मुंबईत जपानची सैर

By Rupali_Thombare on from umatlemani.blogspot.com

जगात अनेक देश आहेत... प्रत्येकाची वेगळी भाषा, वेगळी संस्कृती. त्यांपैकी जपानच्या संस्कृती बद्दल नेहमीच एक वेगळेच आकर्षण असायचे. आणि योगायोगाने ही जॅपनीज संस्कृती अनुभवण्याची संधी २ दिवसांपूर्वीच मला मिळाली . एका मैत्रिणीकडून के जे सोमय्या या महाविद्यालयात 'टीचर्स असोसिएशन ऑफ जॅपनीज' च्या वतीने आयोजित केलेल्या 'जॅपनीज कल्चर सेमिनार' बद्दल माहिती मिळाली आणि आम्ही तिथे जाण्याचा निर्णय घेतला. १८ सप्टेंबर ला सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत सुरु असलेल्या या कार्यक्रमात आम्ही दुपारी १ पर्यंत पोहोचलो. तिथे पोहोचताच एक वेगळीच लगबग सुरु होती. एकूण २ मजल्यांवरील विविध वर्गांत वेगवेगळ्या कार्यशाळा सुरु होत्या. सर्वप्रथम आम्ही कॅलिग्राफीच्या कार्यशाळेत प्रवेश केला. तिथे जॅपनीज कॅलिग्राफर हरूना तिच्या टीम सोबत सर्वांना जॅपनीज अक्षरांची ओळख करून देत होती. त्यांचा विशिष्ट हॅन्सी पेपर , ब्रशेस , शाई आणि विशिष्ट स्ट्रोक्स च्या साहाय्याने अक्षरे निर्माण करणारी ती कला... सारेच खूप आनंददायी होते. आम्ही सुद्धा काही अक्षरे त्याच पद्धतीने कागदावर उमटवण्याचा सफल प्रयोग केला. या सर्वात त्यांच्याशी बोलताना प्रामुख्याने जाणवला तो म्हणजे त्यांचा बोलण्यातला नम्रपणा. त्यांची संस्कृती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक सफल प्रयत्न. हिरगाना, कटकाना किंवा कांजी असो ... आम्हाला अक्षरे फारशी कळत नव्हती परंतू तरीही ती निर्माण करताना खूप मजा आली. त्यानंतर आसपास सुरु असलेल्या ओरिगामी, इकेबाना , कॉई मेकिंग , कोकेशि डॉल्स, युकाता वेष परिधान , वागाशी , कराओके अशा विविध कार्यशाळांना भेट दिली . प्रत्येक ठिकाणी अगदी आनंदाने तो तो विशिष्ट प्रकार शिकवला जात होता. की-चैन आणि चॉपस्टिक्सवर आपल्या मनाने हवे तसे नक्षीकाम करण्यासाठी रंग उपलब्ध होते. त्याचप्रमाणे , कोकेशि डॉल्स च्या कार्यशाळेतसुद्धा योग्य मार्गदर्शनाखाली सुंदर वेष परिधान करणारे जॅपनीज बाहुल्या बनवण्यात खूप मज्जा आली. कॅलिग्राफी प्रमाणेच मला विशेष आवडलेली आणखी एक कार्यशाळा म्हणजे इकेबाना. मुळातच मला फुले आवडतात. त्यामुळे त्यांच्या विशिष्ट रचना करण्यात , त्यांबद्दल माहिती समजून घेण्यात समाधान वाटत होते. आजपर्यंत जॅपनीज प्रसिद्ध खाद्यप्रकार 'सुशी' हा फक्त ऐकून माहित होता . पण इथे तो कसा करतात ते पाहून तो खाण्याचा अनुभव सुंदर होता. रविवारची सुट्टी अशाप्रकारे मार्गी लावल्याचे समाधान आमच्या चेहऱ्यावर होते . काहीतरी नवीन अनुभवण्याची मजा काही औरच . हे सर्व पाहिल्यानंतर सहज एक विचार मनात येऊन गेला . चीन आणि जपान प्रमाणेच आपली भारतीय संस्कृती सुद्धा कितीतरी समृद्ध आहे.येथे प्रत्येक प्रांताचे वेगळे असे वैशिष्ट्य , भाषा , पेहराव, लिपी , कला, खाद्यसंस्कृती, इतिहास आणि नावीन्य आहे. मनात आणून कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्यास अशाप्रकारे किती काही करू शकणार. आपल्या संस्कृतीची ओळख जगभरात करून देण्यासारखे महत्त्वपूर्ण काम करणे हे देखील आपल्या देशाबद्दल आपल्या मनातील राष्ट्रप्रेम दर्शविण्याचा एक भाव आहे . विचार करा अनेक जमाती ज्या आजच्या युगात चाचपडत आहेत पण त्यांच्याकडे आपल्या इतिहाचा एक विशिष्ट वारसा आहे त्या सर्वाना एक रोजगार उपलब्ध होईल. आणि असे कार्यक्रम केवळ जगातील  इतर देशांतच नव्हे तर इथे देखील करण्याची आज  गरज आहे. पाश्चात्य संस्कृतीला कवटाळू पाहणारी आपली नवी पिढी आपल्याच संस्कृतीच्या काही विशिष्ट पैलूंपासून वंचित राहू नये हा या मागचा एक उद्देश. जशी आज मी मुंबईत जपानची सैर अनुभवली त्याचप्रकारे भारताची सैरसुद्धा सर्वांना अनुभवता यावी . - रुपाली ठोंबरे 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!