नक्षत्रांचे देणे ४०

By siddhic on from https://siddhic.blogspot.com

 ''हॅलो भूमी कुठे आहेस? काल ठरल्याप्रमाणे नाना-माईंना घेऊन तू इथे होतीस.'' क्षितीज भूमीला फोनवर विचारत होता. पत्रकार आलेले होते. भूमीच्या लग्नाचे सत्य सगळ्यांना सांगण्यासाठी नाना आणि माई तिथे उपस्थित राहणार होते. पण भूमी अजूनही तिथे पोहोचलेली नव्हती.    ''मला शक्य होणार नाहीय. बहुतेक.'' पलीकडून भूमी बोलत होती.    ''का? काय झालं? मी घ्यायला येऊ का?'' क्षितीज    ''नको. माई आणि नाना पोहोचतील एवढ्यात. मी प्रयत्न करते. जमेल का माहित नाही.'' भूमी    ''ओके, नानांना तरी पुढे येउ देत. नाहीतर फार गोंधळ होईल. आणि मला इथे सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावे लागेल.'' क्षितीज    ''हो, ते आले असतील बघ. बाय. कॉल यु लेटर.'' म्हणत तिने फोन ठेवला.    'नाना आणि माई तिथे पोहोचले होते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचे त्यांनी उत्तरही दिले. भूमीची विभासने केलेली फसवणून आणि मुळातच अमान्य असलेलं त्यांचे लग्न आणि त्याचे सत्य जगासमोर आले होते. त्यामुळे क्षितीज खूष होता. पत्रकार निघून गेले आणि नाना माईना गाडीमध्ये बसवून क्षितीज कंपनीमध्ये निघाला. भूमीला एवढे  काय महत्वाचे काम होते? याचा विचार तो करत होता.    इकडे भूमी आश्रमात आली होती. तिथे तिला खूप महत्वाची गोष्ट समजली होती. ते समजल्यानंतर तिला शॉक बसला. ती तशीच घरी निघाली. एक पेच संपतो न संपतो तो दुसरा पेच समोर येऊन उभा राहत होता.  परिस्थितीला कसे समोर जावे हेच तिला कळेना. sk ग्रुप ने तिचा राजीनामा मान्य केला होता. त्यामुळे तिच्या हातचा जॉब हि गेला होता. आणि आत्ता पुन्हा त्या कंपनीत जाणे तिला शक्य नव्हते. क्षिती बरोबर बोलून गोष्टी सुटल्या असत्या पण तिने तसे केले नाही. कारण हि तसेच होते.    ***** इकडे ऑफिसमध्ये आल्या आल्या क्षितिजला एक नवी बातमी समजली. दोन दिवसांपूर्वी मैथिली शुद्धीवर आली होती. ती कमरेखाली अपंग झाली होती. पण तिला शुद्ध आली होती. हे समजल्या वर त्याने हॉस्पिटलकडे धाव घेतली. तिथे डॉक्टरांशी बोलणे झाले. मैथिली  शुद्धीवर आली होती.पण तिची स्मृती निघून गेली होती. ती कोणालाही ओळखत नव्हती. त्यात शाररिरीक अपंगत्व घेऊन. त्यामुळे सगळे टेन्शनमध्ये होते. क्षितिजला मनातून खूप खजील झाल्यासारखं झालं. त्याच्या अपेक्षे प्रमाणे ती मरणाच्या दारातून परतली होती. पण आता हे शारीरिक आणि मानसिक अपंगत्व कोणाच्यानेही सहन होण्यासारखे नव्हते. तिची स्मृती परत येण्याची शक्यता होती. पण या अपंगत्वातून तिची सुटका अटळ आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. तिच्याकडे बघताना क्षितिजचे डोळे अचानक भरून आले. एक मैत्रीण एक चांगली हुशार सहकारी म्हणून तिचे त्याच्या मनातील स्थान अढळ होते. तिथून परतताना भूतकाळातल्या कितीतरी गोष्टी कित्त्येक आठवणी त्याच्या डोक्यात फेर धरून नाचत होत्या. काही चांगल्या काही वाईट पण आठवणी विसरणे त्याला शक्य नव्हते. तो अगदी निराश होऊन घरी परतला.    ***** क्षितिजच्या आईने त्याला घरी पहिले, तो कमालीचा निराश होता. मैत्रीलीच्या शुद्धीवर येण्याची बातमी त्यांना समजली होती. त्यांनाही तिच्या अपंगत्वाबद्दल वाईट वाटले.  असे आयुष्य देवाने का द्यावे ? असा प्रश्न पडला. त्यांनी क्षितिजला समजावले पण तो निराशाच होता.    फ्रेश होऊन तो जुन्या आठवणी आणि आपला भूतकाळ यांचा विचार करत बसला होता. खूपदा फोन ट्राय करूनही  भूमीने रिप्लाय देत नव्हती. कंटाळून तो तयार झाला आणि काइट्स माउंटनच्या दिशेने निघाला. निराशेमध्ये आपले मन रामवण्याचे त्याचे एकमेव आवडते ठिकाण.    *****    'सगळ्या लीगल फॉर्मेलिटीज कम्प्लिट झाल्या होत्या. भूमीने किर्लोस्कर आणि इतर मदतनिसांचा निरोप घेतला आणि ती निघाली. तिच्या आयुष्याला कलाटणी देणारी महत्वाची घटना आज घडली होती. आश्रमाने मध्ये तिला अचानक बोलावणे आले आणि ती तडक तिकडे गेली. आश्रमातील महत्वाच्या अधिकाऱ्यांनी तिला तिच्या अस्तित्वाचा मागोवा घेणारी एक महत्वाची फाइल दाखवली. ती आणि तिच्या आईचे फोटो, तिच्या बाबांचे फोटो आणि तिच्या जन्मदाखला. तिची आई तर तिच्या लहानपणीच देवाघरी गेली होती. पण तिचे बाबाही देवाघरी गेल्याचे तिला सांगण्यात आले होते ते साफ खोटे होते. तिच्या बाबांची दुसरी पत्नी म्हणजे तिची आई. पण हे त्यांचे गुपचूप झालेले लग्न. प्रेमविवाह होता आणि मुळातच त्यांची पहिली पत्नी हयात होती.  त्यामुळे घरून मान्यता नव्हती, त्यामुळे भूमी आणि तिच्या आईला कोणीही स्वीकारले नाही. आपल्या लहानग्या मुलीला घेऊन भूमीच्या आईनी भूमी सहा महिन्यांची असतानाच सासर सोडले. त्यांचे नाव आणि आडनावही आपल्या नावातून काढून टाकले. भूमीला त्यांच्याबद्दल काहीही माहित कळणार नाही अशी व्यवस्था केली. तिचे बाबा तिच्या लहानपणीच देवाघरी गेले आहेत असे तिला सांगण्यात आले, पण तसे नव्हते. ते त्यांच्या पहिल्या पत्नीबरोबर शहरात राहत होते. त्यांना एक मुलगीही होती.'    'दुसरे तिसरे ते कोणीही नसून खुद्द sk ग्रुपचे सेकेंड ओनर कोर्लोस्कर तिचे वडील होते. हे तिला आश्रमात आल्यावर समजले. तेही एवढ्या उशिरा समजण्याचे कारण म्हणजे किर्लोस्करांची एकुलती एक मुलगी आणि त्यांचा एकुलता एक वारस आता असून नसल्यासारखा होता. मैथिलीची अवस्था समजल्यावर किलरोस्करांच्या पायाची जमीन सरकली. आता त्यांना कोणीही वारसदार नव्हते, त्यात त्यांना हृदयविकाराने ग्रासले होते, SK ग्रुप कंपनी हाताची जाण्याची जाण्याची शक्यता होती, हे ओळखून काही दिवसांपूर्वीच किर्लोस्करांनी आपल्या पहिल्या पत्नीचा आणि मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केला होती. आणि आज त्यांच्या शोध त्या आश्रमात येऊन थांबला होता. भूमीच त्यांची मुलगी असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले होते.'    आश्रमातील मदतनीसांनी तिला सगळे पूरावे दाखवले. एवढ्या लहानपणी पासून पोरके म्हणून आश्रमात वाढलेली भूमी,जेव्हा तिला गरज होती तेव्हा कोर्लोस्करांना तिची आठवण आली नाही, आता आपली मुलगी म्हणजेच मैथिली केव्हाही पूर्णपणे बरी होऊ शकत नाही हे त्यांना समजले तेव्हा त्यांनी भूमीचा शोध सुरु केला होता. त्यामुळे त्यांच्या विषयी भूमीला काहीही प्रेम माया वाटत नव्हती. मैथिलीची अवस्था काय आहे, हे समजल्यावर तिला वाईट वाटले. कारण तिचा यामध्ये काहीही दोष नव्हता. त्यात किर्लोस्करांना हृदयविकाराचे दोन झटके येऊन गेल्याचे समजल्यावर ती त्यांना भेटायला तयार झाली. तिची भेट कोर्लोस्करांशी झाली.  त्यांच्या कुटूंबाला आणि कंपनीला भूमीची गरज होती. नाही म्हणणे तिला शक्य नव्हते, त्यामुळे तिने फक्त व्यावसायिक दृष्टया त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. आणि ती तिथून निघाली. *****  'सकाळी क्षितिजच्या आईशी फोनवर बोलणे झाले होते, त्या भूमी बद्दल फारशा सकारात्मक नव्हत्या. असे दिसले आणि महत्वाचे म्हणजे 'माझा मुलगा तुझ्यामुळे माझ्यापासून लांब गेला आहे त्यामुळे क्षितिजच्या आयुष्यातून तू निघून जा.' अशी त्यांनी भूमीला विनंती केली होती. त्यामुळे तिने खूप महत्वाचा निर्णय घेतला होता. ज्याने सगळ्यांचेच प्रश्न सुटणार होते. किरालोस्कराना भेटून आल्यावर तिने आपला निर्णय पक्का केला. 'तिच्याकडे थोडेच दिवस शिल्लक होते त्यामुळे ती क्षितिजला भेटायला गेली. क्षितिजला समजावणे हा तिच्यासाठी महत्वाचा टास्क होता.'   ***** 'काइट्स माउंटन वर येऊन क्षितिज वर आकाशाकडे टक लावून बसला होता. आज त्याला टेबल बुक करावेसे वाटेना, तो तसाच हिरव्यागार गवतावर पहुडला होता. मूड खराब असला तरीही प्रसन्न करणार वातावरण होत. संध्याकाळी अस्ताला गेलेला सूर्य आणि अर्धवट चमकणारा चन्द्र यांच्यामध्ये लुकलुकत आपले अस्तित्व शोधणारे तारे तो आपल्या डोळ्यानी टिपत होता. हळूहळू त्याने आपले डोळे मिटले आणि तो फक्त शांतपणे पडून राहिला. थोड्यावेळाने त्याला त्याच्या डोक्यावर हलकेच थंड असा स्पर्श झाल्याचे त्याला जाणवले.  त्याने डोळे उघडले. भूमी त्याच्या बाजूला बसून त्याच्याकडे बघत होती. तिने आपले ओठ त्याच्या कपाळावर टेकवून हलकेच एक चुंबन घेतले होते. तो तिला बघून उठण्याचा प्रयत्न करू लागला, अन तिने त्याच डोकं आपल्या मांडीवर ठेवून त्याला तसच खाली हिरव्या गवतावर पडून राहायला सांगितलं. ''थँक्स हनी.'' म्हणूं त्याने तिचा हात हातात घेतला.    ''कशाबद्दल?'' भूमी त्याच्याकडे बघत विचारत होती.    ''इथे आलीस म्हणून. आज खूप अस्वस्थ वाटतंय. कुठेही अजिबात मन नाही लागत. तुझीच आठवण येत होती, तर मॅडम फोन नाही घेत. कॉलबॅक सुद्धा नाही करत.'' क्षितीज     
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!