण जबाबदारी ची सवय झाल्यावर द्या म्हणाव. तो पर्यंत माझ्या डोक्यावर कुणाला बसवू नका हे मात्र ठासून सांगाच.व्यावसायीक असाल तरी जबाबदार्या वाढणार आहेत. याची चांगली फ़ळे लवकरच मिळतील यावर विश्वास ठेवा. उच्च पदवी मिळवणार्यांना या महिन्यात सेमीस्टर परिक्षा पध्दतीत चांगले यश मिळेल. यामुळे दिवाळी आनंददायी जाणार आहे.कुंभ रास : आपल्या राशीला २४ जानेवारी २०२० पर्यंत चांगला काळ आहे. कारण शनि आपल्या लाभ स्थानी आहे व याच लाभ स्थानात लाभेश गुरु ही येऊन बसणार आहे. हा गुरु नेमके काय लाभ देणार आहे ते आपल्याला दिवाळी अंकातच वाचावे लागेल.जेंव्हा काळ चांगला असतो तेंव्हा लाभ सर्व बाजूनी होतो असे अनुभवाला येते. आपल्याही कुंडलीत आपल्या पार्टनरला या महिन्यात काही लाभ होणे अपेक्षीत आहे. व्यापार करणार्यांना अचानक सरकारी घोरणाचा लाभ मिळून फ़ायदा होताना दिसेल. कुंभ लग्न राशीच्या शिक्षण क्षेत्रात असलेल्या, धार्मिक क्षेत्रात असलेल्या लोकांना धार्मीक किंवा शिक्षण क्षेत्रात असलेल्यांना उच्च अधिकाराची पदे मिळण्याची संकेत या महिन्यात २८ तारखेच्या नंतर मिळत आहेत. अनेकदा यासाठी लॉबींग करावे लागते याची तयारी ठेवा. ज्योतिषाची आवड असलेल्या, अभ्यास असलेल्यांना या महिन्यात वर्तवलेले भविष्य तंतोतंत बरोबर येण्याचे योग आहेत.एकंदरीत काय कुंभेची दिवाळी जोरदार असणार यात शंका नाही.मीन रास : मीन लग्नराशी असलेल्यांना खुप काळ झगडावे लागले होते पण आता येणारा गुरु बदल त्यांच्या आयुष्यात फ़ेरबदल घडवून आणणार आहे. जास्त माहितीसाठी आपल्याला नक्षत्रप्रकाश दिवाळी अंकाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.या महिन्यात फ़क्त आपण आजारी पडणार नाही इतके प्रकृतीचे तंत्र संभाळावे लागणार आहे. हा भाग सोडला तर आपल्या राशीला बुध २३ तारखेनंतर अनुकूल होऊन व्यावसायीक सुवार्ता घेऊन येईल तर शुक्र २८ तारखेच्या नंतर काही खास व्यावसायीक किंवा नोकरदारांना अनेक दिवसांच्या प्रोजेक्ट नंतर फ़लदायी होताना दिसणार आहे. गुढ विद्या शिकणार्यांना काही तंत्र अवगत होईल जे कोणत्याही पुस्तकात नसेल. फ़ौजदारी केसेस चालवणार्या वकील मंडळीना एखादी केस त्यांच्या बाजूने लागण्याचे योग येतील.या महिन्यात काहींना परदेशगमनाची संधी मिळेल. आधीच परदेशात गेलेले असाल तर जवळ जवळ महिनाभर अजून मुक्काम वाढण्याचे संकेत ग्रह देत आहेत. आता यामुळे दिवाळीला घरी नसाल हे बरोबरच असले तरी दिर्घ काळाच्या चांगल्या संधी मिळणार असतील तर दिवाळीच नाही का ?शुभंभवतु