विवाह ज्योतिष आणि ब्रह्मचर्य: वैराग्य योग टाळून लग्न जमवण्यासाठी 'वेळ' कामी येते

By vedicjyotish on from https://vedicjyotishmail.blogspot.com

वेळेचं महत्त्व ओळखून वागाल तरच वैराग्य टाळून विवाहित व्हाल आतापर्यंत लग्न जमण्याचे उपाय व तोडगे याविषयी या ब्लॉगवर खूप चर्चा झालेली आहे. या विषयाशी संबंधित असलेल्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्याच्या हेतूने वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित लेख मी लिहिले आहेत.उदा . १) लग्न का जमत नाही? २) मांगलिक दोष आणि उपाय  ३) कालसर्प दोष आणि उपाय  ४) घटस्फोट दर्शवणारे योग ५) दुसऱ्या संस्कृतीतील व्यक्तीशी लग्नाचा योगआता या साखळीतील हा पुढचा लेख आहे. आणि याचा विषय आहे: विवाह आणि ब्रह्मचर्य किंवा कौमार्य बरेच जातक ईमेल करून याबद्दल अनेक प्रश्न विचारत होते. या विषयाला धरून बरेच गैरसमज आणि शंका लोकांच्या मनात आहेत. त्यामुळे त्याबद्दलच्या विचारल्या गेलेल्या सर्व शंका आपण या लेखात दूर करणार आहोत. विनाकारण उत्कंठा ताणून न ठेवता स्पष्टपणे सांगायचं तर जर तुमचे सगळे उपाय करून झालेले आहेत आणि तरीही तुमचं लग्न झालेलं नसेल तर कदाचित तुमच्या पत्रिकेत वैराग्य योग असू शकतो ज्यामुळे तुम्हाला आयुष्यभर ब्रम्हचर्यजीवन जगावं लागेल. कुठल्या ग्रहांमुळे हा योग निर्माण होतो?मुख्यत्वे करून गुरु आणि केतू. पण काही काही लोकांच्या बाबतीत बाकीचे ग्रहसुद्धा योगकारक ठरू शकतात उदाहरणार्थ शनि, राहू, चंद्र  आणि शुक्र. वैराग्य योग म्हणजे नेमकं काय होतं ?विवाह हा आपल्या सनातन धर्मातील अतिशय पवित्र मानलेल्या गेलेल्या १६ संस्कारापैकी एक महत्त्वाचा संस्कार आहे. त्याचबरोबर अध्यात्मविश्वात ते एक बंधन देखील मानले गेले आहे.   ज्योतिषात गुरु हा धर्मदर्शक ग्रह आहे त्यामुळे तो तुम्हाला धर्मानुसार चालायला सांगतो आणि हे १६ संस्कार पूर्ण करायला सांगतो. पण केतू हा मोक्षकारक ग्रह असल्यामुळे तो तुम्हाला पृथ्वीवरच्या प्रत्येक भौतिक सुखात अडकण्यासापासून परावृत्त करत असतो. म्हणून तुमच्या पत्रिकेत केतू ज्या ग्रहाच्या जवळ असतो त्या ग्रहाचे जे काही चांगले परिणाम तुम्हाला मिळायचे असतात ते तो मिळू देत नाही. मग ते पैसा असो कि आत्मविश्वास. यश, असो कि लग्न. संततिसुख असो कि परदेशगमन. तो अडथळे हे आणतोच आणतो.   लग्नाच्या बाबतीत गुरु हा मुलींसाठी आणि शुक्र हा मुलांसाठी विवाहकारक आहे. हे दोन ग्रह जर केतूच्या युतीत किंवा इतर महत्त्वाच्या कुयोगात असतील तर हळूहळू लग्न करण्याची ईच्छा आणि एकूणच विवाह संस्था यावरच विश्वास उडून जातो. कुठली अंशात्मक कुंडली याबाबत खात्रीशीरपणे मार्गदर्शन करू शकते? दोन अंशात्मक कुंडल्या आहेत. नवमांश(D9) आणि विंशांश(D20).  जन्मकुंडली केवळ आपल्याला आपल्या जन्मवेळी आकाशात ग्रहांची स्थिती कशी होती हे दर्शवते. त्या ग्रहदशेचं  फळ काय मिळणार हे नवमांश कुंडली सांगते. आणि विंशांश कुंडली हि खास अध्यात्मिक प्रगतीसाठी पहातात. त्याचबरोबर पत्रिकेतील १२ वे स्थान सुद्धा ब्रह्मचर्य आणि वैराग्य याविषयी खूप काही सांगून जातं.  माझ्या पत्रिकेत हे असेल तर याचा अर्थ मी आयुष्यभर बिनलग्नाचा/ची राहणार का?इथे वेळ महत्त्वाची आहे. वैराग्यकारक ग्रहाची दशा सुरु होण्याच्या आधी जर माझ्याकडे आलात तर त्या दशेचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून मी प्रतिबंधात्मक उपाय देईन. पण वैराग्यकारक ग्रहाची दशा सुरु असताना माझ्याकडे आलात तर मात्र तुमचं लग्न होणं अवघड आहे.  त्यातून सांगायला उपाय अनेक आहेत. पण पत्रिका पाहिल्याशिवाय ते करू नये कारण, प्रत्येक उपासनेचा आणि उपायाचा आपल्यावर काहीना काही परिणाम होत असतो.  त्यामुळे कधीही कुठलेही उपाय हे पत्रिकेतील ग्रहांच्या स्थानानुसारच करावेत. उगाच कुणीही कुठलेही उपाय करू नयेत. नाहीतर कधी कधी वेगळा त्रास सुरु होण्याची शक्यता असते म्हणजे ज्या देवाची उपासना सुरु केली आहे त्याचं चांगलं फळ मिळण्याऐवजी वाईट अनुभव येतात असं सांगितलेली माणसे माझ्याकडे आहेत. यावर उपाय काय?  घाई न करता हे व्यवस्थित वाचा ...पत्रिकेतील वैराग्याचे योग फळाला येण्याआधी लग्नाचे उपाय करणं हा पहिला आणि सगळ्यात सोपा उपाय आहे .कारण, आतापर्यंत अनेकवेळा मी सांगितलेलं आहे कि ग्रह रोज अवकाशातून आपापल्या मार्गाने मार्गक्रमण करत असतात आणि त्यांचा परिणाम पृथ्वीवर होत असतो. त्यांची गती थांबवणं हे आपल्या हातात नाही. पण त्यांची गती आणि मार्गक्रमणाची दिशा पाहून त्यानुसार उपाय करणं हे आपल्या हातात नक्कीच आहे.तुमच्या पत्रिकेतील ग्रहदशेनुसार, ग्रहांच्या महादशे-अंतर्दशेनुसार आणि ग्रहांच्या भ्रमणानुसार तुम्हाला जर काही गोष्टी आज करायच्या असतील तर तुम्ही त्या आजच्याच तारखेला तातडीने करणं गरजेचं आहे. उद्या किंवा नंतर कधीतरी विचार करून उपयोग नाही.  कारण, आकाशात भ्रमण करत असलेला ग्रह आता या क्षणी नेमक्या कुठल्या राशीत आहे आणि तिथून तो कुठल्या राशीत जाणार आहे. ती रास तुमच्या पत्रिकेत कितव्या स्थानात आहे. त्या राशीत इतर कुठले ग्रह तुमच्या पत्रिकेत ठाण  मांडून बसलेले आहेत. त्यांच्यापैकी कुणाची दशा तुम्हाला आता सुरु आहे. अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे शक्य तितक्या लवकर योग्य वेळ निघून जाण्याच्या आत पत्रिका दाखवून मार्गदर्शन घेणे, हा एकमेव उपाय आहे. हे मार्गदर्शन घ्यावं कि घेऊ नये, त्याचा काही फरक पडेल कि नाही, वगैरे विचार करेपर्यंत जर ग्रहमान बदललं आणि एखादा चांगला योग येऊन गेला तर पुन्हा तसं तुमच्या सोईचं ग्रहमान किती वर्षांनी येईल हे आपण सांगू शकत नाही. कारण ग्रहांची चाल आपल्या हातात नाही. आपल्या हातात आपलं कर्म सुधारणं आहे, ते आपण करावं. आणि शास्त्रकर्त्यांच्या आशीर्वादाने आपला उत्कर्ष करून घ्यावा. तुमच्या शंकांची उत्तरं मिळाली असतील अशी अपेक्षा आहे.  पुढील मार्गदर्शनासाठी इथे ईमेल करा : vedicjyotishmail@gmail.com 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!