सहस्त्रचंद्रदर्शन...मुलाच्या बाबांसाठी भावना
By Rupali_Thombare on कविता from umatlemani.blogspot.com
बाबा... ही दोन अक्षरे म्हणजे माझ्या जीवनाचे खरे शिल्पकार जीवनातील प्रत्येक घडीला सोबत असणारा एक मोठा आधार इतरांसाठी शिक्षक म्हणून असणारे तुम्ही म्हणजे आमचा खरा मान जीवनशाळेतही ऊन-पावसातही सदा उंचावली इंद्रधनूची ही कमान प्रेम, शिस्त आणि माया यांचा आहे येथे त्रिवेणी संगम आई आणि बाबा हाच माझ्या प्रत्येक आनंदाचा उगम आज तुमचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा साजिरा सुंदर आप्तस्वकियांचे झाले आगमन आनंदाने उजळले हे घर तुमचा जन्मदिवस आहे आम्हा सर्वांसाठीच खूप खूप खास युगानुयुगे हा दीपक तेजाळत राहावा हाच या दिपकच्या मनाला ध्यास - रुपाली ठोंबरे.