माननीय डॉ जयंत नारळीकरांना पत्र

By gmjyotish on from https://gmjyotish.blogspot.com

 माननीय डॉ जयंत नारळीकर सर, तुमच्या बदललेल्या दृष्टिकोन चांगला आहे. पण तुम्ही फक्त समाज विज्ञान वादी नाही असे मानत आहात.दुसरी बाजु सर्व ज्योतिषी फक्त andriod application नाही तर ज्योतिषशास्र विषयक सॉफ़्ट्वेअरचा वापर करून कमीत कमी वेळात अचुक जन्मकुंडली तयार करून भविष्य कथनामधे अचुकते कडै जाण्याचा प्रयत्न करत आहेत.हा ज्योतिषी लोकांचा प्रचलित विज्ञानाचा वापर करण्याचा दृष्टिकोन तुम्हाला उल्लेखनीय का वाटत नाही याबद्दल बोललात तर आनंद होईल.बाकी संधी मिळताच आपण आपला जुना दृष्टिकोन उगाळून ज्योतिष हे शास्त्र नाही म्हणला नाहीत हे फार बरे झाले.तसेही तुमच्या सारख्या मान्यवर पण मुठभर विज्ञान वादी आणि स्वतः ला बुध्दी नसलेले अनेक तथाकथित बुध्दीवादी यांच्या मताला कुणी फारसे विचारत नाही हे आता जाणवले असेल.मधल्या काळात नागपुरच्या कालीदास विद्यापिठाने ज्योतिषशास्र विषयावर अभ्यासक्रम तयार करून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार केले आहेत. यात विद्यार्थी येत आहेत आणि शिकत आहेत.महाराष्ट्र ज्योतिष परिषद ही संस्था गेले अनेक वर्षे विद्यापीठाच्या तोडीचे काम महाराष्ट्रात ज्योतिषशास्त्री परिक्षा घेऊन करत आहे.या सोबत जोडलेल्या बातमी प्रमाणे समाज ज्योतिष सल्ला घेणार कारण मानवी बुध्दीला अगम्य असलेल्या कर्माच्या सिध्दांताचा मागोवा घेत जन्मकुंडली माध्यमातुन ज्या विषयावर मॉडर्न सायन्स जीवनातल्या अनिश्चित गोष्टीबाबत मार्गदर्शन करू शकणार नाही तिथे ज्योतिषशास्र नक्कीच मानवाला दिलासा देते.याची खात्री समाजाला आहे म्हणुनच ते आपला वेळ व पैसा खर्च करून ज्योतिष विषयावर सल्ला घेतात.तुम्ही लिहले असतील त्या पेक्षा संख्येने जास्त ग्रंथ माननीय व.दा. भट सरांनी लिहले आहेत आणि त्याच्या अनेक आवृत्ती उपयुक्ततेची साक्ष देत आहेत.माननीय भट सर बीएस सी आहेत ही बाब विसरून चालणार नाही.तुम्ही लिहलेल्या विज्ञान कथा या साहित्य प्रकार मानला तर माननीय व.दा. भट सरांना पुस्तकांची संख्या व आवृत्त्या पहाता, या आधीच हा मान मिळायला हवा होता.इथेच हा प्रकार संपत नाही. घटनेने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारून अंधाश्रध्दा विषयावर बोलणारे काही महाभाग पंचांग जाळू अश्या धमक्या काही वर्षांपुर्वी देत होते.इथे विज्ञान सोडा, समाजशास्त्र आणि नागरिकशास्त्र यांचा अभ्यास नसलेले मराठी तथाकथित विद्वान एकेकाळी प्रबोधन करत होते. ही त्या काळातली शोकांतीकाच म्हणावी लागेल.असो, असे काळे कोळसे अनेक आहेत. त्यांना समाज कृतीने उत्तर देत आहे.आपली निवड साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी झाली यात आनंद आहे. पण तुम्ही पहिल्याच वक्तव्यात जे केले म्हणुन माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधीत ठेवत मला व्यक्त होणे आवश्यकच आहे.ज्योतिषशास्त्री नितीन जोगळेकरचिंचवड पुणे LikeCommentShare
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!