१४ फेब्रुवारी...

By siddhic on from https://siddhic.blogspot.com

 १४ फेब्रुवारी...Valentine च यंदाच गीफ्ट, ते म्हणजे माझा कोरोना टेस्टचा आलेला रिपोर्ट.Positive (:( :-( :अरेरे:)!बघता क्षणी मला घाम फुटला होता. एवढी काळजी घेतली तरीही?  कसं काय?  का?  काही समजेना. काय कराव सुचेना.नवरा सुदधा कोवीड positive.  एवढं कमी काय, म्हणून एक-एक करत घरातील इतर संगळ्यांचा रिपोर्ट positive आला.  सासु-सासरे, नवरा सगळे admit झाले. माझ्यासाठी तो ही पर्याय राहिला नाही. पाच महिन्यांच माझं छोटंसं पिल्लू... ते पण फक्त दुधावर अवलंबून, त्याला कुठेही ठेवता येत नव्हते. माझ्याशिवाय कुणाकडे ही जास्त वेळ राहत नाही. फॅमिली डॉक्टरांना विचारुन पाहिले. 'लहान मुलांची प्रतिकार शक्ती मोठयांपेक्षा चांगली असते, त्यामूळे तुम्ही बाळाला तुमच्या जवळ ठेवू शकता.  फक्त योग्य ती काळजी घ्या. मास्क लावा, समोर खोकू नका, sanitizer वापरा, वारंवार हात धुत जा...कोरोनाचा काही त्रास होणार नाही.' असा सल्ला मिळाला आणि त्यामुळे जीवात जीव आला.बाळाला घेऊन होम क्वारंटाइन राहण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. रिपोर्ट पाहीला तेव्हा एका क्षणी डोळ्यासमोर अंधारी आली होती. पण हार पत्करली नाही. आधी नेटवरती घरगुती उपचार शोधले. एक लिस्ट तयार केली. विज्ञान तंत्रज्ञान, वैद्यकीय उपचार कितीही पुढे गेले, तरीही आपल्या आयुर्वेदाला कशाचीही तोड नाही. आयुर्वेदिक काढा, लिंबू-तुलसी रस, आद्रक, गवती चाहा, ओली हळद हे सारे रामबाण उपाय सापडले. बिग बिस्केट ने घरी सुद्धा पोहोचविले. कोरोना म्हटलं की शेजारी-पाजारी, नातेवाईक सगळेच सोयीस्कर रित्या पण अप्रत्यक्षपणे वाळीत टाकतात. दाखवायला वरवरची आपुलकी बाकी वेळेला कोणी नाही. यामुळे सगळं काही स्वतःच ऑनलाइन मागवलं होत आणि सुरुवात केली.रुग्णालयात घरचे सगळे ट्रिटमेंट घेत होतेच आणि मी घरुन. माझ्या छोट्याशा पिल्लूला फक्त दुधा पुरतेच जवळ घ्यायचे. नाहीतर ते आपलं टुकू टुकू वाट बघून रडून एकटच झोपायच. त्याला रडताना बघून आपल्या आणि इतरांच्या निष्काळजीपणाची सारखी आठवण व्हायची. दारातून नुसती माझी झलक जरी दिसली, तरी हुंकारे देऊन हात पसरणार ते माझं पिल्लू बघून डोळे सारखे भरायचे.  ती वेळ आणि ती परिस्थिती खरंच शब्दात नाही सांगता येणार. एक आठवडा असाच ढकलला. मग शेवटी एकदा माझी आई आली, तिला माझी अवस्था पाहवेना. खरच एक आईच आईची अवस्था समजू शकते. तिच्याकडे बाळाला सोपवल्यानंतर मला हायसे वाटले. मग मात्र मी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले... तिथेच सार खाणं-पाणी चालू होत. इकडे मी आणि होस्पीटल मध्ये घरचे बाकीचे अशी टांगती तलवार डोक्यावर होती. त्यातून पण सगळ्यांना माझीच जरा जास्त काळजी, कारण रुग्णालयात मिळाणारी ट्रिटमेंट म्हणजे सलाईन, इंजेक्शन यातले काही मला घरी मिळत नव्हते. पण काहीही झालं तरी सगळ्यांनी यातून बरं व्हायचं आहे. बास्स! दुसरा कसलाही विचार मनात येऊ दिला नाही.नवव्या दिवशी रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि मी जिंकले. सुदैवाने मला शुगर, ब्लड प्रेशर नाही, किंवा कोणतीही शस्त्रक्रिया झालेली नाही, कोणत्याही प्रकारचा आजार नसल्याने, फक्त घरगुती उपाय,<strong>'पॉझिटिव्ह एनर्जी'</strong> आणि celine 500, raricap या गोळी, पळवल त्या कोरोनाला. <strong><em>थोडक्यात हेल्दी खा आणि हेल्दी रहा. आरोग्य जपा. पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला खुप कणखर बनवते. सतत सकारात्मक विचार करत राहिल तर पन्नास टक्के आजार तिथेच गायब होतो. सगळा रोगप्रतिकारशक्ती चा खेळ आहे. बाकी काही नाही.</em></strong><strong>मी घरी करत असलेले काही उपाय -</strong>*रोज सकाळी उपाशीपोटी एक कप गरम काढा.(लवंग ४, काळीमिरी ४, एक काडी दालचिनी, एक टिस्पून ओवा, एक टिस्पून ओली हळद, आर्दक एक इंच, तुळस पाने ८-१०, लिंबा एवढा गुळ यामध्ये चार पेले पाणी घ्यावे, ते दोन पेले होईपर्यंत आटवून तयार केलेला काढा. )*रोज २-४ उकडलेली अंडी.*सफरचंद, संत्री दोन्ही रोज एक-एक. उपलब्ध असल्यास किवी, ड्रॅगन फ्रुट सुद्धा खावे.*पाणी गरम करून त्यात थोडी हळद घालून पिण्यास घ्यावे. गरम दूध मध्ये देखील हळद घालून ते पिण्यास घ्यावे.*सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि संध्याकाळचे जेवण वेळेवर आणि भरपूर करावे. शक्यतो खाण्यामध्ये जास्त अंतर ठेवू नये. हिरव्या भाज्या-मोडाचे कडधान्य ई चा समावेश करावा. तेलचा वापर अगदी कमी करावा.*थंड पाण्याचा वापर टाळावा.*रोज मीठ व कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात.*सकाळी आणि संध्याकाळी कपूर आणि निलगिरी तेल टाकून वाफ घ्यावी.<em>(एखाद्याला कोरोना पेशन्टला याचा फायदा व्हावा या एकमेव हेतूने, फक्त एक अनुभव म्हणून मी हे इथे शेअर करत आहे.)</em>सिद्धि चव्हाणhttps://siddhic.blogspot.com
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 4
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!