सायकल चालवा, आरोग्य मिळवा

By Dada on from https://mazisamruddhi.blogspot.com

 सायकल हे एक चालती फिरती व्यायामशाळाच -दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)सायकल हे एक पुरातन, सुपरिचित, सुलभ, स्वस्त, आरोग्यवर्धक व समाजोपयोगी वाहन आहे. तसेच बिनखर्चिक, सोपे, सुरक्षित आणि व्यायामाचे उत्तम साधन आहे. स्वयंचलित वाहनांचा वाढता वापर हा संपर्ण भारतासाठीचा चिंतेचा विषय ठरतो आहे. पेट्रोल-डिझेल हे पदार्थ भारताला मोठया प्रमाणात आयात करावे लागतात. परिणामी, वायूप्रदुषणही मोठया प्रमाणात होते. त्यामुळे सध्याच्या पिढीने पुढील काळात नव्या पिढीवर सायकल वापराचे संस्कार घडवावेत. सायकलींचा भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात जितक्या वेगाने प्रचार होईल तितक्याच वेगात भारताची इंधनाची गरज कमी होत जाईल. जगात मोठया पदावरील व्यक्तीही ठराविक दिवशी स्वतः सायकलवर आपल्या कार्यालयांत येण्याचे धाडस दाखवतात. परिणामी, तेथील जनतेवरही सायकल वापराची उपयुक्तता ठसते. चीनसारख्या देशातही सायकलींचा प्रचार व प्रसार मोठया वेगाने झाला आहे. भारतातही तसे घडणे सहज षक्य आहे. परंतु आपल्या देशात स्वयंचलित वाहने मालकीची असणे हेच मुळी सामाजिक प्रतिष्ठा मानली जाते. त्याउलट सायकल बाळगणे, वापरणे कमीपणाचे समजले जाते. ही मानसिकता बदलल्याषिवाय सायकलींचा प्रसार होणार नाही. मोटारींमधून निघणारे कार्बन मोनाक्साईड, नायट्रोजन आॅक्साईड, ओझोन, हायड्रोकार्बन या दूषित वायूंनी धोक्याची पातळी केव्हाच ओलांडली आहे. त्यामुळे आपले जीवनच धोक्यात आले आहे. पर्यावरण संतुलित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. सायकलींने हे शक्य आहे.सायकल हे एक चालती फिरती व्यायामशाळाच आहे. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. हृदयाची क्षमता वाढते, पायाचे स्नायू बळकट होतात. फुफुसांची क्षमता वाढते. प्रसन्नता वाढून मनावरचा ताण कमी होतो. भूक आणि झोप सुधारते. गुडघेदुखीत लाभकारी आहे. वजनावर नियंत्रण येते. शासन-महानगरपालिका या सर्वांनी सायकलीचा वापर वाढविण्यासाठी नागरिक संस्थांना, मंडळांना प्रोत्साहन दिले पाहिजे. पुनश्च सायकलीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सर्व स्तरावरून सुनियोजित प्रयत्न व्हावेत. प्रदूषण व तत्सम समस्या नियंत्रित ठेवणारा सायकलस्वार, खऱ्या अर्थी समाजसेवक आहे. त्यांना योग्य प्रोत्साहन मिळाले पाहिजे. शाळा-काॅलेज, आस्थापनांसह रेल्वे, बस स्थानकांवर सायकलींसाठी विनाशुल्क पार्किंग असणे गरजेचे आहे. वाॅकिंग प्लाझाप्रमाणे ठराविक दिवशी, वेळी गर्दीच्या निवडक रस्त्यांवर फक्त सायकली व पादचारी यांनाच प्रवेश असणारे ‘सायकल प्लाझा’ उपक्रम राबवावेत.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!