नक्षत्रांचे देणे ३४

By siddhic on from https://siddhic.blogspot.com

'मिस्टर सावंतांच्या सांगण्यावरून बाहेर टफ सिक्युरिटी ठेवण्यात आली होती. मीडिया आणि बाकीच्यांना चुकवून क्षितीज कसाबसा कंपनीत पोहोचला होता. त्याने पळत येऊन भूमीची केबिन गाठली. ''सॉरी, एक्सट्रीमली सॉरी. मला यायला उशीर झाला.'' क्षितीज   ''मला घरी जायचं आहे. सो प्लिज तेवढी हेल्प पाहिजे.'' क्षितिजला पाहून हाताचा आधार देत भूमी सावकाश उठली. आपली बॅग आणि मोबाइल दुसऱ्या हाताने पकडून ती उभी राहिली. तिचा तोल जातोय हे क्षितिजला समजलं. त्याने आपल्या हाताचा आधार देत तिला पुन्हा बसवलं. ''तुला उठता येत नाहीय, थोडावेळ बस इथे. बरं वाटत नाहीय का?''   ''मी ठीक आहे. मला घरी जायचं आहे.'' पुन्हा खुर्चीवर बसत भूमीने डोक्याला हात लावला. डोकं फारच दुखत होत. ताण तिच्याने सहन होईना. तिच्या हातातली पर्स आणि मोबाइल खाली गाळून पडला होता. तिने दोन्ही हातांनी आपलं दोन दाबून धरलं होत.   ''तुला आरामाची गरज आहे, आणि डॉक्टरचीही. मी काहीतरी करतो. वेट.'' खुर्चीजवळ खाली बसत त्याने बाजूचा पाण्याचा ग्लास तिच्या तोंडाला लावून त्याने थोडं पाणी हाताने तिच्या चेहेऱ्यावर शिंपडलं. भूमीला काहीही जाणवत नव्हते. तिची शुद्ध हरपत गेली आणि दुसऱ्याच क्षणी ती खुर्चीतून खाली कोसळली. क्षितीज समोर होता, त्यामुळे ती पडता -पडता वाचली.  तिला उचलून त्याने बाजूच्या सोफ्यावर ठेवले. शिपाया सांगून तिची पर्स आणि इतर साहित्य खाली पार्किंगमध्ये असणाऱ्या गाडीमध्ये ठेवून घेतली. आणि तिला उचलून गाडीमध्ये घेऊन तो हॉस्पिटलकडे निघाला.'   'हॉस्पिटलमध्ये चेकअप करून झाले होते. 'अतिताणामुळे डोकेदुखी असावी आणि जास्तवेळ उपाशी राहिल्यामुळे तिला अशक्तपणा जाणवत होता.' असे डॉक्टरने सांगितले. ती आता शुद्धीवर आली होती. क्षितीज तिच्याजवळ बसून होता. त्याच्या हातात असणाऱ्या तिच्या हाताची थोडी हालचाल झाली. तिने उठण्याचा प्रयन्त केला. डॉक्टरांनी थोडे दिवस आराम करायला सांगितले. 'आता तिची तब्ब्येत ठीक आहे. घरी जाऊ शकता. काही नॉर्मल टेस्ट केल्या आहेत. त्याचे रिपोर्ट काही दिवसात येतील, ते तेवढे न्यायला या.'  असे सांगून ते निघून गेले. तिला हाताचा आधार देऊन क्षितीज घरी जायला निघाला. तिची या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत. असे त्याला सारखे वाटत होते. भूमी मात्र गाडीमध्ये मागच्या सीटला डोकं टेकून शांत पडून राहिली होती.'   त्याचा केविलवाणा चेहेरा बघून तिला राहवेना. शेवटी आपला उजवा हात त्याच्या डाव्या हातावर हळुवारपणे ठेवून ती म्हणाली. ''क्षितीज मी ठीक आहे. जास्त ताण घेतला त्यामुळे चक्कर आली.''   ''सॉरी हनी। खरंच, मला माहित नव्हतं असं काही होईल. SK ग्रुपचे मालक आहेत पप्पा. त्यांचं स्टेट्स आहे तसं. त्यामुळे हे लोक मागे लागलेले असतात.''  क्षितीज  म्हणाला.   ''असो, आपली कोणाचीच काही चुकी नाही. अश्या बातम्या लीक होतात. पण ते मीडियावाले दिवसभर कंपनीच्या रिसिप्शनला बसून होते. त्यामुळे मला जास्त त्रास झाला.'' भूमी डोळे मिटून बोलत होती.   '' याबाबतीत माझ्या घरी थोडी काळजी घ्यायला पाहिजे होती. ते झालं नाही, म्हणून हा प्रॉब्लेम झाला.  सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. एवढा त्रास करून घेत जाऊ नकोस.'' क्षितीज   ''होय, हे मीडिया, न्यूज आणि बाकी हे सगळं नवीन आहे माझ्यासाठी, माझ्या बाबतची पहिलीच वेळ आहे. म्हणून जास्त त्रास झाला.'' भूमी   ''प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफ थोडी वेगळी ठेव. यापुढेही असं काही झालं तर ऑफिसला येत जाऊ नकोस. तसही आता पप्पांची होणारी सून आहेस तू, त्यामुळे ते काहीही बोलणार नाही.'' क्षितीज   ''येस, एव्हाना सगळं जगजाहीर झालाय.'' भूमी   ''दिवसभर तू काहीच खाल्लेलं नाहीस. असं डॉक्टर म्हणाले.'' क्षितीज   ''मूड नव्हता. काही खायची इच्छा होईना.'' भूमी   ''घरी गेल्यावर आधी खाऊन घे. घरी जेवण असेल कि खाली ऑर्डर करू?'' क्षितीज   ''नाही, मावशी जेवण बनवून जातात.'' भूमी   ''ओके, रिलॅक्स राहा. थोडावेळ डोकं टेकून  झोप आरामात. पोहोचल्यावर उठवतो मी.'' तिचा सीटबेल्ट लावत तो म्हणाला. आणि ''हो.'' बोलून ती तशीच डोळे मिटून झोपी गेली.   *****   ''हॅलो क्षितीज कशी आहे ती आता?'' पलीकडून मेघाताई विचारत होत्या.   ''आधीपेक्षा ठीक आहे. तिला घरी सोडून मी निघतोय.'' क्षितीज   ''तिची ती मैत्रीण तिच्यासोबत आहे ना?'' मेघाताई   ''नाही, ती बाहेरगावी गेली आहे.'' क्षितिज   ''मग, तिला इकडे घेऊन ये ना. एकटीला सोडणं बरं नाही. पुन्हा चक्कर वेगैरे आली तर?'' मेघाताई   '' मला सुद्धा तेच टेंशन आलय. ती आपल्या घरी येईल असं वाटत नाही.''  क्षितीज   ''तू तिथे थांबतोस का? बघ तिला विचारून. गरज असेल तर थांब, तुझ्या पप्पांना समजावते मी.'' मेघाताई   ''बघतो, चल बाय.''   ''काहीतरी खाऊन घे. सकाळपासून उपाशी आहेस.'' मेघाताई   ''होय. तू जेवून घे. माझी वाट बघत बसू नको.''  क्षितीज   ''होय, बाय.'' म्हणत क्षितिजच्या आईने फोन ठेवला होता. फोन ठेवून क्षितीज मागे वळला. भूमी तिथेच मागे उभी होती. तिने दोघांचं सगळं बोलणं ऐकलं होतं.   ''मी अगदी व्यवस्थित आहे पण रात्र खूप झाले. आपण जेवून घेऊया.'' म्हणत तिने जेवण वाढायला घेतले. प्लेट्स लावून झाल्यावर एक नॅपकिन हातात देत ती म्हणाली. ''फ्रेश होऊन ये.'' तो शांतपणे तिच्याकडे बघत होता. ‘काय’ म्हणून तिने मानेने खून करून विचारल्यावर तो म्हणाला, ''एका क्षणासाठी तर पार घाबरलो होतो मी, नक्की तुला काय झालं होत ते कळेना. काय करावं ते हि कळेना.''   ''मला सुद्धा नीटस काही आठवत नाहीय पण त्यावेळी माझ्यामध्ये उठण्याची अजिबात शक्ती नव्हती. अक्षरशः तू येईपयंत मी स्वतःला होल्डवर ठेवलं होत. असं सहसा केव्हा होत नाही.'' भूमी   ''आता ठीक वाटतेस, जेवून आठवणीने मेडिसिन्स घे आणि शांत झोप. तुला काही दिवस आरामाची गरज आहे. सो, नो ऑफिस, नो काम, नो स्ट्रेस...  पप्पानाशी बोललोय मी.'' तो तिच्या डोक्यावर स्वतःच दोन टेकवत म्हणाला.      ''होय... होय. समजलं. आधी जेवून घेऊया का?'' भूमी   ''तू जेव आरामात, मी निघतोय.'' क्षितीज   ''जायलाच पाहिजे का?'' क्षितीज   ''मला काही प्रॉब्लेम नाहीय, तुला कोणी काही बोलायला नको. सोसायटीमध्ये लोक चर्चा करतात.'' क्षितीज   ''इथे कोणाला तेवढा वेळ नसतो, आणि आपली एंगेजमेंट झालीय. एवढा विचार करण्याची गरज नाहीय.'' म्हणत भूमी जेवण लावून खुर्चीवर बसली. काहीतरी विचार करून क्षितिजही फ्रेश होऊन जेवायला बसला. ''निधी केव्हा येणार आहे?'' क्षितीज   ''तिचं काहीच कन्फर्म नसतं. लहरी खात आहे. हल्ली कशीही वागतेय ती, त्यामुळे मला काळजी वाटते तिची.'' भूमी   ''ती कशीही वागली तरीही तिचं स्वतःच्या वागण्यावर कंट्रोल आहे. नाहीतर तू, विनाकारण गोष्टी मनाला लावून घेतेस आणि त्रास करून घेतेस. नको तिथे एवढा विचार करत बसू नको.  '' क्षितीज   ''काय गोळी असते का? विचार न करण्यासाठी.'' भूमी   ''कायपण.'' क्षितीज   ''असणार. त्याशिवाय काही लोक एवढे शांत राहू शकतात. काहीही होवो. अगदी शेजारी भूकंप होऊदेत, हे आपलं गालातल्या गालात हसत बसायचं. कसं काय जमत असेल बुवा?'' भूमी त्याला चिडवत होती.   ''तू मला बोलतेस ना. मला माझा मूड, माझ्या फिलिग्स चेहेऱ्यावर नाही दाखवता येत. शांत राहायची सवय झाले. पण ते फक्त वरवर असत.'' क्षितीज   ''थँक्स...'' भूमी त्याच्याकडे बघत म्हणाली.   ''जेवा मॅडम. नुसतं बघत बसणार आहेस का? माझं झालं.'' म्हणत तो उठून बाहेर निघून गेला. घरून फोन आला होता. विचारपूस करून त्याने तो ठेवला. भूमी किचनमध्ये जाऊन आवराआवर करू लागली. 'माई-नानांना भेटून आलं पाहिजे. नाहीतर फोन करून क्षितीज बद्दल कालावल पाहिजे. त्यांना अचानक आमच्या  एंगेजमेंट ची बातमी समजली तर वाईट वाटेल. त्याआधी त्यांच्या कानावर काही गोष्टी घालाव्या लागतील.' या विचारात ती होती.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!