प्रवास रोजचा …भाग २

By Rupali_Thombare on from umatlemani.blogspot.com

प्रवास रोजचा …भाग २       या गर्दीत होणारा आणखीएक कमालीचा त्रासम्हणजे जिवंत माणसांपेक्षा असलेलीनिर्जीव गोष्टींची उपस्थिती. उदाहरणार्थरंगीबेरंगी वेगवेगळ्या आकारांच्या ,कधीटोकदार अशा लहान-मोठ्या पर्सेस आणित्याहून जास्त म्हणजे कॉलेजच्यामुलींकडची  मोठीमोठी दप्तरे. बहुतेकसर्वच जणी कांगारूच्यापिलासारखे ते छातीशीकवटाळून मोकळ्या झालेल्या हातांचावापर कोणी आजच्यापरीक्षेच्या अभ्यासासाठी तर काहीस्मार्टफोनवर संवाद साधण्याच्या कामीवापरात आणतात. फोनवर संवादसाधण्याचेही आजकाल कितीतरी प्रकारआहेत. नंबर लावूनफोन कानाशी धरूनबोलणे हा आताजुन्या प्रकारात मोडला जातो. त्यापेक्षा कानात इयरफोन घातलेकि  आरामातहात मोकळे ठेवूनआणि स्पष्ट आवाजातबोलता आणि ऎकतायेते .बोटांची विशिष्टहालचाल करून आजकालसंदेश पार सातासमुद्रापलिकडे पोहोचवता येतात .  हल्ली हे असेप्रकार जास्त पाहायला मिळतात.ग़र्दीत  देखीलस्वतःची  कितीघुसमट होतेय हेमित्र-मैत्रीणीना सांगण्यातविशेष रुची असते. मोठी  एकधक्का लागला तरीसहज जोरात लागणारीlaptop घेतलेली bag पाहिली कि तीएवढया गर्दीत आणणाऱ्यामुलीचा रागही येतो आणिकीवही येते. एवढेजड ओझे खांद्यावरघेऊन असल्या गर्दीतूनवाट काढत हीवस्तू जपून घरीन्यायची आणि कशासाठीतर घरून कामकरण्यासाठी-हे सोपेनाही. पण हल्लीखुप ठिकाणी हीगरजच असते.आता जसजसे पुढचे स्टेशनजवळ आले तसतसेएका दरवाजाकडे ओघवाढायला लागला.             "अहो ताई ,तुम्हीकुठे उतरणार ?        इथे नाही उतरायचेमग दरवाजात कशालाउभे राहता?  मागे  व्हा. मला पुढे जावूदया . " असे  म्हणतनदीचे पात्र सपासपमागे सारत किनारागाठावा तसे यास्टेशनवर उतरणाऱ्या साऱ्या जणीदरवाजावर येवून थबकतात.         आणि मग एकदाचेस्टेशन येते. तेथे एखाद्यापिपाला छिद्र पडले किपाणी जसे एकादिशेने वेगात वाहत सुटतेतसा तो गर्दीचालोट बाहेर ढकललाजातो. काही ठराविकवेळी आणि स्टेशन्सवरजेवढी गर्दी बाहेरपडली तेवढीच किंवाकदाचित त्यापेक्षाही अधिक गर्दीडब्यात शिरकाव करते.पण ही खुपचसकाळची वेळ असल्याने  आणि  या स्टेशनवरून सुटणाऱ्या इतरही गाडया असल्यानेआता उतरणाऱ्या आणिचढणाऱ्याच्या संख्येत बरीच तफावतआहे. एरव्ही याचस्टेशनवर चढणे-उतरणेम्हणजे फार मोठीमोहीम हाती घेतल्यासारखेअसते.पण आताडबा बराच रिकामावाटू लागला आहे. काही क्षणांपूर्वी उभेराहण्यापुरती एवढयाशा जागेसाठी आसुसलेल्यात्या कुटुंबाला आताऐसपैस बसायला जागामिळाली होती . गार वाराअंगावर झेलत त्यांनीदरवाजाशेजारीच खाली ठिय्यामांडला होता.      लगेचच मी बसण्यासाठीजागा मिळवण्यासाठी पुढेसरसावले.डब्यात नव्याने प्रवेश करणारीला जर बसायचे असेल तर तिला आधीपासूनच बसलेल्या महिलांना विचारून स्वतःची जागा आरक्षित करून घ्यावी लागते. आणि  मग योग्य ठिकाणी योग्य वेळी येऊन आरामात 'बसून प्रवास' या कल्पनेची अनुभूती घेण्यास मिळते. लेडीज डब्यात बसण्यासाठी सीट आरक्षित करण्याची अशी ही एक जगावेगळी तऱ्हा वापरली जाते.ज्यांनी पण हि युक्ती सुचवली असेल त्यांनी नक्कीच या लोकलच्या प्रवासात आयुष्याची बरीच वर्षे काढली असतील आणि  त्यातुनच हे संशोधन झाले असेल. पण इंग्रजीत म्हणतात तसे "FIRST COME FIRST SERV " चा योग्य वापर करून खरोखरच त्यांनी पुढे वर्षानुवर्षे या लोकलच्या प्रवासात अर्धे जीवन खर्ची करणाऱ्यावर उपकारच केले म्हणावे.  पूर्वीच्या स्टेशन्सवर चढूनजागा मिळवून बसलेल्यात्या १७ जणींवरमी एक नजरटाकली. त्या साऱ्याइतका वेळ सुरुअसलेल्या चुरशीच्या सामन्यापासून एकदमअलिप्त आपल्याच विश्वात रममाणहोत्या. कोणी गारव्यातझुळूकेच्या एका थंडस्पर्शाने लागलेल्या शांत डुलकीचाआस्वाद घेत आहेतर कोणी कानांतइयरफोन घालून मोबाईलमधून येणाऱ्यामधुर ध्वनीलहरींचा. एखादीकादंबरीच्या शाब्दिक विश्वात हरवलेलीअसते. कॉलेजच्या मुलीतर चक्क छापाछापीकरत असतात. पण तेकरत असतानाही त्यांचीती तल्लीनता बघण्यालायकअसते. या खिडकीपाशीअसलेला ७ जणींचाघोळका म्हणजे लोकलच्यामैत्रिणींचा एक ग्रुप. असे अनेक ग्रुप्स मिनिटाला धावणाऱ्याप्रत्येक लोकलमध्ये पाहायला मिळतात. या ग्रुप्समध्ये रोजच्याधकाधकीच्या जीवनापासून ते जीवनातीलमहत्वाच्या घडामोडींपर्यंत सर्वच अनुभवांची संक्रांतीच्याहळदी-कुंकवातील तिळगुळाप्रमाणेदेवाण-घेवाण होतअसते. या ग्रुपमध्येअसल्याचा एक फारमोठा फायदा म्हणजेआपल्याला जागा शोधतानापाहून कधीकधी त्यातलीएक मैत्रीण चटकनम्हणते" अगं ये, तू बस इथे. मी खूप वेळापासूनबसलेच आहे. थोडीउभी राहिले किपाय मोकळे होतीलआणि असे पणमला शेवटच्या स्टेशनवरउतरायचे आहे". मग तिला 'नाही-हो' करत बसायला आयतीजागा मिळते. पणनेमकी माझी रोजचीलोकल हुकल्याने माझाहा सुवर्ण योगजराश्याने हातून गेला. हाविचार मनात घोळवतअसतानाच 'तुम्ही कुठे उतरणार?'  चापाढा चालू ठेवलाकि त्या घोळक्यातूनलगेच उत्तर येते “आता२ स्टेशन्स गेलेकि उतरेन मी” तेव्हा आता फक्तएकच स्टेशन बसायलामिळणार आणि तेहीफोर्थ सीट हेसमजताच मनावर क्षणभर आलेलीनाराजी चेहऱ्यावर न दर्शवतागोड स्मित करून            "ठीक आहे.मला दया  प्लीज”'  असे आभारप्रदर्शन करतजागा आरक्षित करूनठेवल्याचे एक वेगळेचसमाधान मिळाले. 'फोर्थ सीट ' हेलोकलच्या लेडीज डब्याचे एकवैशिष्टय. हा प्रकारजगात इतर कोठेहीपाहायला मिळणार नाही. ३जण आरामात बसूशकतील त्या जागेतएकोपा दाखवत चौथीसाठीथोडीफार तडजोड सहन करतचौघींनी ती जागायोग्य रीतीने व्यापूनघ्यायची. त्यांतील एखादी जरातब्येतीने जास्त असेल तरतडजोडीची मात्रा वाढली जाते. येथे नवीन येणारीआधी चवथ्या सीटवरमग जसजसे स्टेशन्सआणि त्यासोबत सहप्रवासीजातील तसतशी खिडकीकडेसरकत शेवटच्या स्टेशनपर्यंतखिडकीजवळ पोहोचतें. पण मीतर म्हणेन याडब्यात बाहेरपेक्षा आतच मज्जाअसते. क़बुतराच्या जाळीलावल्याप्रमाणे असलेल्या त्या खिडकीतूनबाहेर काय पहायचे?                   या ग्रुप्समधूनचाललेल्या वेगवेगळ्या विषयांवरील चर्चाहा जवळजवळ संपूर्णडब्यातील महिलावर्गासाठी एक करमणुकीचाभाग असतो. याचर्चेचे एक वैशिष्टयम्हणजे ती कधीचएका विषयाला धरूननसते. जितक्या जास्तजणी यात सहभागीतितकी विषय भरकटतजाण्याची शक्यता जास्त. सासू-सून-नवरा-मुलं यांनीभरलेलं घर आणिऑफिसातला बॉस आणित्याचे काम हेआवडीचे विषय. बाकी मगनवी ठिकाणे,नवेचित्रपट,कधी कधीजगातील घडामोडी अशा इतरविषयांतही रुची दाखवलीजाते. पिकनिकला त्यातलीएक जण जातअसली तरी त्यासर्वाना सैर घडवूनआणेल हे नक्की. नवा चित्रपट एकीनेपाहिला तरी उतरतानाप्रत्येकीचे कथानक पाठ झालेलेअसते. असे हेग्रुप्स खूप मज्जाकरतात . त्यातील एखादी जरउत्तम सुगरण असेलइतर सर्वांची रोजचमेजवानी. सर्वांना तिच्या हातूनखाण्यात आणि तिलासर्वांना खावू घालण्यात एक विलक्षणीयआनंद प्राप्त होतअसतो .        अरे हो विसरलेच. या सर्वांचा सर्वातमोठा आवडता विषयम्हणजे शॉपिंग. कोणती गोष्ट कुठेआणि कधी उत्तममिळते हे जाणूनघ्यायचे असल्यास अशा डब्यातूननियमित प्रवास करत राहिलेपाहिजे. इथे खरेदी-विक्रीच्या नुसत्या कोरड्याचर्चाच होत नाहीततर प्रत्यक्षरीत्या पाहायलाहीमिळतात. कोणी तिच्याटपरवेअरच्या प्रोडक्ट्सची जाहिरात करत असतेतर कोणी आणखीकाही. असाच एकअनुभव सांगतें. आमच्यातल्याचएकीने एकदा खूपसुंदर साडी नेसलेली. मग झाले. नवेकाही इथे आलेकि स्तुती, चौकशीया सर्व घरीकदाचित न मिळणाऱ्यापण हव्या असणाऱ्यागोष्टी आपोआपच न बोलताइथे मिळतात ही  शाश्वती. या नियमानुसारतिला देखील खूपप्रशंसा मिळाली. साडीची स्वस्तकिंमत कळताच माफकदारातली ही साडीमिळवण्यासाठी सर्वानीच शर्यत लावली. आणि मग पुढचेकितीतरी दिवस तीसाड्यांच्या पिशव्या या गर्दीतआणून उगाचच निर्जीववस्तूंची अडचण करूलागली. पण बहुतेकदायातून फायदाही होतो. जसे माझ्यासारख्या सौंदर्यप्रसाधानांमध्येअतिशय कमी रुचीअसलेलीला यातले काही खरेदीकरायची वेळ आलीकि त्या अलिशानदुकानात जावून आयत्या वेळीस्वतःची फजिती करून घेण्यापेक्षाइथे दिलखुलास विचारपूसकरून खरेदी केलेलेनेहमीच योग्य.visit प्रवास रोजचा …भाग ३ /*********************************************** * Disable Text Selection script- © Dynamic Drive DHTML code library (www.dynamicdrive.com) * This notice MUST stay intact for legal use * Visit Dynamic Drive at http://www.dynamicdrive.com/ for full source code ***********************************************/ function disableSelection(target){ if (typeof target.onselectstart!="undefined") //IE route target.onselectstart=function(){return false} else if (typeof target.style.MozUserSelect!="undefined") //Firefox route target.style.MozUserSelect="none" else //All other route (ie: Opera) target.onmousedown=function(){return false} target.style.cursor = "default" } //Sample usages //disableSelection(document.body) //Disable text selection on entire body //disableSelection(document.getElementById("mydiv")) //Disable text selection on element with id="mydiv" disableSelection(document.body) //disable text selection on entire body of page
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!