शत शब्द कथा - बोलावणे
By bhagwatblog on कथा from https://bhagwatbalshetwar.blogspot.com
देविकाच्या एका डोळ्यात अश्रु आणि दुसर्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिच्या डोळ्या समोरून तिचे आयुष्य झरकन तरळून गेले. तिला वडीलांनी कुठल्याही प्रसंगात ठाम राहायला शिकवले होते. देविका साठी अंतिम निर्णायक स्थिती आलीच होती कारण सहा महिन्या पासून तिच्या वडीलांची तब्बेत खराब होती. डॉक्टरांनी बरेच प्रयत्न करून सुद्धा पदरात काहीच यश पडत नव्हते.