ब्लॉग - लघुकथा - पाचशे रुपये
By bhagwatblog on कथा from https://bhagwatbalshetwar.blogspot.com
मथुरा आज खूप खुष होती कारण तिने नातवासाठी सुमेध साठी खेळण्यातील गाडी बघून ठेवली होती. ती आज मोठ्या गावी जाऊन बाजाराच्या दिवशी खरेदी करणार होती. बाजारात प्रत्येक वेळी सुमेधला घेऊन जाताना सुमेध दुकानातील गाडी बघून आपल्या आज्जीला मागायचा. मागील एका वर्षापासून ती थोडे-थोडे पैसे साठवत होती. पैशाची जमवा जमव जवळपास जुळून आली होती. सुमेध हा मथुराचा एकुलता एक लाडका नातू होता. सुमेधचे वय ३ वर्ष होते आणि तो कायम आज्जी सोबत राहायचा. मथुरा त्याचे जमेल तसे लाड पुरवायची. बाजार जवळच्या मोठ्या गावी भरायचा. त्यांचा अत्यंत साध आणि टुमदार गाव होत. दोन बाजूला काही घर, आजूबाजूला शेत आणि एक मंदिर एवढंच काय ते गावात होतं. गावात भाजी विकून मथुरा आपल्या कुटुंबाला हातभार लावायची. त्यामुळे प्रत्येक आठवडी बाजारात भाजी विकून यायची. आज सुद्धा मथुरा बाजारात जाणार होती.