भाग - ११ पर्यावरण दिन आणि मराठी महिला

By shejwalabhay on from https://www.softwarefukat.in

आज ५ जून पर्यावरण दिवस  म्हणुन कंपनीत सकाळ पासून कार्यक्रमाच्या तय्यारीची लगबग चालू होती. कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या बायका आज रांगोळी स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेल्या होत्या . शेजारच्या  ग्राउंड वर एक मंडप टाकलेला होता. काही कर्मचारी "Only one Earth " स्लोगनच बनवलेले मोठ बॅनर लावत होते . काही सफाई कर्माचारी ग्राउंड स्वच्छ करत होते .. काल केलेल्या शॉपिंग पैकी काही गोष्टी स्टेज  दिसत होत्या  पण गीता मात्र मला कुठे दिसत नव्हती. मी सगळ्या गोष्टी निहळात. माझ्या सेल्स डिपार्टमेंट मध्ये दाखल झालो.डिपार्टमेंट  मध्ये कमालीची शांतता होती २-३ डिझाईन टीमचे  आणि १ प्लानिंग टीमचे चे कर्मचारी तेवढे  कॉन्फरन्सच्या कॅबिन मध्ये दिसले. मी माझ्या कॅबीन मध्ये जाऊन लॅपटॉप चालू करून माझ्या कामाला सुरवत केली . २ तासांनी  अलाऊसमेन्ट चा स्पीकर वाजला आणि सगळ्यांना कार्यक्रमासाठी ग्राउंड वर येण्याची सूचना HR डिपार्टमेंट करत होत .लॅपटॉप बंद करून मी ग्राउंड वर गेलो . सगळे कर्मचारी तिथे ठेवलेल्या प्लास्टिक च्या खुर्च्यांवर बसलेले होते आणि दुसऱ्या बाजूनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेल्या बायका बसलेल्या होत्या . समोर एक  छोटास स्टेज बनवलेलं होत .त्यावर काल आणलेली रोपाची कुंडी आणि त्या कुंडीला चमकी आणि शोभेच्या पताकांनी खूप छान सजवलेलं होत. खूप प्रसन्न झालेलं वातावरण पण माझे डोळे आणखी ही गीताला शोधत होते . कुठे गायब होती काय माहित काल इतकी घाई घाई करत होती ...आणि आज दिसत ही नव्हती.तितक्यात HR ने कार्यक्रमाची माहिती द्यायला आणि निसर्ग कसा आपला मित्र आहे आपण त्याचे कसे संगोपन करायला पाहिजे याची माहिती द्यायला सुरवात केली. पण इथे ही भाषेचा प्रॉब्लेम माझ्या पल्ले तर काही पडतच नव्हत. सगळे टाळ्या वाजवायला लागले की मी ही वाजवायचो फक्त तितकं काय ते माझ्या उपजत बुध्दीला समजत होत .HR च भाषण संपल्यावर त्यांनी जातांना कार्यक्रमाचे आयोजक म्हणून सेल्स डिपार्टमेंट म्हणत गीताच नाव घेत स्टेज सोडल.हिरवी साडी त्यावर सोनेरी रंगाचे काठ  आणि  त्यावर माचींग असलेले हिरवे गुलाबी  कानातले तसेच  केसंची हिंदी चित्रपटातील जयप्रधा सारखी केलीली स्टाईल आणि त्यात मोगऱ्याचा गजरा अशी एक स्री बायकांतून उठून स्टेज कडे जात होती. आणि जेंव्हा ती स्टेज वर जाऊन एकदम समोर आली ..मला तर धक्काच बसला .अरे ही तर गीता ...ते ही. महाराष्ट्रीयन पैठणी साडीमध्ये  तिला या पोशाखात ओळखन खरच खूप अवघड होत. नाही नाही हे कसं शक्य आहे म्हणत मी स्वतःला चिमटा काढून बघितला .. पण खरच सगळ काही माझ्या डोळ्यासमोर अगदी  खर खुर होत .मुळात तमिळ असलेली गीता महाराष्ट्रीयन पैठणी खूप छान दिसत होती.स्टेज वर जाऊन माईक वर बोलण्याच्या आधी ती छानशी हसली ..सगळ्यांनी तिच्या हसण्याला ही कडकडू टाळ्यांची दाद दिली .तिने थोड लाजत बोलायला सुरवात केली खरी पण पुन्हा मला भाषेचा प्रॉब्लेम . पण एक नक्की कोणत्या ही राज्याची स्री असो महाराष्ट्रीयन पैठणीत नक्कीच सुंदर दिसते याचा प्रतेय आज मला येत होता. आणि महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान डोळ्यातून ओसंडून वाहत होता.तीच ते बोलण झाल्यावर तिने " World Environment Day" अस लिहिलेला  केक कट केला आणि कॅन्टीनच्या लोकांनी सगळ्यांना नाष्टा द्यायला सुरवात केली.मी मात्र विचाराच्या जगातून आणखी वर्तमानकाळात आलेलो नव्हतो .तोच समोर आणखी पैठाणीत असलेली महिला दिसली. ४५ ते ५० वय असेल अंदाजे, आमच्या पैठणी ने खरच सगळ्यांना वेड लावलेलं दिसतंय ? अस मनातल्या मनात म्हणून मी नाष्टा करायला सूरवात केली .तोच मला  पुण्यातल्या मित्राचा फोन आला ? कुठे काय चौकशी करून नेहमी प्रमाणे त्याने उसने पैश्याची मागणी केली. आणि नेहमी प्रमाणे मी नाही नाही करत फोन पे करून मोकळा झालो.मित्रासोबत बोलणं चालू होत तेंव्हा ती ४०-४५ वय असलेली महिला  माझ्या कडे बघत होती. मित्राशी बोलताना माझी ही नजर त्यांच्या कडे गेली ..तेंव्हा ही त्या माझ्या कडे बघत होत्या.माझ्या मागे काही लोक नाष्टा करत होते कदाचित त्यांच्यात कुणी त्यांचा ओळखीचा असेल , कारण माझ अस परिचयाचं अस तिथे कुणीच नव्हत.नंतर मी त्यांच्या कडे काही ज्यास्त लक्ष दिलं नाही .नाष्टा केल्यानंतर सर्व कर्मचारी आपापल्या कामावर निघून गेले आणि  त्या नंतर रंगोली स्पर्धेला सूरवात झाली . कार्यक्रमाची जिम्मेदारी सेल्स टीम वर असल्यामुळे गीताने कालच मला स्पर्धा साठी लागणाऱ्या वेगवेगळ्या रांगोळ्या घेऊन मंडपाच्या बाहेर  थांबायला सांगितलल होतच. म्हणून मी एक टेबल आणि खुर्ची घेऊन तिथे बाहेर बसलो ज्यांना जे रंग हवे होते ते रंग बायका तिथे येयून रंग घेऊन जात होत्या .तेवढ्यात पुन्हा ती ४०-४५ वय असलेली स्री तिथं आली आणि ५-१० मिनिट तिथेच माझ्या टेबल समोर रंग बघत उभी राहिली.  रांगोळी हवी आहे का ? अस मी त्यांना इंग्रजीत विचारलंत्यांनी नाही नको .. म्हंटल..ओके म्हणुन मी पुन्हा रांगोळी कडे बघत नाही तोच पुन्हा त्यांच्या कडे बघितलं .....कारण त्या चक्क माझ्याशी मराठीत बोलल्या होत्या .. मी आश्चर्य चकित होयून त्यांच्या कडे बघत नाही तोच त्या पुन्हा मराठीत बोलल्या अभय का तू ? आज हा माझ्या साठी... दुसरा सुखद आश्चर्याचा धक्का होता.....????????????  सगळे  भाग  वाचा ...????????कथा परिचय  - अभय शेजवळभाग १- बँगलोरचा पहिला भीतीदायक दिवस .....भाग २- माझी नवी कंपनीभाग ३- गीता आज वेगळीच वाटलीभाग ४ - गीतावर मनसोक्त रागवायची संधी भेटलीभाग ५ -  माझ्या  ट्रेनिंगची सुरवात  भाग - ६ इलेक्ट्रोप्लेटिंग लॅब आणि चंद्राप्पाभाग ७ - कॅन्टीन आणि  सेल्स ॲक्टिविटीभाग -८ गीता आणि  चॉकलेट बरणी..भाग ९- मैत्रीची सुरवात भाग -१० गीताची शॉपिंग
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!