रंग पसरलेले

By Rupali_Thombare on from umatlemani.blogspot.com

पावसाळा सरत  जातो आणि सर्वपितरी अमावस्येनंतर पावसाचा जोर जरा कमी होऊ लागतो. पाऊस जातो जातो म्हणतो पण तरी त्याची अचानक अशी न सांगता असणारी हजेरी टाळता येत नाही. तो तेव्हाही येतोच पण फक्त भेटण्यासाठी.याच काळात गणपतीनंतर नवरात्रीचे वेध सर्वाना लागलेले असते.देवी हे एक स्त्रीचेच रूप आणि नवरात्र हा देखील प्रामुख्याने स्त्रियांचा सण. अनेकांचे व्रत-उपास असतात. घटस्थापना तर असतेच पण विशेष आवडीचा भाग असतो तो रासगरबा आणि दांडीयाचा. असा हा नऊ दिवसांचा सण म्हणजे देवी आगमनासोबत येणारा उत्साह , आनंद आणि जल्लोष असतो.फक्त गृहिणीच नव्हे तर ऑफिसला जाणाऱ्यांसाठी सुद्धा हे नऊ दिवस म्हणजे फार विशेष असतात. नवरात्री सुरु होण्यापूर्वीच काही दिवसांपासून या नऊ दिवसांचे नऊ रंग सगळीकडे पसरू लागतात. मग अगदी साधी असो वा अगदी मॉडर्न, सर्वच जणी अगदी उत्साहाने या रंगांच्या उत्सवात सहभागी होतात. खाजगी पेक्षा सरकारी कार्यालयांमध्ये या उत्सवाचे मोठे स्वरूप पाहावयास मिळते. रेल्वे स्थानके , बसेस अशा गजबजलेल्या ठिकाणी तर त्या दिवसाच्या एका विशिष्ट रंगाचे सडेच्या सडे जागोजागी विखुरलेले असतात.गेला आठवडा भरपूर पाऊस होता. त्यामागे नवरात्र आली आणि नवरात्रीच्या देवीचा पहिला रंग होता पिवळा. काल सगळीकडे पिवळ्या पेहरावांमुळे मुंबईतसुद्धा जेजुरीचे दर्शन घडत होते. आणि आज पाठोपाठ आलेल्या हिरव्या रंगामुळे सगळीकडे हिरवळीचे साम्राज्य पसरल्याचे भास होते. त्यावरूनच सुचलेले काही काव्यरूपात मांडलेले शब्द आणि त्यां शब्दांना प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव सरांनी कागदावर मांडून आज धन्य केले.- रुपाली ठोंबरे /*********************************************** * Disable Text Selection script- © Dynamic Drive DHTML code library (www.dynamicdrive.com) * This notice MUST stay intact for legal use * Visit Dynamic Drive at http://www.dynamicdrive.com/ for full source code ***********************************************/ function disableSelection(target){ if (typeof target.onselectstart!="undefined") //IE route target.onselectstart=function(){return false} else if (typeof target.style.MozUserSelect!="undefined") //Firefox route target.style.MozUserSelect="none" else //All other route (ie: Opera) target.onmousedown=function(){return false} target.style.cursor = "default" } //Sample usages //disableSelection(document.body) //Disable text selection on entire body //disableSelection(document.getElementById("mydiv")) //Disable text selection on element with id="mydiv" disableSelection(document.body) //disable text selection on entire body of page
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!