भाग ९- मैत्रीची सुरवात | Marathi Story | 30 day's in Bangalore

By shejwalabhay on from https://www.softwarefukat.in

 बऱ्याचवेळ त्या केबिन मधे शांतता होती ना मला काय बोलयला सुचत होत ना गीता काही बोलत होती . कधी कधी अशी शांतता  मन हलक करण्यासाठी खुप महत्वाची मानली जाते.आणि जितकं बोलून मन हलक होत त्या पेक्षा अधिक शांत राहून भावना समजून घेतल्या वर जी सहानभूती समरोचा अनुभवतो ती खूप निरागस असते. (अजीब है ना जिंदगी  मन में दुख छुपाये हम जी जाते है; हर किसी को बस मुस्कुरते हुवे दिखाई देते है |)   गीता तिच्या हातातल्या घडाळात बघत म्हणाली.. आज च काय तुझा इंडक्शन प्रोग्राम?...मला  अचानक विसरल्या सारखं झालं होत .मेदुवर जरा जोर लावत ..मी सागितलं आज प्रॉड्शन्स डिपार्टमेंट. पण खर सांगायचं तर आज मला काही शिकावस वाटत नव्हत पण शेडूल  प्रमाणे सगळ अगदी वेळेत संपवायचं होत.आणि त्यावर कुठला पर्याय मझ्या कडे नव्हता .  आम्ही त्या शांत वातावरणाला कॅबीन मध्ये  सोडून बाहेर आलो . आणखी बरेच जन गीताला बघताच congratulations  करायला धावत येत होते .  गीता ही हसून सगळ्यांना धन्यवाद देत होती . मी मात्र तिच्या शेजारी उभा राहून तिच्या चेहऱ्याकडे कडे बघत तिच्या आनंदात सहभागी होऊ की दुःखात याचा विचार करत होतो. इतक्या दास तिथे आला आणि त्यांनी गीता ला  environment day, बद्दल काही तरी तमिळ मध्ये सागितलं गीता ने ok  म्हणून त्याचा निरोप घेतला आणि आम्ही production डिपार्टमेंट कडे निघालो. दास काय म्हणाला ? मी चालताना गीता ला विचारल  उद्या environment day आहे आणि या वेळेस हा तो डे साजरा करायची सेल्स टीम ची बारी आहे.सोबतच रांगोळी स्पर्धा पण आहे. मला त्याची हि तय्यारी आता करावी लागणार आता.गीता टेन्शन मधल्या स्वरात म्हणाली. तू काय मा काली आहेस का अनेक हातवाली एकटीच कस सगळ करणार..अस म्हणून मी प्रश्नार्थक पणे तिच्या कडे बघितलं . ती पहिले तर हसली ..अभय सेल्स डिपार्टमेंट मध्ये आपण इथे ४ लोक आहोत या ठिकाणी त्यातले दोघे सद्या कामानिम्मित जमशेदपूरला गेलेले आहेत. आणि तुला आणखी इथे कश्या पद्धतीने फंक्शन करतात हे माहित नाही . तर मग राहील कोन ? गीताने कोढ विचारल्या सारख माझ्या कडे बघितलं . मी जरा हम्म करत म्हटलो कश्या पद्धतीने फंक्शन करतात हे जरी माहित नसल तरी तू सांगू तर शकतेस ना मी करेल मदत तुला ..तसा हि शाळेमध्ये असताना खूपदा फंक्शन केले आहेत. तिने नेमिच्या स्टाईल ने चासम्याच्या कोपर्यातून माझ्या कडे बघितलं ? तिची हि नजर नेहमीच मला घाबरवत असते. हो खरच बोलतोय..........मी म्हणालो. जरी मार्केटिंग करत फिरत असलो ,तरी मी या फंक्शन  च्या कामात नक्कीच मदत करू शकतो तुला. . मी कॉलर वर हात फिरवत थोडा कॉन्फिडन्स दाखवत थोड्या मोठ्या आवाजात बोलून गेलो .   ठीक आहे बघुयात किती मदत होते तुझी तर गीता स्माईल करत डोक्यावरचे कानावर आलेले केस  मागे करत म्हणाली..... खर सागायचं तर मला शून्य टक्के असल्या फंक्शन चा अनुभव होता . पण काही खोडी असतात माणसात त्यातली हि माझी खोड  स्वताहून कसल्या हि माहित नसलेल्या गोष्टीतील स्वताची फुशारकी दाखवायची तसी हि खोड  लहानपणापासून माझ्या रक्तातभिनलेली होती, सुटेल ती सवय कसली मग. मी बोलून तर गेलो पण आता उगाच नको ते काम अंगावर ओढून तर नाही न घेतलं याची भीती वाटायला लागली होती. आम्ही बोलतात बोलता Production डिपार्टमेंट मध्ये आगमन केल होत , समोर वेल्डिंग , आणि काही मशिनिंग चे कामे चालू होती. सगळी कडे कर्कश माशिनींचे आवाज येत होते .पण कंपनीतील हे डिपार्टमेंट जरा मला जुन्या कंपन्यांची आठवण करून देत होत.कधीकाळी मी अश्याच कंपनीत काम केल होत तेव्हा बऱ्याच वेळेस ,या मशीन्स मी हि चालवलेल्या होत्या त्या मुळे इथे मला वाटत नव्हत काही नवीन शिकण्या सारख मला मिळेल .  आम्ही डिपार्टमेंट हेड च्या कॅबीन मध्ये जायुन बसलो. कॅबीन मध्ये बालाजीचा खूप मोठा फोटो होता . त्या समोर लाईटच छानस डेकोरेशन. जस आम्ही आपण एखाद्या देवाच्या  दर्शनाला आलोय अस ते देवमय कॅबीन मन खूप प्रसन्न करत होत. थोड्या वेळाने एक गृहस्त कॅबीन मध्ये आले.अभय हे बालाजी  डिपार्टमेंट  हेड  असा गीताने परिचय करून दिला . पण मी  बालाजीन कडे कडे खूप कुहुतुलाने बघत होतो ..माझ्या जागी कुणी हि असला असत तरी त्यांच्यावरून नजर हटली नसती . समोर ३५-४० च्या रेंग चे गृहस्त रंगाने खूप सावळे पण त्यांच्या गळ्यात दोन खूप जाड सोन्याच्या साकल्या दोन्ही हातात मिळून 5-६ सोन्याच्या अंगठ्या. मी त्यांच्याशी बोलताना शेजारी लावलेल्या बालाजीच्या फोटो कडे बघायचो आणि त्यांच्या कडे.. कारण त्या  फोटोतील बालाजी मला साक्ष्यात माझ्या समोर असल्या सारखच वाटत होत.आणि त्यात नाव पण सारखे म्हणजे सोने पे सुहागा | त्यांनी माझा अनुभव बघता ..जरा प्रश्नार्थ चेहर्यानी  हातातील अंगठी फिरवत विचारल ? I think you well known about this machining process? साक्ष्यात देवाकडून इंजिनियरिंग शिकायची संधी मिळतात होती.ती कशी सोडणार होतो मी .  yes ..पण थोडक्यात तुम्ही समजून सागितलं तर बर होईल . त्यांनी बोलायला सुरवात केली पण आता त्याचं बोलन मला मझ्या पुण्यातल्या अन्नाची आठवण करून देत होत जिथे मी रोज नाश्ता करतो ज्यांची उधारी अजून मला देन बाकी होती पण कधी अन्ना मला पैश्याबद्दल टोकाला नाही ..माझ्या साठी पुण्यातला तो एक हक्काचा माणूस. बालाजीच्या बोलण्या मध्ये मला तो मला आपला माणूस जाणवायला लागला होता. बलाजीनी  अति उत्तमरित्या सगळ्या गोष्टी मनमोकळ्या पद्धतीने सांगितल्या. आणि कश्या पद्धतीने आपण त्या चागल्या क्वालिटी  मध्ये बनवतो त्या बद्दल हि त्यांनी थोडक्यात उत्तम मार्गदर्शन केल . आमच बोलन चालू असताना गीता जरा चुळबुळ करत होती ...कदाचित तिला उद्याची तय्यारी करायची असावी तिच्या वागण्यावरून तरी मला तसं वाटत होत . लवकरच आम्ही सेल्स डिपार्टमेंट परत मध्ये गेलो तरी ३ वाजले होतेच. गीता ने ३.४५ वाजेच्या आसपास मला तिच्या कॅबीन मध्ये बोलवलं आणि म्हणाली .उद्या साठी लागणाऱ्या गोष्टींची मी लिस्ट बनवली आहे. तुला त्या वस्तू घेयून येता येईल का ? मी लिस्ट बघितली ..मला वाटलं खूपच झाल्या तर ४-५  असतील ,पण लिस्ट एका मुलीने बनवली होती ..अर्थातच त्यातलिस्ट मध्ये  कंपनी फंक्शन च समान तर सोबत ५ गजरे अश्या पद्धतीचे समान पण खूप काही- काही त्या लिस्ट मध्ये होत, मी डोक्याला हात लावला तसा पण मी या शहरात नवीन ..कुठे काय भेटणार कवडीची हि कल्पना नाही .  घेयून येतो.......... पण कुठे भेटेल ? मी लहान मुला सारखा एकदम निरागस प्रश्न केला . तुझ्या कडून होण अवघड आहे वाटत म्हणत गीता ने तिच्या कपाळावर हात ठेवला व कंपनी च्या driver ला फोन करून कार सेल्स डिपार्टमेंट मध्ये आणायला सागितली ? आता गीताचा नक्की प्लान काय असावा ? असा मी डोक खाजयून विचार करू लागलोच होतो. चल आपण जायुन येऊ म्हणत लिस्ट तिने तिच्या पर्स मध्ये ठेवली. आणि आम्ही कंपनीच्या कार मध्ये बसून सोबत पहिल्यांदा बाहेर खरीदी साठी निघालो हे जरी खर असल तरी दुसर्या बाजूने विचार केल्यावर समजल आमच्या मैत्रीची हि तर एक सुरवात होती......????????????  सगळे  भाग  वाचा ...????????कथा परिचय  - अभय शेजवळभाग १- बँगलोरचा पहिला भीतीदायक दिवस .....भाग २- माझी नवी कंपनीभाग ३- गीता आज वेगळीच वाटलीभाग ४ - गीतावर मनसोक्त रागवायची संधी भेटलीभाग ५ -  माझ्या  ट्रेनिंगची सुरवात  भाग - ६ इलेक्ट्रोप्लेटिंग लॅब आणि चंद्राप्पाभाग ७ - कॅन्टीन आणि  सेल्स ॲक्टिविटीभाग -८ गीता आणि  चॉकलेट बरणी..
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!