नक्षत्रांचे देण ४१

By siddhic on from https://siddhic.blogspot.com

 ''कामात होते, म्हणून नाही जमल. मग मैथिली बद्दल समजलं आणि मी तडक इथे निघाले. तसाही तू इथेच भेटणार हे माहित होता.'' भूमी    ''तू कंपनी सोडलीस ना? मग कोणत्या कामात आहेस? पुन्हा जॉईन करणार आहेस का? बोलू पपांशी?'' क्षितिज    ''नको.'' भूमी पटकन बोलून गेली.    ''विभास पुन्हा त्रास देतोय का?'' क्षितीज    ''नाही. पत्रकारांना त्यांचं उत्तर मिळाल आहे, विभासच खोटेपणा सगळ्यांच्या समोर आलाय, आता तो काहीही करू शकत नाही.'' भूमी    ''मग काय झालं? तू अपसेट दिसतेस?'' क्षितीज    ''तू अपसेट म्हणून मग मी हि अपसेट. आपल्या दोघांच्या आयुष्यात एकत्रितपणे अचानक चित्र विचित्र घटना सुरु होतात ना?'' भूमी    ''एस, पण आत्ता काय विचित्र झालाय? सांगणारेस का?'' क्षितीज उठून बसलं आणि तिला विचारू लागला.    ''काही नाही. समजा तर उद्या तुला अपेक्षित नसणारी कोणतीही गोष्ट तुला न सांगता मी केली. तर? तुझी काय प्रतिक्रिया असेल?'' भूमी    ''असं का विचारतेस?'' क्षितीज    ''सांग ना? असं काहीही झालं तर तू माझ्यावर विश्वास ठेवशील? किंवा आता जशी मला साथ देतोस तशीच साथ देशील?'' भूमी    ''होय, काहीही झालं तरीही माझा तुला पाठिंबा असेल. आणि मी नेहेमीच तुझ्यावर विश्वास ठेवेन. प्रॉमिस.'' म्हणत त्याने तिला जवळ घेतले.    भूमी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसून राहिली. ''प्रेमात खूप कसौटी द्याव्या लागतात असं ऐकलं होत, आपल्या बाबतीत याची सुरुवात झाली वाटलं.'' भूमी बोलत होती.    ''तू सोबत असशील तर ते हि चालेल.'' क्षितीज    ''होय, नेहेमी असणे.'' भूमी    ''काय झालं ते सांगशील का आता?'' क्षितीज    ''झालाय बरच काही त्यातलं महत्वाचं सांगते, माझं सारखं डोकं दुखत असत त्यासाठी आपण काही टेस्ट केल्या होत्या ना, त्याचे रिपोर्ट्स आलेत. मायग्रेन ची लक्षण आहेत, पण ते थर्ड स्टेजला आहे. वाढण्याआधी ट्रीटमेंट घ्यावी लागेल.'' भूमी    ''काय? काय बोलतेस?'' तो घाबरला आणि जवळजवळ ओरडला.  ''मग आधी चांगला डॉक्टर बघूया आपण आणि  लवकरात लवकर तुझी ट्रीटमेंट करून घेऊ.''    ''होय, पण चांगली ट्रीटमेंट घ्यायची झाली तर त्यांनी मला एक लंडनचा डॉक्टर सजेस्ट केला आहे. तिथे जावं लागेल बहुतेक.'' भूमी    ''मग वाट कसली पहातेस? मी येऊ का तुझ्यासोबत? थिर्ड स्टेप म्हणजे डेंजर असते, नो रिस्क. लवकरच ट्रीटमेंटला सुरुवात कराहायला पाहिजे.'' क्षितीज    ''होय, मला जावं लागेल तिकडे कमीत कमी एक महिना तरी.'' बोलताना भूमी थोडी टेन्शनमध्ये आली होती.    ''काही हरकत नाही, एका महिन्याचा तर प्रश्न आहे.'' क्षितीज    ''आणि जास्त दिवस लागले तर?'' भूमी त्याच्याकडे बघत विचारत होती.    ''तर मी तिकडे येईन तुला भेटायला.'' म्हणत क्षितीज हसला.    ''नको, मी लवकरात लवकर जाऊन येईन.'' भूमी    ''एक महिना? यार मिस करेन मी तुला...   एक दिवस तुला न पाहत राहवत नाही. एक महिना कसा जाणार ?’’ क्षितीज    ''म्हणूनच सांगत नव्हते, मग जाऊ कि नको? इथेच ट्रीटमेंट घेता येईल. जायलाच पाहिजे असे काही नाही.'' भूमी    ''नको, जा तू. माझी मदत लागली तर सांग.'' बोलत क्षितीजने तिला आपल्या जवळ ओढले. ''लवकर बरी हो. आणि परत ये, मी वाट पाहीन.'' तिला आपल्या मिठीत घेत तो  म्हणाला.    त्याच्या मिठीत भूमी शांत उभी होती. तिच्या मायग्रेन बद्दल सगळं खरं असलं तरीही, तिच्या लंडन ला जाण्यामागची करणे वेगवेगळी होती.  तिच्या आयुष्यात अजूनही बऱ्याच गोष्टी घडत होत्या. काय ते तिला माहित होत. पण क्षितिजला आत्ता सांगता येन शक्य नव्हतं. त्याने अजून गैरसमज वाढतील असे तिला वाटले. *****नाना आणि माईना समजावून तिने आपला लंडनला जाण्याचा निर्णय फिक्स केला. ती किर्लोस्करांची मुलगी आहे, हे कळल्यावर नानांना फार बरं वाटलं. कमीत कमी तिच्या अस्तित्वावर शिक्का मोर्तब झाला होता. तिला तिची ओळख पटली होती. आणि एक नवीन ओळख मिळाली होती. विभासच्या प्लॅनमधूनही तिची सुटका होणार होती.  मायग्रेन विषयी कळताच माईना काळजी वाटू लागली. 'जा परदेशी आणि बरी होऊन लवकर परत ये.' असे त्या म्हणाल्या.  राहून राहून तिला वाईट एकाच गोष्टीचे वाटत होते. 'जेव्हा क्षितिजला कळेल कि ती एक महिन्यासाठी नाही तर कायमचीच तिथे चालली आहे.'तेव्हा त्याला काय वाटेल? मला तो चुकीचं तर समजणार नाही ना? असा तिला प्रश्न पडला. त्याला सोडून जाणे तिच्यासाठी खूप अवघड होते. पण नाइलाज होता.’   'निधीला सांगणे अपरिहार्य होते, भूमीने सर्व गोष्टी निधीला विश्वासात घेऊन तिच्या कानावर घातल्या. कोणाला तरी सत्य माहित असायला पाहिजे होते. त्यामुळे खरे आणि क्षितीज पासून लपवून ठेवलेले सगळे निधीला सांगितल्यावर तिला हायसे वाटले.  ''एक ट्रिप तो बनता है. तू लंडनला जाण्याआधी एकदा आपण सगळे पिकनिकला जाऊया ग प्लिज.'' निधी तिला रिक्वेस्ट करत होती.  ''ओके, डन. तू प्लॅनिंग कर. मी नक्कीच येणार.'' भूमी म्हणाली.  ''तुझ्या अशा एकाएकी जाण्याने क्षितिजला खूप वाईट वाटेल. बिचारा हे सहन करू शकणार नाहींग. खूप प्रेम करतो तुझ्यावर.'' निधी  ''माहित आहे, त्याला सोडून जाणे मला तरी कुठे शक्य आहे. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता त्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही.'' भूमी  ''होय, तुझ्या जाण्याने सगळे प्रश्न सुटणार असतील तर तू जा. मी अडवणार नाही.'' बोलताना निधी भावून झाली होती.  ''थँक्स डिअर, आणि तू यातलं काहीही क्षितिजला सांगणार नाहीस. प्रॉमिस मी.'' भूमी  ''प्रॉमिस. मी तुला खूप मिस कारेन. तिथे गेल्यावर मला विसरू नकोस, रोज फोन करायचा समजलं का?'' निधी  ''थँक्स यार.'' भूमी  ''ए माझ्या आणि नीलच्या लग्नाला येशील ना? प्लिज.'' निधी म्हणाली  ''तुम्ही खरंच लग्न करणार आहात? आणि संजनाचं काय?'' भूमी  ''नीलने तिला सगळं सांगितलं आहे, लग्नामागील सत्य समजल्यावर ती सुद्धा या बंधनात राहायला तया नाही. मुळात ज्यात प्रेमच नाही. अशा नात्याला अर्थ काय?'' निधी  ''ओके, गुड. तिच्या बद्दल वाईट वाटत ग. असो तू मला कळवं, येण्यासारखं असेल तर मी नक्कीच येईन.'' भूमी  ''होय, अजून काही राहिली का? कि मी निघू आता?'' भूमी  ''हो निघ, तयारीला लाग. मी पिकनिक प्लॅन करते. आणि तुला कळवते.'' निधी बोलत असताना त्या दोघीही उठून हॉटेलमधून निघाल्या. निधीला बाय करून भूमी टॅक्सिमध्ये बसली. आणि निधी तिच्या गाडीने पुढे निघून गेली.  *****'भूमीला क्षितिजच्या आयुष्यातून कायमच दूर करण्यासाठी त्याच्या आईने म्हणजेच मेघाताईनी प्लॅनिंग केले होते. पण त्यांना राहून राहून सारखे वाटत होते कि ते एवढे सहज सोपे नाहीय. तो भूमीला विसरू शकणार नाही. आणि आपल्या सांगण्यावरून ती परदेशी जात आहे, हे क्षितिजला समजले तर तो त्यांच्यावर खूप चिडेल. हे त्यांना माहित होते. त्यात मिस्टर सावंत वरचेवर आजारी पडत होते, त्यांच्या अस्थम्याच्या आजाराने त्या चिंतीत होत्या. त्यांच्या चेहेरा चिंताग्रस्त होत चालला होता. क्षितीज घरी आला तेव्हा त्या सोफ्यावर बसून त्याचीच वाट बघत होत्या.'  ''आई, तू अजून जागी आहेस?'' क्षितीज त्यांच्या शेजारी बसत बोलला.  ''होय, तुझीच वाट बघतेय. जेवलास का?'' मेघाताई  ''हो मी जेवून आलोय, तू?'' क्षितीज  ''मी जेवले. तुझे बाबा आजकाल थोडे थकल्या सारखे वाटतात. त्यांना लोड सहन होत नाहीय वाटत. त्यांची काळजी वाटते.'' मेघाताई  ''आई, मी त्यांना सांगत असतो थोडा काम मला पण सांगत जा, पण ते एकटेच सगळं हान्डेल करत असतात. त्यांचा अजूनही माझ्यावर विश्वास नाहीय वाटत.'' क्षितीज  ''तू थोडं लक्ष देत जा आता. त्यांना अस्थमा आहे, आता या वयात जास्त दगदग करून चालणार नाही.'' मिसेस सावंत  ''होय, मी स्वतः हुन काही गोष्टी माझ्या हातात घेतो, मग त्यांना थोडा आराम मिळेल.'' क्षितीज सोफ्यावर आडवा होत म्हणाला.  ''ओके, गुड नाईट. वर जाऊन झोप.'' म्हणत त्या उठून झोपायला निघून गेल्या. क्षितीज उठून त्याच्या रूममध्ये आला आणि फ्रेश होऊन अंथरुणावर पडला. पण झोप लागत नव्हती.  तो भूमीचा  विचार करत होता. आज ती जरा जास्तच इमोशनल होती. न बोलावता स्वतःहून त्याला भेटायला आली होती आणि महत्वाचे म्हणजे तिला मायग्रेन असल्याचे समजल्यावर त्याला तिची काळजी वाटू लागली. आज ती कमालीची शांत होती. तिच्या मनात काहीतरी चाललंय. त्याच्या थांग पत्ता ती आपल्याला लागू देत नाहीये. असं त्याला वाटत होत.  *****'निधीने आयोजित केलेल्या पिकनिकला सगळे एन्जॉय करत होते. बीच म्हणजे भूमीचे फेव्हरेट डेस्टिनेशन मग कोणताही असो. त्यामुळे ती मस्त रमून गेली होती. तिच्यासोबत क्षितिजही होता. तो येणार हे भूमीला माहित नव्हते. पण निधीने त्याला कन्व्हेन्स केले. आणि तो त्यांच्या सोबत आला होता. निधीच्या दोन मैत्रिणी सीमा आणि जयश्री तिच्या सोबत होत्या आणि नीलाही. भूमी मात्र प्रत्येक क्षण मस्त मजेत घालवत होती.  जेवढा वेळ क्षितीज सोबत घालवता येईल तेव्हढा वेळ ती त्याच्या सोबत होती.'  'संध्याकाळी मस्त सूर्यास्त टिपताना दोघेही मऊशार वाळूमध्ये एकमेकांच्या सानिध्यात बसलेले होते. खाली बसलेल्या क्षितिजला टेकून ती ''त्याच्या छातीवर डोकं ठेवून सूर्यास्ताकडे बघत होती. तिच्या भोवती आपले हात गुंडाळून त्याने आपली हनुवटी तिच्या डोक्यावर टेकवली होती. थंडगार वाऱ्याने चौफेर पसरलेले तिचे केस तो आपल्या हाताने सावरत होता.'''क्षितीज, तुला माहित आहे, मी लहान असताना पासून मला हे शांत समुद्र किनारे आणि संध्याकाळी नंतर अंधार पडतानाचे निर्भर आकाश पाहण्याची आणि त्याचे निरीक्षण करण्याची खूप आवड होती. पुढे पुढे मी अगदी रात्र रात्र आकाशाकडे डोळे लावून बघत बसायची. माहित नाही का? पण मला त्याची प्रचंड ओढ आहे.''  ''होय, आणि तुझ्या या वेडापायी मी सुद्धा आजकाल आकाशात टक लावून बसलेलो असतो. तुला चंद्र ताऱ्यांच वेड आहे, आणि मला तुझं.'' क्षितीज बोलत होता.  ''प्रेम म्हणजे एक प्रकारचे वेडच.''  भूमी  ''वेळ, काळ याचं भान राहत नाही. आजकाल तर कंपनीमध्ये सुद्धा माझं लक्ष लागत नाही. तू जॉब सोडल्या खूप पासून कंटाळा येतो.'' क्षितीज  ''असं करू नकोस, पप्पाना काय वाटेल. एकतर आधीच कंपनी लॉस मध्ये आहे, किती मोठमोठे घोटाळे सुरु आहेत.'' भूमी  ''अरे हो, सांगायचं राहील. दोन दिवसापूर्वीच तो चंदिगढ फ्रॉड पकडला गेला. तू आणि पप्पांची आयडिया सक्सेसफुल झाली.'' क्षितीज आनंदाने तिला सांगत होता.  ''या मागे कोण होत? कोणाचं नाव पुढे आलं?'' भूमी  ''मुखर्जी साहेब. दुसरं कोण असणार? ज्या लॅब मध्ये हस्तक्षर तपासणी साठी दिले होते, तेथील उच्च अधिकाऱ्याला पैसे देऊन मॅनेज करत होते, तेव्हा आपला लोकांनी कॅमेरामध्ये रेकॉर्डिंग केलं होत. पोलीस पुढचा तपास करत आहेत, सो चंदिगढ केस सोडून अजून त्याने कायकाय घोटाळे केले आहेत हे लवकरच उघड होईल. इट इज जस्ट बीकॉज ऑफ यु.  '' क्षितीज  ''ग्रेट, छान झालं. निदान जाता जाता मला कंपनीसाठी काहीतरी करता आलं. पण सरांना शेवटचं भेटताही आलं नाहीय, याच वाईट वाटतंय.'' ती चटकन बोलून गेली.  ''शेवटचं का म्हणतेस? तू लंडनला जातेस ते हि हेल्थ ट्रीटमेंट साठी हे मी त्यांना सांगितलं आहे. सो तुला वेळ मिळेल तेव्हा भेट त्यांना. तसही लंडनहून आल्यावर भेटता येईल ना.'' क्षितीज  ''होय, आल्यावर भेटेन.'' म्हणत ती शांत झाली. आता त्यांना भेटणे शक्य नाही. निरोप घेणेही शक्य नाही हे तिला माहित होते.  आपण इथून जाताना काय काय मागे सोडून जातोय, हे आठवल्यावर तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले.  ''भूमी, इमोशनल फुल आहेस तू. केवढ रोमँटिक वातावरण आहे, आणि तू रडत बसणार आहेस का?'' क्षितीज तिच्याकडे बघत म्हणाला. तशी ती ''सॉरी.'' बोलून तिचे डोळे पुसू लागली. ''तू ना रडताना पण सुंदर दिसते यार.'' म्हणत त्याने तिला आपलाकडे ओढले. ती जवळजवळ त्याच्या अंगावर पडणारा होती, आणि क्षितिजने तिला दोन हातांनी धरून सावरलं होत. तिच्या कमरेभोवती त्याचा हात आला होता. तिच्या अजूनच जवळ जात त्याने तिच्याभोवती आपल्या हाताची पकड  घट्ट केली. तो अगदी तिच्या जवळ आला होता. अगदी श्वासाच्या अंतरावर.  आणि तिने लाजून मान खाली वळवली.  ' हाताने तिची हनुवटी वरती उचलली आणि भूमीच्या डोक्यावर क्षितिजने आपलं डोकं टेकवलं. ती डोळ्याच्या पापण्यांची फडफड करत  त्याच्याकडेच बघत होती. तिच्या थरथरत्या ओठांपर्यंत त्याचे ओठ पोहोचले होते. . . तो काय करतोय हे भूमीला समजलं, ''क्षितिज आपण...'' आपण बाहेर आहोत असं ती बोलणार होती एवढ्यात त्याच्या फोनची रिंग झाली. आपल्या उजव्या हाताचे बोट तिच्या ओठांवर ठेवून डाव्या हाताने त्याने फोन उचलून स्पीकर वर टाकला. पलीकडून निधीचा फोन होता. 'अरे कुठे आहेत तुम्ही दोघे, रात्र झालीय, आम्ही वाट बघतोय, पटकन जेवायला या.' निधी बोलत होती. ''इथे समोरच आहोत. आलो...'' म्हणत क्षितिजने फोन कट केला. ''बरं, तर आपण कुठे होतो.'' म्हणत त्याने मिश्कीलपणे हसत भूमीकडे पहिले.''काय? इथेच होतो आपण. पुरे आता चला. उगाच उशीर नको. म्हणत ती त्याला ढकलून उठली. ''काही उशीर होत नाही. थोड्यावेळाने काय फरक पडतो?'' क्षितिजत्याला उठवत भूमी म्हणाली. ''उठ ना. थोड्यावेळा काय ? थोड्यावेळ?''''थोडावेळ नाही, किस करायला दोन मिनिट पुरे असतात. हा आता तुला  त्यानंतर सावरायला वेळ लागतो म्हणा. त्यात माझा काय दोष?'' म्हणत तो हट्टीपणाने तिथेच खाली बसून राहिला.''पुरे हा चावटपणा. चल मी जाते.'' म्हणत भूमी नकट्या रागाने एकटीच पुढे निघाली. तसे तो उठून तिच्या मागोमाग आला. तिच्या खांद्यावर हात ठेवून, त्याने ''रुसूबाई. गंमत केली.'' म्हणत तिचा गालगुच्छ घेतला आणि ‘’हट्टी आहेस तू’’ म्हणत तिने नाक फुगवून त्याला हलकेच एक ठोसा मारला. आणि दोघेही तिथून निघाले.  सगळ्यांनी वाट बघून जेवायला सुरुवात केली होती. शेवटी जेवणाच्या टेबलवर क्षितिज आणि भूमी पोहोचले होते. निधी लव्ह बर्ड्स म्हणून चिडवू लागली. ''काय मज्जा आहे बुवा, कोणीतरी जाणारे तर कोणीतरी तिला सोडायला मागत नाहीये. आम्ही पण आहोत इथे. जरा इकडे पण लक्ष असुद्या.''  भूमी काहीही न बोलता खाली मान घालून चुपचाप जेवत होती. क्षितीज तिच्याकडे बघून हसला.  ''तुझ्याकडे लक्ष द्यायला आता कोणीतरी आहे म्हंटल.'' क्षितीज नीलकडे बघत म्हणाला.  आणि निधी हसायला लागली. ''शी इज फ्री, कोणी हि लक्ष् दिले नाही तरी तिला काही फरक पडत नाही.'' निल  ''ए आपण भूमी रिटर्न आल्यावर पुन्हा एकदा अशी ट्रिप काढूया.'' क्षितीज म्हणाला आणि भूमीला जोराचा ठसका लागला. एक पाण्याचा ग्लास घेऊन त्याने तो तिच्या तोंडाला लावला. थोडं पाणी पिऊन ती शांत झाली. तरीही तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागला.  ''सावकाश. आर यु ओके?'' म्हणत क्षितीज तिच्या पाठीवरून हात फिरवत होता. तिने आपले डोळे पुसले. ''मी ठीक आहे.'' म्हणत उठून ती बेसिन कडे वळली. निधी व्यतिरिक्त कोणालाही माहित नव्हते. तिच्या परत येण्याच्या अपेक्षा फार कमी होत्या. त्यामुळे क्षितीज बोलला आणि ते ऐकून तिला ठसका लागला. निधी वेळीच भूमीला सावरले आणि ती तिला रूममध्ये घेऊन आली.''निधी मी जातेय खरं, पण क्षितीज स्वतःला नाही सांभाळू शकत. त्याला समजल्यावर खूप त्रास करून घेईल स्वतःला. काय करू?'' एवढं बोलून ती निधीच्या मांडीवर डोकं ठेवून ओक्सबोकसी रडू लागली.''चिल, तू का जातेस? आणि त्याने काय होणार आहे? हे आपल्याला माहित आहे. दुसरा कोणताही पर्याय नाहीय, सो तू जा. आम्ही आहोत क्षितिजला सांभाळायला. अर्थात तुझी उणीव भरून काढता येणार नाही. पण मी आणि निल मिळून प्रयत्न करू.'' निधी तिच्या पाठीवर हात फिरवून तिला समजावत होती.  थोड्यावेळाने भूमीने स्वतःला सावरले. क्षितीज समोर नॉर्मल केला. त्यामुळे त्याला काहीही समजले नाही. संपूर्ण ट्रीपमध्ये भूमीने त्याला काहीच कळू दिले नाही.*****   ' मैथिलीला घेऊन तिचे पप्पा एरपोर्टला पोहोचले होते.  नाना आणि माई गावी गेले होते. त्यामुळे भूमीने त्यांना फोन करून निघत असल्याचे सांगितले. सगळी तयारी करून भूमी बाहेर पडली. क्षितीज गाडी घेऊन तिला सोडायला आला होता. खाली येऊन त्याच्या गाडीत बसल्यावर ती शांत होती. तो देखील काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. एकमेकांपासून लांब राहणं त्यांना दोघांनाही शक्य नव्हतं. गाडी पार्क करून त्याने तिची बॅग बाहेर काढली.''बाय, काळजी घे, आणि लवकर बरी होऊन रिटर्न ये.'' क्षितीज म्हणाला.  हातात बॅग घेऊन ती तिथेच थांबली होती. तिचे डोळे पाण्याने भरले होते. ''तू स्वतःची काळजी घे. आणि कंपनीमध्ये लक्ष देत जा.'' भूमी  ''येस, निघ तू फ्लाईटचा टाइम झाला आहे. चेकइन ला वेळ जातो.'' म्हणत क्षितीज मागे वळला. आणि भूमी पुढे निघाली. दोन-चार पाऊल पुढे जाऊन ती पुन्हा मागे धावत आली, तो पाठमोरा उभा होता, ती तशीच त्याला मागूनच त्याला बिलगली.''सो सॉरी क्षितीज, मी तुला खूप मिस करेन.''  ''सॉरी काय ग, तुला ट्रीटमेंट ची गरज आहे, सो तू जा. आणि मिस करशील तेव्हा कॉल करत जा, फोन आहेच आपण बोलू शकतो.'' म्हणत क्षितीजने समोर उभे करत तिला  मिठी मारली. ती फक्त रडत होती. ''या वेडाबाई, आता माझा शर्ट भिजवायचे प्लॅनिंग आहे का?किती रडतेस. शांत हो.''  म्हणत त्याने तिच्या कपाळावर किस करत लाडाने तिचे दोन्ही गाल आपल्या हातात पकडले. तसे तिने डोळे पुसले. ''काळजी घे, आणि मला परतायला उशीर झाला किंवा अजून काहीही झालं, हे तुला अपेक्षित नसेल, तर स्वतःला त्रास करून घेऊ नको. आपण एकमेकांसोबत असणे किंवा नसणे हा निव्वळ योगायोग आहे, जे नशिबात असेल ते होणार. ते एक्सेप्ट करूया.ओके?''  ती त्याच्या कॉलर वरून हात फिरवत म्हणाली. ''एस, एकमेकांचा नशिबात तर आपण आहोतच, बी कॉज स्टार्स विथ अस. आणि ज्या स्टार्स नी आपली भेट घडवून आणली आहे ना ते नेहेमीच आपल्याला एकत्र ठेवतील, आपण कितीही दूर गेलो तरीही. सो डोन्ट वरी.'' क्षितीज ''आपलं प्रेम म्हणजे आपल्याला मिळालेलं त्या स्टार्सच गिफ्ट आहे, आपल्याला मिळालेलं नक्षत्रांच देण आहे, ते कायम अबाधित असेल. सेम लाइक स्टार्स.''म्हणत भूमीने त्याच्या हातावर हलकेच आपले ओठ टेकवले आणि त्याच्या निरोप घेतला. ती में गेटच्या दिशेने निघाली. आणि क्षितीज तिच्याकडे मागे वळून न बघता आपल्या गाडीकडे वळला. तिला आपल्या पासून डर जाताना बघणं त्याला शक्य नव्हतं. ती कायमचीच आपल्या पासून दूर जाते हेही त्याला माहित नव्हतं. ती लवकरच परतणार या आशेवर तो गाडीत बसून घराकडे निघाला.क्रमशhttps://siddhic.blogspot.com/
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!