श्रीमंत म्हणावे त्याला - मराठी कविता
By jyubedatamboli on मन मोकळे from https://jyubedatamboli.blogspot.com
श्रीमंत म्हणावे त्याला - मराठी कविता✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळीफोटो साभार: गूगलजीवन ही संधी वाटे ज्यालाश्रीमंत आहे म्हणावे त्याला ।घरी खातो भाजी, पालेभाजीफळेही खातो ताजी ताजीदूध, दही, ताक रोज मिळे ज्याला।श्रीमंत आहे म्हणावे त्याला ।ज्याच्या अंगणी झाडे डुलतीवेलीवरती नित्य फुले उमलतीऑक्सिजन पुरेसा मिळे ज्याला ।श्रीमंत आहे म्हणावे त्याला ।पाहुणे रावळे येती दारीतृप्त होऊनी जाती माघारीयामुळे आनंद मिळे ज्याला ।श्रीमंत आहे म्हणावे त्याला ।ज्याची सकला होते आठवणकरी जो मायेची साठवणपरोपकारे मिळते सुख ज्याला ।श्रीमंत आहे म्हणावे त्याला ।प्रातःकाळी जो लवकर उठतोयोगा नि प्राणायाम करतोनिरोगी जीवन लाभते ज्याला ।श्रीमंत आहे म्हणावे त्याला ।घरी ज्याच्या लडिवाळतान्हत्याच्यासवे जगावे वाटे पुन्हात्याच्याशी खेळायला जमते ज्याला ।श्रीमंत आहे म्हणावे त्याला ।स्वतः जो दिलखुलास हसतोआणि दुसऱ्यालाही हसवतोसदा समाधानी रहाणे जमते ज्याला।श्रीमंत आहे म्हणावे त्याला ।