बेजिल पेस्तो पिझ्झा

By Mohana on from globalfoodcooking.blogspot.com

बेजिल पेस्तो सॉस इटलीतून आलं आहे. पास्तासाठी त्याचा मुख्यत्वे वापर केला जातो. हे सॉस मी पिझ्झासाठी वापरलं आहे. त्याची कृती इथे आहे. नाहीतर विकतचं वापरु शकता.साहित्य:१ पॅक पिझ्झा डोव - कोणत्याही ग्रोसरी स्टोअरमध्ये deli cooler विभागात किंवा पिझ्झा चेनच्या दुकानात मिळेल.१/४ कप श्रेडेड चीज१ बटण मशरुम पॅक१ भोपळी मिरची१ कांदा१ कॅन ऑलिव्हकृती:ओव्हन ४५० डिग्री फॅरेनहाइट वर गरम करापिझ्झा डोव फ्रिजमधून काढून ठेवा.भाज्या तिरक्या तिरक्या चिरा.तव्यावर एकेक करुन भाजा (तेलाची आवश्यकता नाही). भाजताना थोडी मिरीपूड, मीठ भुरभुरवा, पाहिजे तर लिंबू पिळापिझ्झा डोव लाटण्याने पाहिजे त्या आकारात पातळसर लाटा. (त्याआधी पीठ चिकटू नये म्हणून खाली थोडासा मैदा/कणीक भुरभुरवा) एका बेकिंग ट्रे मध्ये रहात नाही त्यामुळे मी दोन ते तीन आयताकृती करते.पेस्तो सॉस पसरा. (सॉस आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरु शकता.)भाजलेल्या सर्व भाज्या पसरा.वर चीज पसरा.ओव्हनमध्ये १२ ते १५ मिनिटं बेक करा.कसा झाला ते मला कळवा :-).नेहमीच्या टॉमेटो सॉसपेक्षा पेस्तोमुळे वेगळी चव येते. मुलांना खूप आवडतो.टीप - पेस्तो सॉसला पर्याय म्हणून आपली कोणतीही चटणी वापरु शकता.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 4
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!