नक्षत्रांचे देणे ३९

By siddhic on from https://siddhic.blogspot.com

 ''तू माझ्या आयुष्यात येण्याआधी मैथिली होती. ती खूप चुकीचं वागली तरीही मी तिच्याशी प्रामाणिक होतो, कारण माझ्यासाठी प्रेमाची व्याख्याच वेगळी आहे. त्यात मी माझं कर्तव्य सोडत नाही. तू मागितलं नाहीस तरीही माझं वचन आहे तुला. काहीही झालं तरीही, जिथे असू तिथे आपण एकत्रच असू.''  क्षितीज   ''थँक्स. माझी आई म्हणायची, 'दूर कुठून, त्या नक्षत्रातून तुला न्यायला कोणी राजकुमार येणार.'  तू आमच्या सोबत आल्यावर तो काय एकटाच राहणार इथे. तू त्याच्या सोबत राहा.' विभास आयुष्यात आल्यावर आईच्या गोष्टी स्वप्नवत वाटायला लागल्या. पण आज वाटतं, त्या दूरवरच्या नक्षत्रांनी तुला माझ्यासाठी बनवलं  असणार किंवा मला तुझ्यासाठी.'' भूमी वर आभाळाकडे बघत म्हणाली.   ''नक्षत्रांचा माहित नाही, माझा तेवढासा विश्वास नाहीय, पण योगायोग मात्र आहे. आपल्या बाबतीत सगळं योगायोगाने जुळून आलं आहे. तो अपघात, तुझं ऑफिस जॉइनिंग आणि काइट्स माऊंटनला आईने ठरवलेली आपली भेट. माझ्या आईचा यात खूप महत्वाचा वाट होता.'' क्षितीज   ''विभास आणि नंतर साठे काकांनी त्यांना जे सांगितलं त्यामुळे तुझ्या आईचं खूप मोठा गैरसमज झालाय. इथे गावी आणि आमच्या नातलगांना खरं काय हे काहीच माहित नाहीय त्यामुले असं झालं.'' भूमी   ''फोटोग्राफरने सुद्धा पुरावे दिले म्हणून आई चिडली.'' क्षितीज   ''होय, पण ते खरच आहे ना. पुरावे खरे आहेत. समाजाच्या दृष्टीने अजूनही मी नानांची सून आणि विभासची पत्नी आहे. हे नाकारता येत नाही.'' भूमी   ''त्यांना खरं काय ते सांगायला हवं ना मग. नाहीतर हे असेच प्रॉब्लेम्स पुन्हा-पुन्हा होत राहतील.'' क्षितीज   ''हो. नाना सगळ्यांना सांगणार आहेत.'' भूमी   ''मला आधी समजलं असत कि तुला या सगळ्या गोष्टी माहित आहेत, तर मी एवढ्या तातडीने इकडे आले नसते.'' भूमी पुढे बोलत होती.   ''यासाठी कॉम्युनिकेशन असावं लागत, तू काहीही न सांगता निघून आलीस, प्रॉमिस यापुढे असं करणार नाहीस.'' क्षितीज तिच्या हात आपल्या हातात घेत म्हणाला.   ''प्रॉमिस.'' म्हणत ती हसली. कितीतरी वेळाने तिला असं हसताना पाहून त्याला बरं वाटलं.   ''तू अशीच खुश राहा, हसत राहा. बाकी घरी आईला वेगैरे काय समजवायचं ते मी बघतो.'' क्षितीज   त्या दोघांच्या काही वेळ गप्पा रंगल्या होत्या. मध्यरात्र केव्हा उलटून गेली दोघांनाही माहित नव्हतं. ते दोघे बोलत असतानाच नाना उठून बाहेर आले होते. त्याच्याकडे पाहून नानांनी ओळखले कि तो क्षितीज सावंत आहे. ज्याच्याबद्दल भूमीने त्यांना सांगितले होते. तरीही भूमीने नाना आणि क्षितीज यांची ओळख करून दिली. विभास बद्दल सकाळी झालेला प्रकार भूमीने क्षितिजच्या कानावर घातला होता. थोडक्यात विभासची प्रतिमा क्षितिजच्या डोळ्यासमोर उभी राहिली.   'लहान असताना साठे कुटुंबीयांनी आश्रमातून भूमीला दत्तक घेतले होते. त्यामुळे तिच्या नावापुढे साठे हे आडनाव लागले. तिने अर्धवेळ काम करून स्वतःचे   शिक्षण पूर्ण केले होते. डिग्री पूर्ण करून चांगलया नोकरीला लागली. माई-नानांचा तिच्यावर एवढा जीव होता कि, नंतर परदेशी असलेल्या आपल्याच मुलाच्या म्हणजेच  विभासच्या लग्नाचा विचार करताना त्यांनी भूमी पहिली पसंती दिली. आणि तिचे विभास बरोबर लग्न लावून दिले. पण हे लग्न होताच कायद्याच्या दृष्टीने अमान्य ठरलं. कारण विभास आधी पासून विवाहित होता. तिची झालेली फसवणूक आणि नंतर तिने आपल्या भविष्याच्या दृष्टीने उचललेले पाऊल.'या क्षितिजला समजल्या होत्या. सगळ्या गोष्टी क्षितिजला समजल्या होत्या.' नानांनी त्याला महत्वाचे असे सगळेच सांगितले होते. थोडंफार बोलणं झाल्यावर त्या दोघांनाही झोपायला सांगून नाना त्यांच्या रुममध्ये निघून गेले.    'भूमिकची डोकेदुखी, मध्येच होणारी चिडचिड आणि बदलणारा स्वभाव कशामुळे आहे हे क्षितिजच्या लक्षात आले होते. सकाळी घरी आई-पपांना फोन करून सगळ्या गोष्टी कानावर घालायच्या असे त्यांनी ठरवले. पाहुण्यांसाठी असलेल्या खोलीत त्याच्या झोपण्याची सोया करून भूमी झोपायला निघून गेली.’   ***** 'सकाळी क्षितिजने घरी फोन करून सगळे इत्यंभूत कानावर घातले होते. नानांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलाने केलेल्या कृत्याबद्दल सांगितल्यानंतर बऱ्यापैकी गैरसमज दूर झाला होता.' 'नाही म्हंटल तरीही मेघाताईंना हे लग्नाचे कोडे पटलेले नव्हते. विभास आधी लग्न झालेले असले तरीही भूमीचे आणि विभासाचे लग्न झाले ना. मग लग्नाच्या विधी तर असणारच, मग कायद्याच्या दृष्टीने त्याला मान्यता दिली तरीही लग्न ते लग्नच. उघडपणे त्या क्षितिजला काहीही बोलत नसल्या तरीही त्यांचे संस्कारी आणि प्रतिगामी विचाराचे डोके हे लग्न अमान्य आहे हे मानायला तयार नव्हते. विभास आणि भूमीचा नवरा-बायको म्हणून काही संबंध आला असेल तर? अशी मुलगी आमच्यासारख्या घरंदाज लोकांची सून म्हणून येणार? ती अनाथ असणे वैगरे ठीक होत पण हे लग्नाचं गूढ त्यांना पटलेले नव्हतं. असल्या नको त्या विचाराने त्यांच्या मनात भूमीविषयी दूषित विचाराने जागा घेतली होती.   'उगाच आपण पुढाकार घेऊन त्या दोघांनाही काइट्स माऊंटनला भेट घडवून आणली. नाहीतर हे पुढे काही घडलेच नसते.' असे त्यांना वाटू लागले. पण आत्ता क्षितिजच्या पुढे त्यांचे काही चालेना.' 'विभासने कालवलेले विष भूमीच्या आयुष्यात पसरायला लागले होते. ती ठिणगी वणव्याची रूप धारण करायला पुरेशी होती.'   'आत्ता भूमीच्या दृष्टीने नाना-माईनाइथे गावी ठेवणे योग्य नव्हते. विभास इथे येऊन त्यांना त्रास देण्याची शक्यता होती. त्यांच्या जीवाला धोका आहे हे ओळखून भूमी त्या दोघांना घेऊन शहरात यायला निघाली. क्षितिजही सोबत होता.   'गोष्टी सावरत आहेत. असे वाटत असतानाच विभासने अजून एक कारस्थान रचले. त्याच्या सांगण्यावरून सकाळच्या न्यूज पेपरला त्याचे आणि भूमीचे लग्नाचे फोटो छापून आले होते. 'बिझनेसमॅन संजय सावंतांची होणारी सून आधीपासूनच विवाहित.' अश्या हेडींगने अनेकांचे लक्ष वेधले. SK ग्रुपच्या  शत्रूंना आयतेच कोलीत सापडले होते. त्यामुळे सर्वत्र सावंत फॅमिली आणि भूमीवर चिखलफेक सुरु झाली होती. भूमी शहरात पोहोचे पर्यंत या बातमीने गोंधळ उडाला होता.'   'संध्याकाळी घरी आल्यावर मेघाताईंनी क्षितिजला हि बातमी दाखवली. त्याला धक्का बसला. न्यूजवाल्यांशी संपर्क साधून त्याने माहिती काढायला सुरुवात केली. साहजिकच त्याने ओळखले विभास शिवाय हे कोण करणार?'   'हे भूमीला समजल्यावर तिचे अवसान गळून पडले. एक गोष्ट सावरली तर विभासने नवीन डाव रचला होता. नानांची संपत्ती मिळवण्यासाठी तो वाट्टेल त्या थराला जायला तयार होता.'   'भूमीबद्दल आधीच शासंक असलेल्या मेघाताईंच्या मनात अजून नकारात्मक भावना निर्माण झाली. लग्नाच्या आधीच या मुलीने आमच्या आयुष्यात वादळ निर्माण केले आहे, नंतर काय होईल? खरंखोटं काहीही असो, पण हि मुलगी क्षितिजच्या आयुष्यात यायला नको. असे त्यांनी मनाशी  पक्के ठरवले.’   *****     ''हॅलो भूमी कुठे आहेस? काल ठरल्याप्रमाणे नाना-माईंना घेऊन तू इथे होतीस.'' क्षितीज भूमीला फोनवर विचारत होता. पत्रकार आलेले होते. भूमीच्या लग्नाचे सत्य सगळ्यांना सांगण्यासाठी नाना आणि माई तिथे उपस्थित राहणार होते. पण भूमी अजूनही तिथे पोहोचलेली नव्हती.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!