लघुकथा संग्रह क्र.१०

By jyubedatamboli on from https://jyubedatamboli.blogspot.com

      मराठी लघुकथा संग्रह क्र.१०✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळीलघुकथा क्रमांक - ४६ - पत्र वाचून दाखवा सरमाजी नगरसेवक शरद देसाई यांच्या मुलीचे ज्योतीचे लग्न थाटामाटात झाले. लग्नाला ज्योतीच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक पवार सर यांनाही निमंत्रण होते कारण ते देसाई यांचे जवळचे स्नेही होते. लग्नानंतर देसाई यांनी पवार सरांची ओळख जावयांना करून दिली, 'हे ज्योतीचे शिक्षक पवार सर. आदर्श शिक्षक म्हणून यांचे पंचक्रोशीत नांव आहे". ही घटना आहे तीस वर्षापूर्वीची. त्यावेळी फोन, मोबाईल नव्हते. संपर्कासाठी पत्र हेच एकमेव साधन होते. योगायोगाने ज्योती व तिचे पती पवार सर रहात असलेल्या काॅलनीत रहायला आले. ज्योती त्यावेळी डिलिव्हरी साठी माहेरी गेली होती. ज्योती दिसायला सुंदर होती पण अभ्यासात मंद होती. त्यामुळे सातवी पास झाली तरी तिला फारसं लिहायला वाचायला येत नव्हते. पेपरमध्ये तिने लिहिलेला एकही शब्द वाचता येत नसे. पेपर पूर्ण लिहिलेला मात्र असे. त्यामुळे अशीच ढकलत ती दहावीपर्यंत गेली होती. एक दिवस ज्योतीचे पती पवार सरांकडे आले व म्हणाले, "तुम्ही ज्योतीचे शिक्षक ना, ज्योतीने मला लिहिलेले पत्र मला जरा वाचून दाखवा.  पवार सरांना मेल्याहून मेल्यासारखे झाले".लघुकथा क्रमांक - ४७ - हा दुसरा फोटो कुणाचा?२ऑक्टोबरला शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी ऑफिसमध्ये सर्व शिक्षण मंडळ सदस्यांची मिटींग आयोजित केली होती. या निमित्ताने सर्व सदस्य हजर राहतील व या दोन थोर विभूतींच्या प्रतिमेचे पूजन सर्वांच्या उपस्थितीत पार  पडेल हा त्यामागील हेतू होता. सकाळी आठ वाजता सर्वांना हजर रहायचे होते. नियोजनाप्रमाणे सर्वजण हजर झाले. प्रतिमा पूजन झाले. एक सदस्य साडेआठनंतर हजर झाले. प्रतिमेला वंदन करतांना त्यांना दोन प्रतिमा दिसल्या. त्यांनी शिपायाला विचारले, "अरे हा दुसरा फोटो कुणाचा?" शिपाई म्हणाला, "हा फोटो भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांचा आहे. सर्वजण मनात म्हणाले, "आता हे महाशय शिक्षणाचा प्रसार, विकास व उद्धार नक्की करणार!"लघुकथा क्रमांक - ४८ -  आधुनिक शामएका वर्गात मॅडम् 'शामची आई' या पुस्तकातील एक प्रसंग सांगतात. एक हरिजन समाजातील वृद्ध स्त्री जळणाचा बिंडा समोर ठेवून उभी असते. बिंडा डोक्यावर उचलून घेण्यासाठी तिला मदत हवी असते. ती प्रत्येकाला मदतीसाठी विनंती करत असते पण सगळेजण तिच्याकडे दुर्लक्ष करून निघून जात असतात. बारा-तेरा वर्षाच्या शामने कसलाही विचार न करता त्या आजीबाईना बिंडा उचलायला मदत केली. घरी गेल्यावर सर्वजण रागावणार की तू त्या हरिजन स्त्रिला मदत का केलीस म्हणून. हे शामला माहित असूनही त्याने हे धाडस केले. मॅडमनी  शरदला विचारले, "शरद , तू अशा प्रसंगी काय केलं असतं, अशी मदत केली असती का?" शरद म्हणाला, "मॅडम्, मी पटकन् आमच्या टेंपोवाल्या काकांना फोन केला असता. ते टेंपो घेऊन आले असते. बिंडा टेंपोत टाकून, आजीबाईनाही टेंपोत बसवून तिच्या घरी पोहचवल असतं. शामने अर्धवट मदत केली. मी संपूर्ण मदत केली असती मॅडम्". यावर मॅडम् काय बोलू शकतात? लघुकथा क्रमांक - ४९ - टाॅमी, शेरू आणि मोत्यादोन मैत्रिणी सपना व अरूणा मंडईत अचानकपणे भेटतात. हाय, हॅलो झाल्यावर सपना म्हणते, "अरुणा, तुझी साडी छान आहे गं."अरुणा: माझ्या भावाने घेतलीय भाऊबीजेला. सात हजाराची आहे पण आमच्या टाॅमीला अजिबात आवडली नाही ही साडी.सपना: काय गं! कुत्र्याची आवड पण लक्षात घेतेस का साडी नेसतांना?अरूणा: अगं, टाॅमी हे माझ्या मिस्टरांना म्हणते मी. लाडानं, तसं त्यांना सर्वजण टायगर म्हणतात.सपना: म्हणजे माझ्यासारखंच की, आमच्या यांना सगळे शेरखान म्हणतात पण मी लाडानं शेरूच म्हणते.इतका वेळ या दोघींचा संवाद ऐकत असलेली भाजीवाली म्हणाली, "मी पण आमच्या मोतीरामना मोत्याच म्हणते."लघुकथा क्रमांक - ५० - थांबा चहा करते शिक्षिका असलेल्या सुरेखा शनिवारी सकाळची शाळा साडेअकराला सुटल्यानंतर सात कि. मी. अंतरावरील गावात बँकेच्या कामासाठी निघाल्या. त्यांच्यासोबत शेती अधिकारी असलेले पतीराज होते. बँकेत गेल्यावर समजले की त्यांचे काम चेअरमन आल्यानंतरच होणार आहे. ते दोन अडीच तासांनी बँकेत येतील. कदाचित लवकर पण येतील. पती म्हणाले, "जा ये करण्यापेक्षा इथे जवळच माझे परममित्र शिंदेसाहेब राहतात. बरेच दिवस झाले त्यांची भेट नाही. ते वारंवार घरी येण्याचा आग्रह करतात, तेंव्हा थोडावेळ जाऊ त्यांच्याकडे. बँकेतून फोन आला की निघू तिथून. त्यांच्या घरी गेल्याबरोबर पाण्याचे ग्लास आले. दोघा मित्रांच्या जुन्या गप्पा सुरु झाल्या. सुरेखा मॅडम् ही त्यांच्या मॅडमशी गप्पा मारण्यासाठी किचनमध्ये गेल्या. एक तास संपला. चहाचं नावंच निघेना. तासानंतर शिंदेसाहेबांनी एकदा आत येऊन चहाचं बघा असं सांगितलं पण मॅडमनी सोईस्करपणे दुर्लक्ष केले. सुरेखाच्या पोटात कावळे ओरडू लागले. कारण सकाळपासून चहाच्या एका कपाशिवाय त्यांच्या पोटात कांहीच नव्हते. दुपारचे दीड वाजून गेले होते. पावणेदोन वाजता मॅडम् उठल्या. गॅसजवळ गेल्या. सुरेखाला थोडं हायसं वाटलं पण मॅडमनी दूध गरम करून मांजराच्या थाळीत ओतलं तेवढ्यात बँकेतून फोन आला. मॅडम् म्हणाल्या, "थांबा ना चहा करते"
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!