परदेशगमन उपाय| परदेशी जायचंय? उच्च शिक्षण, नोकरी किंवा कायमच्या वास्तव्यासाठी, तसेच व्हिसा मिळत नसेल तर त्याविषयी देखील सल्ला
By vedicjyotish on धार्मिक from https://vedicjyotishmail.blogspot.com
परदेशगमनाबद्दल ज्योतिषीय मार्गदर्शन: शिक्षणासाठी, नोकरीसाठी, स्थायिक होण्यासाठी किंवा सहलीसाठी परदेशी जाण्यास उत्सुक आहात? पुढच्या शिक्षणासाठी परदेशात प्रवेश मिळावा असा वाटतंय? व्हिसा आणि इतर कागदपत्रे व परवानग्या पटकन मिळाव्यात असं वाटतंय?तुमच्या पत्रिकेतील नेमके कुठले ग्रह किंवा योग तुम्हाला परदेशी घेऊन जाऊ शकतात, याविषयी या पोस्ट मध्ये ऊहापोह केला आहे. चला तर मग बॅगा भरायला घ्या आणि परदेशी जाण्याची तयारी करा...परदेशी जाण्यासाठी उपाय : तुमच्या कुंडलीत कारक असलेल्या गोष्टी राहू आणि गुरु हे दोन ग्रह परदेशगमनाचे कारक ग्रह आहेत. परदेशवारी असो किंवा तिथले कायमचे वास्तव्य या दोन ग्रहांचा अभ्यास नेहमी करावा लागतो. गुरूपेक्षा सुद्धा राहूचा जास्त. दूषित आणि निर्बली चंद्र सुद्धा फॉरेनला जाण्यासाठीचा कारक असू शकतो. विशेष करून तो जर तुमच्या पत्रिकेत राहू, केतू किंवा शनि यांच्या युतीत असेल तर. चतुर्थ स्थान, सप्तम स्थान, नवम स्थान आणि द्वादश स्थान हि ४ स्थाने परदेशगमनासाठी क्रॅक आहेत. त्यापैकी १२ वे स्थान सर्वात जास्त. या ४ भावामध्ये स्थित असलेले ग्रह, राशी, त्या राशींचे स्वामी ग्रह, ग्रहांची नक्षत्रं आणि नक्षत्रस्वामी या सगळ्यांचा अभ्यास करून मग कळेल कि तुम्ही कधी आणि कसे परदेशी जाणार आहात. परदेशात नोकरी, व्यवसाय, आणि उद्योगधंदा उपाय तुम्ही नोकरी करणार कि स्वतः चा बिझनेस हे आपल्याला तुमच्या पत्रिकेतील दशम स्थानावरून समजतं. दशमांश (D-10) कुंडलीचा सखोल अभ्यास केला तर यापेक्षा जास्त माहिती मिळते जसे कि इथे भारतात नोकरी किंवा बिझनेस करावा कि भारताबाहेर? नेमक्या कुठल्या देशात गेल्यावर उत्कर्ष होईल? कुठल्या क्षेत्रात बिझनेस करावा? कधी सुरु करावा? वगैरे. काही काही लोकांना अंगात उत्तम कलागुण व हुशारी असूनही आणि खूप प्रयत्न करून सुद्धा हाताला यश येत नाही. यामागे हे सुद्धा कारण असते कि त्यांच्या पत्रिकेत परदेशी जाऊन मगच यश मिळेल असं योग असतो. त्यामुळे इथे राहून कितीही प्रयत्न केले तरी त्यांना परदेशी गेल्याशिवाय यश मिळत नाही. तुम्ही सुद्धा हुशार असाल आणि खूप प्रयत्न करूनही सारखा अपयश येत असेल तर याचा अर्थ तुमच्या नशिबात परदेशी जाणे लिहिलेले असू शकते. या लेखात दिलेल्या गोष्टी तुमच्या पत्रिकेशी पडताळून पहा. किंवा खाली दिल्याप्रमाणे याविषयी सविस्तर मार्गदर्शन घ्या. तर तुमच्या कुंडलीत लग्न आणि लग्नस्वामी यांचा जर दशम स्थान किंवा दशमेशाशी काही संबंध येत असेल तर तुम्हाला नोकरी किंवा कंपनीच्या इतर काही कामानिमित्ताने परदेशी जाण्याचा योग येईल. तुम्ही जर स्वतंत्र व्यावसायिक असाल उदा. शेफ, फोटोग्राफर, आर्किटेक्ट, फॅशन डिझायनर, वगैरे तर तुमच्या पत्रिकेतील तृतीय स्थान सुद्धा इथे अभ्यास करताना महत्त्वाचे ठरेल. स्वतःचा बिझनेस असेल तर लग्नेश, दशमेशाबरोबरच, सप्तमेश सुद्धा अभ्यासाकरिता महत्त्वाचा आहे. हि ३ स्थाने आणि त्यांचे स्वामी ठरवतील कि तुम्हाला परदेशात कुठल्या प्रकारचा बिझनेस लाभेल. किंवा आता तुम्ही जो बिझनेस करत आहात त्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी उत्तम देश कोणता, म्हणजे त्यानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकाल. टेक सेक्टर मधील उद्योजक असाल आणि सिलिकॉन व्हॅली किंवा तत्सम ठिकाणी जाण्यास ईच्छुक असाल तर तुमच्या पत्रिकेतील एकादश स्थानाचा देखील विचार करावा लागेल. राहू हा केवळ परदेशाचाच कारक नाही तर तो टेक्नॉलॉजी, जुगार, स्टॉक मार्केट, मद्य, सिनेमा, फॅशन, इत्यादी गोष्टींचा सुद्धा कारक आहे. म्हणजे तुम्ही जर हॉलिवूड, वॉल स्ट्रीट, लास वेगास, लॉस एंजेलिस, वगैरे अशा प्रकारच्या/ठिकाणच्या करियरसाठी परदेशी जाणार असाल तर त्यानुसार अभ्यास करावा लागतो..उच्च शिक्षणाकरता परदेशगमन उपाय तुम्ही जर शिक्षणाकरता परदेशी जाणार असाल तर तुमच्या लग्न, लग्नेशाबरोबर, पंचम स्थान, चतुर्थ स्थान, आणि पीएचडी करणार असाल तर नवम स्थान याचा अभ्यास करावा लागतो. या भावेशांचा जर द्वादश स्थान किंवा प्रत्यक्ष व्ययेशाशी संबंध आला तर तुम्हाला शिक्षणाकरता परदेशी जाण्याचा योग येतो. द्वितीय स्थान तर दूषित असेल तर त्याचाही इथे उपयोग होतो. तसेच, सिद्धांश कुंडली (D-24) सुद्धा फॉरेनच्या शिक्षणाविषयी खूप काही माहिती देऊ शकते. परदेशी प्रवास उपाय : सहल किंवा इतर कार्यक्रमाकरिता कुणा मित्राचं किंवा नातेवाईकाचा फॉरेनला लग्न आहे का? सगळे जाणारेत आणि केवळ तुम्हाला जायला मिळत नाही असं आहे का? कि सहकुटुंब जागतिक सहलीवर निघाले आहात ?तुमच्या कुंडलीत तृतीय आणि नवम स्थान जर चांगले असेल त्याचा जर वर नमूद केल्याप्रमाणे व्ययेशाशी संबंध येत असेल तरच तुम्हाला अशा कारणांसाठी परदेशी जाण्याचा योग येतो. नसेल, तर तुम्ही जाऊ शकत नाही आणि तुमच्यामुळे जवळच्या कुणाचे देखील कार्यक्रम रद्द होऊ शकतात. कायमच्या वास्तव्याकरता परदेशी जाणे मुलगा किंवा मुलगी आधीपासून परदेशी आहेत. तुम्हाला तिकडे स्थायिक होण्यासाठी बोलावत आहेत पण काही केल्या जमत नाही, असं आहे का? तुमच्या पत्रिकेत लग्नेश, धनेश आणि व्ययेश यांचा घनिष्ठ संबंध असेल, म्हणजे लग्नेश आणि धनेश जर द्वादश स्थानात स्थित असतील तरच तुम्हाला परदेशात कायमचे वास्तव्य करण्याचा योग येतो. नाहीतर नाही. व्हिसा सारखा रिजेक्ट होतो आहे का? किंवा इमिग्रेशनसबंधी इतर अडचणी येत आहेत का ?व्हिसा आणि इमिग्रेशन संबंधी जर अडचणी असतील तर त्यासाठी तुमच्या पत्रिकेतील द्वितीय, सप्तम, अष्टम आणि एकादश स्थानाचा अभ्यास करावा लागतो. तसेच, चतुर्थ स्थान किंवा चंद्र बलवान असेल तर तो तुम्हाला मातृभूमी सोडून परदेशी जाण्यास अडथळे निर्माण करतो कारण चंद्र मातृकारक आहे, आणि चतुर्थ स्थान देखील मातृभूमीचे कारक आहे. त्यामुळे या दोन गोष्टी पत्रिकेत बलवान असतील तर जंग जंग पछडले तरी व्हिसा मिळत नाही असं अनुभव येतो. अर्थात, त्यावर उपाय सुद्धा आहेतच. व्हिसा कसा मिळवायचा ?वर नमूद केल्याप्रमाणे तुमच्या पत्रिकेतील चतुर्थ स्थान आणि चंद्र या दोन गोष्टी आधी तपासाव्या लागतील. त्यानंतर आता कुठल्या ग्रहाची महादशा सुरु आहे ते पाहावे लागेल. त्यानंतर त्या ग्रहाच्या महादशा आणि अंतर्दशेनुसार कुंडलीचे गणित मांडून योग्य काळ शोधून काढावा लागेल. अंशात्मक कुंडल्या इथे महत्त्वपूर्ण ठरतात.तर असा काळ शोधला कि त्या काळात तुम्ही व्हिसाकरता अप्लाय करू शकता म्हणजे व्हिसा अप्रूव्ह होईल. मी आजपर्यंत अनेकांना असं काळ काढून दिलेला आहे, आणि त्यांचा व्हिसा अप्रूव्ह झालेला आहे. ज्योतिष शास्त्र किती अचूकपणे काम करता याचा हि पद्धत एक उत्तम नमुना आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता कि किती वेगवेगळ्या प्रकारच्या कुंडल्या आणि पद्धती मांडून अभ्यास करावा लागतो. तुम्हाला सुद्धा वर नमूद केल्याप्रमाणे एखाद्या कारणासाठी जर परदेशी जायचं असेल तर आजच या विषयाशी संबंधित सविस्तर मार्गदर्शन घ्या. म्हणजे पुढे होणारा मनस्ताप टळेल, वाया जाणारा वेळ वाचेल आणि पैसेदेखील वाचतील: सविस्तर मार्गदर्शनासाठी इथे संपर्क करा.