वक्री बुध डिसेंबर २०२२ | तुमचं आयुष्य, लग्न , नोकरी व व्यवसाय, नातेसंबंध,राजकारण, यावर याचे काय परिणाम होणार?
By vedicjyotish on धार्मिक from https://vedicjyotishmail.blogspot.com
वक्री बुध: पश्चाताप, चुकीचे निर्णय आणि अपेक्षाभंग. नवीन वर्षात या सगळ्यापासून कसे वाचाल?ग्रहांचे वक्री होण्याचे काळ बऱ्याचदा मानसिक तणाव वाढवणारे असतात. कारण ते वेगवेगळी आव्हानं घेऊन येतात. कधी छोटी, तर कधी मोठी. आता येणारा वक्री बुधाचा काळ आपल्यासाठी कुठली आव्हानं घेऊन येतो आहे, आणि त्यापासून स्वतःला कसं सुरक्षित आणि आनंदी ठेवायचं ते पाहूयात.येत्या २९ डिसेंबरला बुध वक्री होणार आहे. तो पुढच्या वर्षी जानेवारी महिन्याच्या १९ तारखेपर्यंत वक्री असणार आहे. म्हणजे एकूण ३ आठवडे तो वक्री असेल. पुढच्या ३ आठवड्याचे तुमचे कार्यक्रम काय आहेत? लग्नाची बोलणी करणार आहात? साखरपुडा करणार आहात? थेट लग्न करणार आहात? कि उलट घटस्फोट घेण्याच्या विचारात आहात? नवीन नोकरीसाठी चालू नोकरी सोडणार आहात? शेअर्स मध्ये केलेल्या गुंतवणुकीविषयी चिंतेत आहात? नवीन गुंतवणूक करणार आहात? सहकुटुंब कुठे बाहेर सहलीला/फिरायला जाणार आहात? किंवा एखादी व्यावसायिक सहल वगैरे? काही आरोग्याच्या तक्रारी आहेत? चला बघूया वक्री बुध या सगळ्या गोष्टींवर कशाप्रकारे प्रभाव टाकणार आहे... वक्री बुध : सर्वसाधारण परिणाम बुध म्हणजे संभाषण, संवाद, प्रवास, दळणवळण, अर्थकारण, टेलिफोन, तंत्रज्ञान, तर्कशुद्ध विचार करण्याची पात्रता, तृतीयपंथी व्यक्ती, कॉर्पोरेट क्षेत्र, पत्रकारिता, इत्यादी. त्यामुळे जेव्हा जेव्हा बुध वक्री होतो तेव्हा या सगळ्या गोष्टींशी संबंधित समस्या किंवा आव्हानं तो उभी करतो. या काळात विसंवाद आणि गैरसमज हे खूप होतील. विशेष करून २ जानेवारी पासून ते १४ जानेवारी पर्यंत कारण त्या काळात बुध हा एस्टँगत सुद्धा असणार आहे. म्हणजे आधीच तो वक्री आणि त्यातून अस्ताला गेलेला. हा असा तापट बुध अनुभवायला मिळणार आहे. हा काळ आत्मपरीक्षण करण्याचा आहे. आजवर घेतलेले निर्णय, हातून घडलेली कृत्यं, ठरवलेली ध्येयं-धोरणं, स्वप्नं-महत्त्वाकांक्षा, वगैरे गोष्टींचा व्यवस्थित विचार करावा. काय चूक काय बरोबर. काय खरंच गरजेचं आहे, आणि काय नाही हे ठरवावं. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन खात्री करून यावी असं वाटतंय तिथे प्रत्यक्ष जाऊन यावं. सह्या केलेली कागदपत्रे पुन्हा एकदा नीट तपासून घ्यावीत, कुठे काही राहिलं तर नाही ना, हे पहावं. तसेच, आपले काका-मामा, काकू-मावश्या या लोकांशी गैरसमजामुळे वाद होऊ शकतील. त्यामुळे जमिनीचे किंवा इतर महत्त्वाचे व्यवहार/महत्त्वाची बोलणी या काळात करू नका. तुम्हाला जर त्यांच्याशी चांगले संबंध टिकवून ठेवायचे असतील तर गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. दिसतं तसं नसतं. त्यामुळे डोळ्यांनी काही पाहिलं, तरी विचारून, चौकशी करून खातरजमा करून घ्यावी. मगच विश्वास ठेवावा. लग्नाची बोलणी करायची असो किंवा किंवा घटस्फोट घेऊन वेगळं व्हायचं असो. नवीन नोकरीसाठी अर्ज करायचा असो, चालू नोकरी सोडायची असो किंवा व्यवसायविषयक काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असो, कुठल्याही बाबतीत अंतिम निर्णय या काळात घेऊ नका. चर्चेला वाव असू द्या. व हा काळ संपल्यावर पुन्हा बोलणी कराल तेव्हा अंतिम निर्णय घ्या.याच गोष्टींसाठी मार्गदर्शन घ्यायला लोक जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा त्यांची पत्रिका आणि त्यांनी सांगितलेल्या तारखा बघितल्यावर हेच दिसून येतं कि त्यांनी घेतलेले चुकीचे निर्णय, अपेक्षाभंग व पश्चाताप होणाऱ्या गोष्टी नेमक्या याच काळात घडून गेलेल्या असतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर या काळात असे महत्त्वाचे निर्णय घ्याल तर नंतर पश्चाताप करत बसावं लागेल. त्यापेक्षा सरळ निर्णय पुढे ढकला. केवळ ३ आठवड्याचाच तर प्रश्न आहे. वक्री बुध : आरोग्य ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून आरोग्य ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर बुध हा आपल्या आवाज, घसा, थायरॉईड, त्वचा, इत्यादींचा कारक आहे. त्यामुळे या काळात या गोष्टींशी निगडित त्रास होऊ शकतात. त्यामुळे त्यादृष्टीने आधीपासूनच काळजी घ्या. खूप थंड किंवा खूप गरम खाऊ नका. जास्त मसालेदार व तळलेले पदार्थ खाऊ नका. कारण त्वचेचे जे काही विकार होतात ते यामुळे होतात. या आधी होऊन गेलेल्या वक्री बुधाच्या काळात कितीतरी लोकांना अंगावर चट्टे व त्वचेवर काहींना काही डाग, वगैरे आल्याचे अनेकांनी कळवलं. यावेळी सुद्धा तसं होऊ शकेल. म्हणून त्यासाठी आधीच काळजी घ्या. घराबाहेर जाताना अंगाला आवश्यक ते सनस्क्रीन लोशन, मॉइश्चरायसार, वगैरे लावून बाहेर पडा. तोंडावर मास्क लावा. डोक्यावर टोपी घाला. डोक्यात कोंडा होऊ नये म्हणून शिकेकाई सारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करा. हानिकारक रासायनिक द्रव्यांपासून सावध राहा. त्वचा विकार होण्यासाठी अजून एक कारण म्हणजे मानसिक तणाव. त्यामुळे योग्य ती योगासने व प्राणायाम नियमितपणे करत जा. अर्थातच वर दिलेल्या गोष्टी या तुमच्यापैकी प्रत्येकाला होणार नाही आहेत. प्रत्येकाच्या पत्रिकेतील बुधाची स्थिती कशी आहे त्यानुसार तुम्हाला कमी-जास्त प्रमाणात या काळाची फळे मिळतील. दुहेरी संकट: मंगळ सुद्धा वक्री आहे मंगळ हा सुद्धा ३१ ऑक्टोबर २०२२ पासून ते १३ जानेवारी २०२३ पर्यंत वक्री आहे. म्हणजे ज्यावेळी बुध वक्री होईल त्यावेळी आपल्याला एकाच वेळी या दोन वक्री ग्रहांचे परिणाम अनुभवायला लागणार आहेत. मंगळ म्हणजे संताप, राग, हिंसा, युद्ध, अपघात, आग, दंगली, भावनिक उद्रेक, संरक्षण खाती, पोलीस, इत्यादी. म्हणजे या काळात आपल्याला कदाचित गैरसमजुतीमुळे निर्माण झालेले प्रश्न हिंसक वळण घेताना दिसतील. कदाचित दंगली, हिंसक मोर्चे, वगैरे. राजकारणी, समाजकारणी व ज्यांचा समाजावर प्रभाव आहे अशा इतर प्रसिद्ध व्यक्तींनी या काळात कुठलेही वक्तव्य करताना नेहमीपेक्षा जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच, त्यांचे फोने सुद्धा टेप केले जाऊ शकतात. व गुप्त संभाषण, काही व्हिडीओ, व इतर खाजगी माहिती अचानक उघड होऊ शकते. तृतीयपंथी व्यक्तींशी संबंधित गोष्टी मुख्य प्रवाहात दिसू शकतात. त्यांच्या हक्कासंदर्भात वाद किंवा कुणी तृतीयपंथी व्यक्ती संबंधित वाद, अपघात, इत्यादी गोष्टी. त्यादृष्टीने त्यांनी काळजी घ्यावी. तांत्रिक बिघाडामुळे होणारे मोठे अपघात, स्कँडल, वगैरे घडू शकतात. विशेषतः टेलिफोन, फायनान्स, कॉस्मेटिक्स, मीडिया, या क्षेत्रात. समाज माध्यमे, सॉफ्टवेअर, मोबाईल ऍप, सारख्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासमोर सुद्धा आव्हान उभे राहील, एखादी तांत्रिक अडचण खूप महागात पडू शकेल. सॉफ्टवेअर अपडेट्स, माहिती उघड होणे, डेटा लीक, होणे, यासारख्या गोष्टींचा त्रास त्यांना अनुभवावा लागेल. त्याबाबतीत योग्य ती आगाऊ काळजी घ्यावी. याच आय. टी. क्षेत्रासंबंधीत कंपन्यांचे शेअर्स चे भाव एकतर खूप खाली जातील किंवा गगनाला भिडतील. नक्की काय होईल हे कंपनीची कुंडली व तिच्या CEO ची कुंडली यावर अवलंबून आहे. वक्री बुध २०२२ च्या तारखा १४ जानेवारी ते ४ फेब्रुवारी १० मे ते ३ जून १० सप्टेंबर ते २ ऑकटोबर २९ डिसेंबर ते १९ जानेवारी महत्त्वाची टीप : वर दिलेल्या वक्री बुधाच्या २०२२ च्या तारखा पहा. आणि आठवून बघा कि या काळात तुम्ही काय काय केलंत, आणि तो काळ संपल्यावर त्या त्या गोष्टींचा तुम्हाला पश्चाताप, मनस्ताप, अपेक्षाभंग वगैरे काय काय अनुभव आले? त्यानुसार त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा बुध वक्री होईल तेव्हा तेव्हा ताशा प्रकारचे निर्णय घेऊ नका व त्या गोष्टी करू नका. वक्री बुध २०२३ च्या तारखा २९ डिसेंबर ते १९ जानेवारी २१ एप्रिल ते १५ मे २४ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर १३ डिसेंबर ते २ जानेवारी वक्री बुध उपाय/दक्षता :आता तुम्हाला कल्पना आलेली आहे कि हा वक्री बुधाचा काळ कशाप्रकारे आव्हानात्मक असतो ते. आणि तो दरवर्षी ३-४ वेळा येत असतो. त्यामुळे त्याला टाळून आपण जगू शकत नाही. तर त्याला अनुसरून जगण्यासाठी काय उपाय करावेत किंवा कुठल्या प्रकारच्या दक्षता घ्याव्यात ते पाहूयात कुठल्याही प्रकारची संवाद व माहिती प्रसारण संबंधी उपकरणे विकत घेऊ नका. उदा. लॅपटॉप. कॉम्युटर, मोबाईल फोन, इत्यादी. नवीन घर व नवीन वाहने विकत घेऊ नये. नव्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करू नये. कुठल्याही सरकारी कार्यालयाला किंवा राजकीय व्यक्तीला या काळात कामासाठी भेट देऊ नये. दिल्यास काम रेंगाळेल. नवीन नोकरीसाठी अर्ज करू नये. चालू नोकरी सोडू नये. नवा उद्योगधंदा/व्यवसाय सुरु करू नये. कुणाला लग्नासाठी मागणी घालू नये. कुणी लग्नासाठी मागणी घातल्यास 'होकार' देऊ नये. बोलणी ३ आठवड्यासाठी पुढे ढकलावी. महत्त्वाचे करार, कागदपत्रे करू नये. जमीन किंवा भाडेकरार, किंवा विवाह प्रमाणपत्र, वेब होस्टिंग, डोमेन रजिस्ट्रेशन, इत्यादी करू नये. जरी बुध १९ जानेवारीला मार्गी होत असला, तरी साधारण ८ फेब्रुवारीपर्यंत त्याचा परिणाम राहील. कारण त्याचा छायाकाळ तेव्हा संपेल. त्यामुळे त्यांनतर महत्त्वाचे निर्णय बिनधास्तपणे घेऊ शकता. सामान्य ज्ञान (कॉमन सेन्स) आठवणीने वापरावे वर दिलेल्या उपाय व दक्षता याचे पालन करताना कॉमन सेन्स नक्की वापरावा. यावर आंधळेपणे विश्वास ठेवून महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. कारण या सर्वसाधारण गोष्टी आहेत ज्या तुम्हाला व मला प्रत्येकाला लागू आहेत. पण आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टीबद्दल नेमके काय परिणाम मिळतील हे बुध ग्रह तुमच्या कुंडलीत कुठल्या स्थानात बसला आहे, कुठल्या राशीत आहे, नक्षत्रात आहे, याचा अभ्यास करून पाहावे लागेल. उदा. तुम्हाला जर नवीन घर घ्यायचे असेल किंवा गाडी घ्यायची असेल तर तुम्ही त्यासाठी ३ आठवडे सहज थांबू शकता. पण हेच तुम्हाला एखाद्या ठकाणी प्रवास करणे गरजेचे असेल व ते टाळणे शक्य नसेल तर तो प्रवास नक्की करा. फक्त प्रवासात प्रत्येक लहान-सहान गोष्टीची नेहमीपेक्षा थोडी जास्त काळजी घ्या. सगळी कागदपत्र, तिकीट, जास्तीचे पैसे, गरजेच्या वस्तू, जवळच्या लोकांचे फोन नंबर्स ,वगैरे सगळ्या गोष्टी तपासून बघा. गाडीची वेळ व पुढची पूर्ण व्यवस्था ,परत परत योग्य आहे याची खातरजमा करून घेत चला. म्हणजे एक तर त्रास होणार नाही आणि झालाच तर अपेक्षेपेक्षा कमी होईल. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनेबद्दल काही मार्गदर्शन घ्यायचे असेल तर इथे संपर्क करा. शनिविषयक माहिती : शनि महाराज १८ जानेवारीला मकर राशीतून त्यांच्या स्वतः च्या मालकीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. आणि तिथे ते २.५ वर्षे असतील. त्याविषयीचे मार्गदर्शन सुद्धा सुरु झाले आहे. आपल्याला आपल्यासाठी किंवा आपल्या कुटुंबियांसाठी ते मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.