मीन राशीत गुरु-शुक्र युती
By amolkelkar on धार्मिक from kelkaramol.blogspot.com
तेजस्वी नृपतिप्रियोSतिमतिमान् शूर:सशुक्रे गुरौ!अगदी सध्याची जी राजकीय धुमश्चक्री चाललीय तेच उदाहरण घेऊ. दोन लोकप्रिय नेते, जनमानसात प्रसिद्ध, कर्तबगार, कर्तृत्ववान वगैरे वगैरेपण एकमेकांचे शत्रू. एकाचा विधानसभेचा मतदारसंघ हक्काचा,दुसरा मात्र लोकसभेला पहिल्याच्याच मतदारसंघातून जास्त मताधिक्य घेणारा. थोडक्यात 'तुझं माझं जमेना परी तुझ्यावाचून करमेना' असं काहीसं(लांब कशाला जायचं, मुंबई, ठाण्यात जरा हुडकलंत तर सहज कळून येईल)मीन राशीत होणा-या गुरु-शुक्र ग्रहांच्या युतीचे वर्णन हे असेच करता येईल. हे दोन्ही ग्रह सात्विक ग्रह किंवा शुभ ग्रह.पण एकमेकांशी न पटणारे. एकमेकांमधील शत्रूत्वाचा विचार केला तर गुरु शुक्राला आपला शत्रू मानतो पण शुक्र गुरूला अगदी शत्रू नाही पण मित्र ही नाही कारण त्याच्याकडून ( मतदारसंघातून) फायदा होत असेल तर कुणाला नको? म्हणूनच गुरुच्या मीन राशीत शुक्र उच्चीचा असतो.शास्त्रात मीन- तुळ आणि वृषभ- धनू या गुरु शुक्राच्या राशीत षडाष्टक ( मृत्यू) योग होतो म्हणून ही ते एकमेकांचे मित्र नाहीत. पत्रिका मीलनात याचा अवश्य विचार होतोअनेक बुध्दिजीवींच्या पत्रिकेत गुरू-शुक्र युती आढळते ..उदा. आचार्य अत्रे,महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, श्री.ल.र.पांगारकर,ह.भ.पं धुंडामहाराज देगलूकर, वासुदेव शिवराम कोल्हटकर, स्वामी रामतीर्थ, जे.कृष्णमूर्ती, श्री व्ही शांतारामविद्यया भवति पंडित: सदा पंडितैरपि करोति विवादम् |पुत्रमित्रधनसौख्य संयुतो मानव: सुरगुरौ भृगुयुक्तै ||अशी ही देव आणि दैत्यांच्या गुरुंची अंशात्मक युती २ मार्च ला रेवती नक्षत्र चरण १ म्हणजेच गुरुच्या मीन राशीतील गुरुच्याच धनू नवमांशात पहायला मिळेल.( गुरुच्या राशीत शुक्र असलेला,अभ्यासू )अमोल ???? Loading...