साता वारांची कहाणी - हसवणूक
By cooldeepak on साहित्य from https://cooldeepak.blogspot.com
सोमवार हा अत्यंत अरसिक वार! त्याला फक्त पोटासाठी लोकांना राबायला लावायचे, इतकेच माहीत. सोमवार हा पिशवी घेऊन वावरत असतो. ह्या वाराचे आणि मोहकपणाचे वावडे आहे. एवढेच नाही, तर हा अत्यंत रुक्ष आहे. हा मासे खात नाही. तसा गुरुवारदेखील कांदा खात नाही. उपास करतो. पण दत्ताचा पेढा खातो, शिकरण खातो. सोमवारला तेही सुख पचत नाही. आदल्या दिवशी रविवार झालेला असतो. त्यामुळे ह्या वाराला पक्वान्न नाही - काही नाही.