वैकुंठवाटेचा सोबती !!

By manojmgolvankar on from malangwara.blogspot.com

           "अरे वेड्या, कुठे चालला आहेस?" पुन्हा काहि नाहि. "अरे तुला तहान-भुक काहि आहे कि नाहि?" तेहि नाहि. अरे म्ह्टंल "ठरवलसं तरी काय?" पुन्हा तीच शांतता...."बस्स!""पुरे झाले तुझे कौतुक, तु करावे, आणि मी निस्तरावे. तु आणि त्याने माझ्या जिवाशी काय खेळ मांड्लाय?"             तु आजहि माझ्या सांगण्याप्रमाणे वागणार नाहिस काय? तु नेहमीच असा उनाड राहिलास आणि लोकांनी मला उनाड म्ह्ट्ले. तु मला कधी स्वस्थ बसुन दिले नाहिस आणि कधी काहि करुन सुध्धा दिले नाहिस.             पण आता माझा अंत जवळ आला आहे माझा म्र्युत्यु मला आज साद घालत आहे. ह्या वेळी तर म्हणे शत्रु सुध्धा शत्रुत्व विसरतो. मग तु का ???                        तु नेहमी असाच होतास कधी न माझा असताना नेहमी माझ्यातच होतास. हे माझ्या मना आतातरी घटकाभर माझ्यासोबत बस.  ह्या दुनियाभरच्या दगदगीत कधी वेळच मिळाला नाहि, तुझ्या आणि माझ्या ह्या दुरच्या प्रवासात आपण मात्र सोबतच्या खिडकितील प्रवाश्याप्रमाणे अनोळखीच राहिलो. पण आता माझे जग मावळते आहे. आता गोंधळातील शांतता मला एकु येत आहे तु पण ये आणि ऎक. आज आपण बोलुया आज मी हि बोलीन आणि तुझहि ऎकेन, खरतर मला कधी कळले नाहि तुला काय हवे आहे आणि तुला मला काय हवे आहे त्याची फिकीर नव्हती.  पण खरं सांगु ’तुझ्यावर रागवणे मला कधी जमलच नाहि कारण,  तुझ्या शिवाय माझं मन कश्यात रमलच नाहि’           याच कारणहि तसच आहे . तु माझ्या सोबतीला कधी नसतांना सुध्धा तु नेहमीच माझा साथीदार होतास कितीतरी वेळा जेव्हा पुर्ण जगानी माझ्याकडे पाठ फिरवली तेव्हां तु माझी समजुत घातलीस. माझं सर्व सत्य जाणनारा तुच आहेस. तुझ्या इतका जवळचा कोणिच नाहि ना आई, ना बाप ना मित्र ना सोबती. तु माझ्या सोबत जन्माला आलास आणि सोबतच जाणार हे चिरंसत्य मला आता गवसले आहे.मी आता ह्या जगाचा निरोप घेत असताना तुझे सत्य आणि तुझे महत्व मला जगाला सांगायचे आहे. कदाचित यामुळे तरी लोक तुझा द्वेश सोडुन तुला समजुन घेण्याचा प्रयत्न करतील आणि स्वत:चा विकास तुझ्या इच्छांचा आदर करुन करतील.पण भावनेच्या भरात ह्या मनाच्या नको ते लहान लहान हटट पुरवत राहु नका "प्रथम मंद वार्याची झुळुक, आणि त्यानंतरचा झंझावात कितीहि सुखावणारा असला तरीहि त्याचे वाद्ळात रुपांतर झाल्यावर मोठे-मोठे व्रुक्शहि उन्मळुन पडतात"याच प्रमाणे आपल्या मनाच्या प्रथम लहान लहान हटट पुरवणे कितीहि सुखकारक असतील तरी या इछांचे वादळात रुपांतर झाले की मग मात्र त्याची परीणीती विध्वसांत होते.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!