सेना नसलेला सेनानायक
By ramataram on मन मोकळे from https://ramataram.blogspot.com
श्रीलंकेतील उत्पाताला आज नवे वळण मिळाले. दोन दिवसांपूर्वी महिंदा राजपक्षे यांनी रिकाम्या केलेल्या पंतप्रधानपदावर रानिल विक्रमसिंघे आरुढ झाले आहेत. या सत्तांतराबाबत काही रोचक माहिती मिळाली.---१. रानिल विक्रमसिंघे हे त्यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीचे एकमेव खासदार आहेत, ते ही निवडून आलेले नव्हेत! श्रीलंकेमध्ये 'नॅशनल लिस्ट मेंबर’ असा एक वेगळा प्रकार असतो. राष्ट्रीय निवडणुकांमध्ये विविध पक्षांना