पुलंची मजेशीर पत्रे - ६
By cooldeepak on साहित्य from https://cooldeepak.blogspot.com
श्री. वामनराव यांना मालवणीत पत्र लिहितानाही पुल असेच मजा करून सोडतात.प्रिय वामनरावांनू, तुमचा पत्र मेळला. वाचून खूब बरां वाटलां. कशाक म्हणश्याल तर तुमचो गाव धाम्पूरच्या तळ्याक लागून तशी माझी सासूरवाडी खुद्द धाम्पूरच. (धाम्पूरच खरा धामापूर न्हय.) तर सांगत काय होतो, धाम्पूरच्या ठाकुरांचो मी जावांय ! धाम्पूरच्या तळ्यात गुरां पाण्याक् घेवन् कोणच जात नाय ह्यां तुमचा म्हण्णा खरांच. पण चुकलां माकलां