स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेले स्त्रियांचे पाक्षिक वृत्तपत्र! - The BeingWoman
By Chaitralikaustubhblogs on ललित | मनोरंजन | भटकंती | पाककृती | साहित्य | कथा | कविता | निसर्ग | आरोग्य | मन मोकळे | ग्रेट मराठी | पुस्तकांविषयी from https://thebeingwoman.com
आज जरा उगाचंच मन कासावीस झालं होतं. रोजच रुटीन ते काही संपत नाही. सूर्य उगवला की दिवस सुरू. तो त्याच काम वेळेत संपवून जातो पाठोपाठ चंद्रही येतो पण आपला दिवस काही संपलेला नसतो. आज जरा कुठे संध्याकाळी थोडा वेळ मिळाला मग काय... मस्त एक स्वतःसाठी चहा करायचा मूड झाला. आलं घालून एक स्पेशल चहा केला आणि जरा निवांत बसले. अचानक लक्ष गेलं टीपॉयमधील एका पाक्षिकावर. सहज हातात घेतलं नाव वाचलं बिइंग वुमन. वाटलं यात काय वेगळं असणार आहे? असेल असंच आपलं बायकांचं नेहमीचच काहीतरी. बाजूला ठेवून दिला. चहाचा एक घोट घेतला आणि अचानक नजर पडली पाक्षिकातील एका लेखाच्या हेड लाईनवर. नकळत पुन्हा अंक हातात घेतला आणि मी कधी तो संपूर्ण वाचून काढला हे कळालही नाही. नाव जरी बिइंग वुमन असलं तरी त्यात एवढे वेगवेगळे विषय आहेत हे वाचून मीच थक्क झाले. सुटसुटीत आणि सोपी मांडणी यानी माझं लक्ष वेधलं. त्यातील काही लेख खरंच प्रेरणा देणारे वाटले, तर काही मनाची मरगळ झटकून टाकणारे. माझी उत्सुकता अजूनच वाढली म्हणून त्यांनी पेपरमध्ये त्यांची साईट दिली होती त्यावर गेले आणि जुने अंक पाहिले. अंक बघताना जाणवलं दरवेळी वेगवेगळे विषय. उत्तम भा