सफरचंदात शिजवलेली गिळगिळीत मिसळ - शिकारा - (Movie Review -Shikara)
By Ranjeet on कविता from www.ranjeetparadkar.com
एकोणीसशेे नव्वदच्या आसपास मी वर्तमानपत्र वाचायला सुरु केलं असावं. त्या काळात एक बातमी कुठल्याश्या कोपऱ्यात रोज वाचायचो. 'काश्मिरमधला हिंसाचार'. पंडितांचा संहार त्या काळात नियमितपणे चालू होता. काश्मिरात अत्याचार बोकाळला होता. वर्तमानपत्रांनी त्या बातम्यांना क्वचितच मथळ्याची जागा दिली. अपवादानेच अग्रलेखातून कुणी जळजळीत अंजन ओतलं. असंख्य लोक काश्मिरातून हाकलले जात होते. बेघर होत होते. मला त्या