शनि महात्म्य

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

.आज उत्तरभाद्रपदा हे शनि महाराजांचे नक्षत्र , शनिवार आणि सुरु असलेली साडेसाती या योगावर 'शनी महात्म्य' वाचले. दरवेळेला जेंव्हा हे शनि महात्म्य वाचतो तेंव्हा एक वेगळा विचार शनि महाराज देतात. तसा आजही एक वेगळा विचार सुचला साडेसातीचे अडीच अडीच वर्षाचे तिन टप्पे असतात हे आपणास माहितच आहे. प्रत्येक राशीला हे तिन टप्पे कसे जातात हे ही अनेक पुस्तकात दिलेले आहे. साडेसातीत केल्या जाणा-या उपायांचा मधे 'शनि महात्म्य'  वाचन हे ही सांगितले आहेच.  आज हे वाचन केल्यानंतर मनात विचार आला की ज्या राजा विक्रमादित्याची कथा यात सांगितली आहे ती संपूर्ण कथा तीन टप्प्यात विभागली तर साधारण प्रत्येकाला तसा अनुभव साडेसातीच्या तीन टप्प्यात येतो.शनि महाराजांची साडे असतो साक्षात प्रभुरामचंद्र, श्रीकृष्ण, कैलासपती महादेव, साक्षात गुरु यांनाही चुकलेली नाही ( फक्त काहींनी याचा कालावधी कमी करुन घेतला, असा उल्लेख शनि  महात्म्यात आहे) . आपल्या कर्माचा झालेला गर्व कमी होणे हे साडेसातीचे प्रयोजन.तर कथेचा पहिला टप्पासभेत नवग्रहात श्रेष्ठ कोण यावर चर्चा सुरु असताना नकळत राजाकडून शनि महाराजांची टिंगल होते, नंतर राजाला आपली चूक समजते पण ग्रह दशेप्रमाणे आता जे होईल त्याला सामोरे जायचे अशी मनाची तयारी होते. घोडे विकणारा व्यापारी  बनून शनि महाराज येतात,  एक छान घोडा राजाला दाखवतात, तो उधळतो आणि राजाला खूप लांब अरण्यात सोडतो( अचानक वेगळ्या परिस्थितीला सामोरे जाणे, काय घडतय हे न कळणे)दुसरा टप्पा :- एका गावात आसरा मिळालेल्या राजावर चोरीचा आळ येणे, तिथल्या राजाने त्याला हात- पाय तोडून टाकण्याची शिक्षा देणे( हा टप्पा जेंव्हा गोचरीचा शनी तुमच्या राशीतून/ जन्मस्थ चंद्रावरुन भ्रमण करतो,  अनेक अडचणी येणे,  काय करावे हे न सुचणे, झालेल्या चुकांची जाणिव होणे इ इ )टप्पा ३ राहात-पाय तोडलेल्या विक्रमादित्य  जाला त्याच्या राज्यातील माहेरवाशीण ओळखते, सेवा करायची परवानगी इथल्या राजाला मागते,  अन्न-पाणी निवारा देते आणि एक दिवस शनि महाराजांच्या कृपेने परत सगळे व्यवस्थित होते( परिस्थितीनुसार करावे लागलेले बदल, नवीन गोष्टीत किंवा जुन्याच गोष्टी परत नवीन प्रकारे हळूहळू अंगीकारणे आणि परत पूर्ववत आशादायक जीवनाचा लाभ होणे)तर साडेसातीत आपले अगदी विक्रमादित्या एवढे हाल होत नाहीत पण साधारण त्या चक्रातून शनि महाराज आपल्याला नेऊन आणतातअसे हे शनि महात्म्य,  ज्यांनी अजून वाचले नसेल त्यांनी अवश्य वाचा,  योग्य तो बोध घ्या आणि महाराजांच्या कृपेने वाटचाल करीत रहा तेइदं न मम ! ही भावना ठेऊन( शनी भक्त) ????पौष शु. षष्ठी८/१/२०२२www.kelkaramol.blogspot.comटिप: आता २९ एप्रिल ला शनी कुंभेत गेल्यावर 'धनु ' वाल्यांची साडेसाती संपून 'मीन ' राशीला साडेसाती सुरु होईल. पण जुलै महिन्यात शनि महाराज वक्री होऊन परत मकरेत येतील तेंव्हा परत धनु साठी साडेसाती असेल ती जाने २०२३ पर्यत आणी मग मीन राशीला परत सुरु होईलसाडसाती २०२२ २९ एप्रिल २०२२ पर्यतधनु, मकर, कुंभ२९ एप्रिल ते १२ जुलैमकर, कुंभ, मीन१३ जुलै ते १७ जानेवारी २०२३धनु, मकर, कुंभ  Loading...
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!