नक्षत्रांचे देणे ३८

By siddhic on from https://siddhic.blogspot.com

 'संध्याकाळ झाली तेव्हा निधीने नानांच्या मोबाइलवर फोन केला होता. क्षितीज भूमीला शोधात गावी येईल निघाला आहे, हे समजल्यावर नानांनी ताबडतोप भूमीला त्याला फोन करण्यासाठी सांगितले. भूमीचा फोन अजूनही बंद होता. तिने तो चालू केला आणि क्षितिजला फोन लावला. आता त्याचा फोन बंद येत होता.'   काय करावे हे भूमीला कळेना. 'तिथून निघताना मी फोन करत होते, तो त्याने उचलला नाही. आणि आता तो गावी का येतोय? त्याला जर विभास बद्दल सगळे कळले आहे तर त्याचा गैरसमज होणे साहजिकच आहे. मग एवढ्या लांब येण्याचे कारण काय? मला जाब विचारायला?'  एक ना अनेक प्रश्नांची सरमिसर तिच्या मनात सुरु होती. त्याच्या घरी कोणाला फोन करणे आता शक्य नव्हते. ते लोक रिप्लाय करतील असे तिला वाटत नव्हते.  आधीच विभासमुळे घरी घडून गेलेला प्रसंग आणि आता हे, त्यामुळे ते तिघेही चिंतेत होते.'   'नाना-माईना बळेच थोडं जेवायला देऊन ते झोपले, तिला काही खाण्याची इच्छा होईना. रात्र झाली तरीही क्षितिजचा फोन लागेना. झोप उडाली होती. आपण घाई करून निघायला नको होत. क्षितिजला सांगायला पाहिजे होत. असं तिला वाटू लागलं. तो आता कुठे असे? एवढ्या लांब शहर सोडून गावी एकटाच येतोय. तेही नवीन ठिकाणी. अजून का पोहोचला नाही? तिला कळेना. तिने पुन्हा फोन ट्राय केला. रिंग वाजत होती. पण कोणताही रिस्पॉन्स नव्हता. तिने पुन्हा-पुन्हा ट्राय केले. जवळपास अर्ध्या तासाने पलीकडून क्षितिजने फोन उचलला होता. ''दार उघड, मी बाहेर आहे.'' एवढेच बोलून त्याने फोन ठेवला. भूमीने धावत  जाऊन दरवाजा उघडला. पाहते तर गाडी बाहेर लावून क्षितीज तिच्याच दिशेने येत होता. त्याला बघून तिला हायसे वाटले.'   तो शांतपणे येऊन तिच्यासमोर उभा राहिला. काय बोलावं तिला सुचेना. तो सुखरूप आहे, आणि व्यवस्थित घरी पोहोचलाय हेच तिच्यासाठी फार होते. तोंडातून एकही शब्द फुटतं नव्हता. ती फक्त समोर बघत तशीच उभी राहिली. ''मी अगदी व्यवस्थित आहे. रस्त्यामध्ये गाडी दोन वेळा पंक्चर झाली, त्यामुळे लेट झालं.''  भूमीने न विचारातही क्षितिजने तिच्या अबोल प्रश्नांची उत्तरे दिली होती.   ''सॉरी. कितीदा फोन ट्राय केला. का उचलला नाहीस?'' भूमी    ''तुझ्यासारखं फोन बंद करून तरी नाही ठेवत ना? आता समजलं फोन कशासाठी असतो ते.'' क्षितीज   ''निघण्यापूर्वी मी तुला फोन ट्राय केला होता. तू नाही घेतलास.'' भूमी त्याला समजावत होती.   ''ड्राइविंग करत होतो. अशावेळी मी फोन नाही घेत. तुला माहित आहे. मग फोन स्विचऑफ करण्याची काय गरज होती?'' क्षितीज     ''तेव्हा घडलेल्या प्रकारामूळे काय करावं मला सुचेना. मी डिस्टर्ब होते. आणि मला वाटलं तू पण माझ्यावर रागावला असशील. सो.... '' बोलताना भूमीच्या पाणी जमा झालं होत. अगदी निकराने प्रयत्न करूनही तिला ते लपवता आलं नाही. क्षितिजच्या  गोष्ट सुटलीही नाही.  तिच्या चेहेरा स्वतःच्या ओंजळणीत घेतला. ओघळणारे अश्रू पुसून त्याने तिला जवळ घेतलं. '' शांत हो. मी का रागवेन तुझ्यावर? तुझी यात काहीच चूक नाही. तिचा गैरसमज झाला. कारण तिच्यासमोर पुरावे होते.''     ''मी हि गोष्ट आधी सांगायला पाहिजे होती. आधी तुझ्या कानावर घालायला पाहिजे होती. मी प्रयत्नही केला होता पण राहून गेलं.'' भूमी     ''काही राहून गेलं नाही. मला सगळं आधीपासूनच माहित होत. आत जाऊया, एवढ्या रात्री इथे बाहेर बरं दिसत नाही.'' क्षितीज तिला म्हणाला.     ''सॉरी माझ्या लक्षात नाही आलं. तू आत ये ना. फ्रेश हो, मग बोलूया आपण.'' भूमी त्याला घेऊन आतमध्ये आली.     ''नको इथेच अंगणात थांबतो, तुझे नाना- माई असतील ना?'' क्षितीज   ''त्यांना कल्पना आहे तू येणार ते. आत्ताच ते झोपालेत, नाही उठवलं तरी चालेले, ये आत. मो पाणी आणते.'' म्हणत भूमी आत जायला वळली. क्षितिजही आतमध्ये गेला.     *****   फ्रेश होऊन, थोडं खाऊन ते दोघेही अंगणात बसून बोलत होते. ''तुला माझ्या आणि विभासच्या लग्नाबद्दल कसं काय माहित?'' भूमी विचारत होती.   ''चंदीगढला असताना तुझ्या अपघाताच्या दुसऱ्या दिवशी मी तुझ्या रूममध्ये आलो होतो, तेव्हा तू फोनवर माईंशी बोलत होतीस. आठवतंय? रूमचा दरवाजा चुकून उघडच राहिला होता. फोनवर बोलून झाल्यावर तू स्वतःशीच बडबड करत राहिलीस. आणि तुझ्या आणि विभास बद्दल सगळं बोलून गेलीस. तेव्हाच मी हे ऐकलं होत.'' क्षितीज   ''तुला आधीपासूनच माहित होत हे?'' क्षितीज   ''होय, पण माझ्यासाठी हि गोष्ट फार महत्वाची कधीच नव्हती. त्यामुळे मी तो विषय तुझ्यासमोर काढला नाही. आणि तुला याचा किती त्रास होत असेल याची मला पूर्ण कल्पना आहे, त्यामुळे  तू सांगण्याचा प्रयत्न केलास तेव्हा टाळाटाळ केली.'' क्षितीज   ''आणि तरीही तू ...'' भूमी काय बोलणार हे क्षितिजला माहित होत तिला थांबवत तो म्हणाला. ''बघ, लग्न म्हणजे एक टॅग असतो, त्यापलीकडे काहीही नाही. मग ते लग्न करून त्या नवरा-बायकोमध्ये काय नातं आहे? काय गोष्टी घडतात? का लग्न होऊनही ते विभक्त आयुष्य जगतात? याचा विचार लोक करत नाहीत. लग्न झाल्यावरही काही नवरा-बायकोमध्ये लग्नाचा कोणताही संबंध नसतो. तरीही लोकांच्या दृष्टीने ते लग्नच. आणि त्याच्या उलट लग्न न करता एखाद प्रेमी जोडप आपल्या सगळ्या मर्यादा ओलांडून जवळ आलेले असतं. लग्न न करताही त्यांच्यामध्ये सगळ्या प्रकारचे संबंध असतात. पण लोकांना हि गोष्ट माहीतच नसते. भविष्यात तो मुलगा किंवा मुलगी दुसऱ्याच कोणाशी तरी लग्न करून आपापले वेगळे मार्ग निवडता. पण यावर कोणीही  आक्षेप घेत नाही. कारण हा आपला समाज आहे.''   ''बरोबर, पण या गोष्टीचा तुझ्यासारखा अश्या वेगळ्या पद्धतीने विचार करणारे खूप कमी असतात.'' भूमी   ''असतात ना. पण बोलून दाखवण्याचं किंवा काबुल करण्याचं धाडस कोणामध्ये नसत. माझं आणि मैथिलीच्या अफेअर होत. आमच्यामध्ये काय गोष्टी घडल्यात किंवा आम्ही किती मर्यादा ओलांडल्या होत्या. यावर तू मला कधीच काहीही प्रश्न विचारला नाहीस. तुला आपलं नातं सुरु करताना माझा भूतकाळ मध्ये आणावा असं नाही वाटलं. त्याला तू तेवढं महत्व नाही दिलंस. म्हणजेच असा वेगळा विचार करणारी माणस असतात.'' क्षितीज   ''लग्न होऊनही विभासची बायको न झालेली मी, आणि लग्न न करत मैथिलीच्या जोडीदार झालेला तू, काय भूतकाळ आहे ना आपला. किती फरक असतो ना नात्यांमध्ये. दोन वेगळ्या नात्यांची वेगळी भाषा आहेत.'' भूमी   ''राग मनू नको पण, मला लग्न वगैरेवर काही विश्वास नाहीय. आयुष्यभर एकमेकांची साथ महत्वाची, एकनिष्ठता महत्वाची आणि विश्वास महत्वाचा. नाहीतर तीन वेळा लग्न करूनही एकटीच राहणारी माझी आज्जो बघ. तिच्या आयुष्यात कधीच खुश नाही. तरीही अजून चोथ्या लग्नाच्या तयारीत आहे.'' क्षितीज   ''विश्वास माझा पण नाहीय, होता, विभासने त्याची व्याख्याच बदलून टाकली. पण होय, सगळ्यांच्या बाबतीत होत नसले तरीही, समाजात समाधानाने जगायचं असेल तर बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड बनून राहणं अवघड असत, लोक जगू देत नाहीत.  त्यापेक्षा रोज एकमेकांच्या चुका काढत, मर-झोड करत आला दिवस ढकलणाऱ्या नवरा-बायकोला जास्त मन मिळतो इथे.'' भूमी   ''डोन्ट वरी, आय प्रॉमिस यु. आपलं लग्न झालं तरीही आणि नाही झालं तरीही हे असं काहीही आपल्यामध्ये होणार नाही.'' क्षितीज   ''जे नशिबात असेल ते होईल. जन्मजात भाळी लिहिलेले नक्षत्रांचे देणे असते, ते आपल्याला मिळणारच. ना कोणते बंधन, ना कोणता करार, ना शपथ, मला फक्त तुझी साथ हवीय, मग ती कोणत्याही परिस्थितीत असो.'' भूमी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली. 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!