मांझी छोड जाता है, साहिल छूट जाता है...
By Dada on मन मोकळे from https://mazisamruddhi.blogspot.com
-दादासाहेब येंधे प्रेमभंग झालेल्या अनेक तरुणांच्या मनातील बोल ७०-८० च्या दशकात आनंद बक्षी यांनी लिहिले. त्याकाळात हिंदी किंवा मराठी सिनेमातील गाणी हवी असतील तर १० पैशांचे छोटे पुस्तक मिळत असे. या पुस्तकात काही गाणी छापलेली असत. अनेकजण हे पुस्तक खरेदी करत असत.१९८० मध्ये 'आशा' चित्रपटाची निर्मिती होत असताना आनंद बक्षी यांनी प्रेम भंगावर गीत लोहिले होते. ते आजही भाव खाऊन जाते. गाण्याचे बोल होते 'शीशा हो या दिल हो आखिर टूट जाता है. 'आशा' जितेंद्र, रिना रॉय आणि रामेश्वरीचा सिनेमा. कथा कौटुंबिक होती. जितेंद्रच्या स्टार पदर्पणात या सिनेमाने भर घातली. पण, खरा भाव खाऊन गेली ती रीना रॉय. कारण तिला हे गाणे मिळाले. रीना रॉय गायिका दाखवल्यामुळे ती स्टेजवर हे गाणे गाते आणि जितेंद्र व रामेश्वरी पाहायला आलेले असतात असे दृश्य होते. आनंद बक्षीने इथे बोल लिहिताना कमाल केली होती. त्या गाण्याचे शब्द पुढीलप्रमाणे... शीशा हो या दिल हो... आखिर.. टूट जाता है लब तक आते-आते हाथो से सागर छूट जाता है काफी बस अरमान नहीं,कुछ मिलना आसान नहीं...दुनिया की मजबुरी है...फिर तकदीर जरुरी है...यह जो दुश्मन है ऐसे, दोनो राजी हो कैसे...एक को मनाऊ तो' दुजा रुठ जाता है...'बैठे थे किनारों पे, मौजों के इशारे पेहम खेले तुफानों से, इस दिल के अरमानों से हम को ये मालूम न था, कोई साथ नहीं देतामांझी छोड जाता है, साहिल छूट जाता है...'दुनिया एक तमाशा है आशा है और निराशा हैथोडे फुल हे काटे है जो तकदीर मे बनते है अपना अपना हिस्सा है कोई लूट जाता हैजेव्हा माध्यमे नव्हती तेव्हा अत्यंत श्रवणीय गाणी बनवली जात होती. आता माध्यमांचा सुळसुळाट झाला आहे. हवे ते गाणे आणि हवे तितक्या वेळा पाहता येते. पण, पुन्हा पुन्हा पहावे अशी गाणी किती बनतात? नवीन गाणी रसिकांच्या हृदयाचा ठाव का घेत नाहीत..? कदाचित असेही असेल की आता प्रेमभंग होत नाही. एक नव्हे दोन-तीन जोडीदार मिळतात. एका व्यक्तीसाठी झुरत बसणे नवीन पिढीला मंजूर नाही. म्हणून आता तसं प्रेम होत नाही आणि तशी गाणीही बनत नाहीत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.