१६ नोव्हेंबर २०१९ ते १५ डिसेंबर २०१९ या काळाचे राशीभविष्य ( तुळ ते मीन राशी साठी )

By gmjyotish on from https://gmjyotish.blogspot.com

नमस्कार !  हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर  महिन्याचे राशीभविष्य हेसदर आपल्या आग्रहास्तव पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १५- १६-१७  तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या रवि महिन्याचे राशीभविष्यसांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.या महिन्यात रवि अर्थात सुर्य १६ नोव्हेंबर २०१९ ला वृश्चिक राशीत जाणार आहेशुक्र २१ नोव्हेंबर २०१९ ला धनु राशीत जाणार आहेबुध २१ नोव्हेंबर ला मार्गी होऊन ५ डिसेंबरला वृश्चिक राशीत जाणार आहे.शुक्र १५ डिसेंबरला मकर राशीत जाणार असला तरी हे भविष्य आपण पुढील महिन्यात पहाणार आहोत.थोडक्यात रवि आणि बुध व शुक्र यांचेच राशी परिवर्तन ह्या महिन्यात होणार आहे. या शिवाय हर्षलआणि नेपच्युन आहे  त्या राशीत वक्री असणार आहेत. पैकी या महिन्यात २७ नोव्हेंबर २०१९ ला नेपच्युन मार्गी होणार आहे.या पार्श्वभुमीवर हा महिना बारा राशीच्या लोकांना कसा जाईल ते आपण आता पाहू. हे राशीभविष्य आपण लग्नराशीकडून पहा. ज्यांना लग्नराशी माहित नाही त्यांनी चंद्र राशीकडून पहावे.१६ नोव्हेंबर २०१९ ते १५ डिसेंबर २०१९ या काळाचे राशीभविष्य ( मेष ते कन्या राशी साठी )तुळ रासआपल्या राशीचामालक शुक्र २१ नोव्हेंबरपासून धनु राशीत जाणारआहे. २४ तारखेला शुक्र गुरुयांची युती आहे. तिसर्या स्थानीहोणारी देवगुरु आणि राक्षसगुरुयांची युती आपल्याला आपल्यालेखनामुळे किंवा अन्य कोणत्याकारणाने प्रसिध्दी मिळण्याचेयोग आहेत. एका बाजूलाप्रसिध्दी योग असताना दुसर्याबाजूला लेखनावर टीका सुध्दाहोण्याची शक्यता आहे. असे झाल्यासकाय उत्तर द्यायचे याचीतयारी झालेली असावी. ११ डिसेंबरलाहोणारी शुक्र शनि युतीशिक्षण क्षेत्रात कामकरणार्या लोकांच्या साठीकिंवा कमर्शियल आर्टमधे पेन्सील वर्क, ब्लॅक मेटलवर काम करणार्या लोकांनाकाही संधी घेऊन येणारीआहे. ही युती म्हणजे मोठाराजयोग आहे. यामुळे तुळराशीच्या काही लोकांना संधीउपलब्ध होतील. १३ डिसेंबरलाहोणारी शुक्र प्लुटो युतीमात्र जननिंदा घेऊन येणारीआहे. एकाबाजूला सन्मान, संधी तरदुसर्या बाजूला जननिंदा असेविचीत्र ग्रहमान या महिन्यातकाही तुळ लग्नाच्या लोकांनाअनुभवास येईल.वृश्चिक रासआपल्या राशीचामालक मंगळ महिनाभर वृश्चिकराशीत असणार आहे. आपला एखाद्यागोष्टीचा नको तेव्हडा आग्रहआपल्याला अडचणीत तर आणतनाही ना या कडेलक्ष देण्याची गरजआहे. या महिन्यात आपल्यालावैवाहीक जोडीदाराच्या माध्यमातुनकाही धनलाभ होण्याचे योगआहेत. काही वृश्चिक लग्नराशींच्यालोकांना पुर्वी झालेल्या नुकसानीचीनुकसान भरपाई सुध्दा मिळेलअसे योग आहेत.यामहिन्यात आपल्या घरी कौटुबीकस्नेह संमेलन भरेल. सर्वच स्नेहीगोड बोलतातच असे नाही. आपल्याचघरी येऊन, जेऊन खाऊनआपल्याला वाईट बोलून जाणारेस्नेही या महिन्यात असास्नेह मेळावा झाल्यास दिसतील. हात्यांचा स्वभाव आहे असेसमजून त्या कडे दुर्लक्षकरायला हरकत नाही. कारण तेकाही बोलले म्हणजे तेखरे असते आणि त्यामुळेनुकसान होतेच असे नाही.धनु रास :आपल्या राशीचामालक गुरु जो गेलेवर्षभर बाराव्या स्थानीहोता तो आता रासबदलून धनु राशीत आल्यानेआपण जे काम करतात्यात आपले विचार, आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटेल. अनेकदा ग्रहस्थितीअनुकूल नसल्याने काहीघडवून आणणे जमले नसेलतर २७ मार्च २०२०पर्य्ंतचे पुढील पाच महिनेआपल्या हाताशी आहेत.आपल्या राशीतहोणारी शुक्र व गुरुयुती आपल्याला लाभदेऊन जाणार आहे. हाताखालच्या लोकांनीकेलेल्या कामामुळे असेघडत असेल तर मात्रयाची जाणीव ठेऊन कृतज्ञताव्यक्त करायला आपण विसरणारनाही हे पहा. कोणा मित्रांच्यासंसारातला गृहकलह समोर येईलआणि तो मार्गी लावतानाआपले हात पोळणार नाहीतइतके अंतर ठेऊन हेकाम करा,यामहिन्यात बाराव्या स्थानीबसलेला मंगळ काही गुप्तचिंता, गुप्त खर्च देईल. हेउघड न करता व्यवस्थितमॅनेज करण्याचे कौशल्यदाखवावे लागेल.मकर रास :आपल्या राशीचामालक शनि अजुनही बाराव्यास्थानी आहे. जानेवारीत तोमकर राशीत येणार आहे. आपल्यासंतती संदर्भात खासकरुन संततीच्या नोकरीच्याठिकाणी उद्भवलेल्या प्रश्नामुळेकाही चिंता लागून राहील. काहीखर्च सुध्दा किंवा प्रवासयामुळे या महिन्यात करणेआवश्यक ठरेल.यामहिन्यात लाभ स्थानी असलेलामंगळ आपले उत्पन्न वाढवेलकिंवा एखादा उत्पन्नाचा नविनमार्ग मिळवून देईल यामुळेखर्च असला तरी मॅनेजहोईल.  आपल्यानोकरीच्या ठिकाणी हाताखालचे ववरिष्ठ सुध्दा आपण अडचणीतअसाल तर मोलाचा सल्लादेतील. यामुळे आपण काहीकठीण परिस्थिती यामहिन्यात आली तरी हाताळूशकाल.कुंभ रास:आपल्या राशीला संपुर्ण नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिने चांगले जाणार आहेत. अनेक कामे मार्गी लागतील. अनेक प्रकारचे लाभ जसे आपल्या मुदतठेवी वरचे व्याज, गुंतवणूकीपासून फ़ायदा या काळात अपेक्षीत आहेत.२४ नोव्हेंबरला शुक्र आणि गुरु युती मुळे आपले वरिष्ठ काही विशेष लाभ आपल्याला मिळवून देतील. २१ नोव्हेंबरला लाभ स्थानात येणारा शुक्र कुंभ लग्नाला राजयोग कारक असल्यामुळे १३ डिसेंबर पर्यंत प्रॉपर्टी मधून लाभ असो की अन्य अनेक लाभ आपल्या पर्यंत पोचोवणार आहे.याच काळात २१ नोव्हेंबर नंतर आपल्या बुध्दीमत्तेची चमक दिसणार आहे. आपण बुध्दीबळ खेळत असाल किंवा कौन बनेगा करोडपती सारख्या बुध्दीचे प्रदर्शन करण्याच्या स्पर्धा असतील, आपल्याला लोकप्रियता मिळवून देणार आहे. ४ डिसेंबर २०१९ ला होणारा चंद्र आणि नेपच्युन योग कुंभ राशीच्या लोकांचा मुड घालवणारा असेल. हा एक दिवस सोडला तर कुंभ राशीला हा महिना स्मरणात राहील असाच असेल.मीन रास :आपल्या राशीचा मालक दशमस्थानी आल्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात मोठी वाढ होण्यास सुरवात होईल याची चुणूक या महिन्यातच दिसेल. आपल्या नोकरीतले किंवा व्यवसायाचे कार्यक्षेत्र मोठे झाल्यामुळे ह्याचे व्यवस्थापन कसे करायचे या कडे सुरवाती पासून लक्ष द्यावे लागणार आहे. २७ मार्च २०२० पर्यंत कामाचा बोजा वाढत जाणार आहे. इन्शुरन्स क्षेत्रात काम करणारे, भुवैज्ञानीक, बोअर वेल खोदणारे, जमिनीतून बाहेर आलेली रत्ने घडवणारे, विकणारे यांना या महिन्यात प्रचंड काम करावे लागणार आहे. यातून फ़ायदा होणारच आहे हे विसरू नये. जे लोक परदेशस्थ कंपनीची कामे करतात त्यांनाही भरपुर काम मिळणार आहे. एकंदरित मीन लग्नराशीच्या लोकांना आलेली निराश या महिन्यात दुर होऊन प्रगतीचा आलेख उंचावत जाण्यास आता सुरवात होणार आहे. आपल्याला सुध्दा हा महिना स्मरणात राहील असाच असणार आहे.शुभंभवतु
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!