॥ मी ब्रम्हचारी असतो तर... ॥
By cooldeepak on साहित्य from https://cooldeepak.blogspot.com
ब्रम्हचर्याच्या त्या स्वतंत्र अमदानीत आम्ही आमचे बादशहा होतो. आणि आज... पूर्वेला जाण्याचा विचार सुद्धा त्या सुर्यनारायणाच्या मनात येण्यापूर्वी आमच्या गृहलक्ष्मीचा गजर होतो : "उठा! दूध आणायच आहे. उशिरा जाता आणि मग दुध संपलं म्हणून सांगत येता!" ही भुपाळी! पूर्वीच्या बायका म्हणे सकाळी उठून सडासंमार्जन करून गाईची धार काढत होत्या. कुठं गेल्या त्या माऊल्या? आमचं कुटुंब पहाट फुटण्यापूर्वी आम्हांला