ब्लॉग : लेख : खाद्य संस्कृती - वदबल
By bhagwatblog on पाककृती from https://bhagwatbalshetwar.blogspot.com
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खाद्य संस्कृती सुंदररित्या जपली जाते. मराठवाड्यात तर खाद्य संस्कृतीला विशेष महत्व आहे. एखाद्या विशिष्ट कार्य, सणा प्रसंगी एखादा विशिष्ठ पदार्थ बनवून आपण त्याचा आस्वाद घेतो. जसे की वेळा अमावस्येला भज्जी, आणि त्रिपुरारी पौर्णिमेला वदबल. कुठे ही परंपरा काटेकोरपणे पाळली जाते आणि कुठे ही प्रक्रिया ऐच्छिक आहे. पण एखाद्या सणा प्रसंगी विशिष्ठ पदार्थ सणाची गोडी वाढवतो आणि ओढ लावतो. असे पदार्थ मला तरी खूप आवडतात कारण ते कधीतरीच बनत असतात. तर अश्याच एका पदार्थाची आज उजळणी करून घेवू या.