पहिला पाऊस
By cooldeepak on साहित्य from https://cooldeepak.blogspot.com
उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीवर पहिला पाऊस पडला ती तापलेली माती जी गंध घेऊन उठते त्याला तोड नाही. एका खोलीत बसून तो घ्यायचा नसतो. तो अनपेक्षित रीतीने यावा लागतो आणि तो वास घेताना उघड्यावर जाऊन तृप्त धरतीची तृप्तीही डोळे भरून पहावी लागते. उन्मत्त ढगातून वीज खेळायला लागल्यावर तिचा संचार तरुण शरीरातही व्हावा यात काय आश्चर्य? त्या जलधारात न्हाऊन निघालेल्या ललनांच्या स्वखुषीने प्रियकरांना दिलेल्या