नक्षत्रांचे देणे ३३

By siddhic on from https://siddhic.blogspot.com

 ‘आज्जो आणि मिस्टर सावंत यांनाही मैथिली तितकीशी आवडत नव्हती. त्यामुळे ते दोघेही काहीही बोलले नाहीत. आता मैथिलीशी तसाही त्याचा काहीही संबंध नव्हता. तिचे खरे रूप सगळ्यांच्या समोर आलेले होते. तरीही  मैथिली शुद्धीवर आल्यावर माझ्या आयुष्यात वादळ येईल, असे घरच्यांना का वाटते? याचेच क्षितिजला नवल वाटत होते.  'यापुढे कोणताही निर्णय आम्हा दोघांना विचारल्याशिवाय घेत जाऊ नका.' असे क्षितिजने घरच्यांना बजावले होते. या विषयी भूमीशी बोलल्याशिवाय त्याला राहवेना म्हणून त्याने फोन लावला. पलीकडून तिने फोन उचलला होता.’ ''हॅलो.'' भूमी   ''हाय, झोपली नाहीस अजून?'' क्षितीज   ''नाही, जस्ट फ्रेश झाली. झोपतेच आहे.'' भूमी   ''पार्टीमध्ये जे झालं त्यासाठी सॉरी.'' क्षितीज   ''ठीक आहे. कोणीही आपल्याला गृहीत धरलेलं मला नाही आवडतं. म्हणून थोडं वाईट वाटलं.'' भूमी   ''सेम हिअर, मला पण ते नाही आवडलं. आईने सांगितलेलं कारण तर अगदीच नॉर्मल आहे.'' क्षितीज   ''कारण म्हणजे?'' भूमी   ''या विषयी उद्या बोलू आपण. उद्या ऑफिसला येणार आहेस?'' क्षितीज   ''होय, याव लागेल. चंदिगढ केस खूप गुंतागुंतीची होत चालली आहे. थोडं डिस्कशन करण्याची गरज आहे.'' भूमी   ''गुड, पप्पांशी बोलून बघ, ते काहीतरी मदत करतील.'' क्षितीज   ''येस, बाय द वे या रिंग्स कोणी पसंत केल्या?'' भूमी तिच्या हातातल्या अंगठीकडे बघत होती.   ''मी.'' क्षितीज पटकन बोलून गेला.   ''म्हणजे? आधीच बनवल्या होत्या? कि कसं?'' भूमी आश्चर्याने विचारत होती.   ''आज्जोला ज्वेलरीची खूप आवड आहे. तिच्याबरोबर मागे खूप दिवसांपूर्वी कोलकात्याला एका डायमंड शॉपमध्ये गेलो होते. तिथे या रिंगच्या डिझाइन्स पहिल्या. मला खुपा आवडल्या होत्या. हा जोड आहे, दोन्ही एकत्र घ्याव्या लागतात. आई-पप्पाना गिफ्ट द्यायला म्हणून या रिंग घेऊन घरी आलो, त्यांना दोघांनाही आवडल्या पण साईझ बसेना. नंतर पुन्हा कोलकात्याला जाणे झाले नाही.  मला त्या दोन्ही फारच आवडलेल्या त्यामुळे आईनी जश्याच्या तश्या तिच्याकडे ठेवून घेतल्या. ती एवढ्या दिवसांनी त्या रींग्सचा वापर आपल्यासाठी करेल, असं वाटलं नव्हतं.''  क्षितीज बोलत होता.   ''सो स्पेशल आणि युनिक डिझाइन्स आहेत. आवडली मला. छान चॉईस आहे.'' भूमी   ''युनिक माणसासाठी युनिक डिझाइन. माझी चॉईस असतेच युनिक.'' क्षितीज   ''मग दोन्ही रींग्स तुम्ही केल्या तर मी आता काय करायचं?'' भूमी   ''तू काहितरी केलं पाहीजेस, असं काही नाही. सध्यातरी थोडं रिलॅक्स राहा. गाडीमध्ये मला खूप डिस्टर्ब वाटलीस. चिल, पुन्हा असं नाही होणार.'' क्षितीज   ''होय, ठीक आहे मी आता आणि गाडीमध्ये माझं डोकं खूप दुखत होतं त्यामुळे सुद्धा मी थोडी शांत होते.'' भूमी   ''एवढा स्ट्रेस घेतल्यावर दुसरं काय होणार.'' क्षितीज   ''स्ट्रेसच माहित नाही पण ते चंदिगढला डोक्याला अपघात झाल्यापासून दुखत असं मध्येच.'' भूमी   ''काळजी घे. डॉक्टरकडे दाखव जरा.'' क्षितीज   ''होय.'' भूमी   ''ओके, उद्या बोलूया, यु नीड टू रेस्ट.'' क्षितीज   ''गुड नाईट.'' भूमी   ''लव्ह यु अँड गुड नाईट.'' क्षितीज   ''बाय.'' म्हणत भूमीने फोन ठेवला होता. असच खूप वेळ बोलत राहावं असं तिला वाटत होतं. आता ती थोडी रिलॅक्स झाली होती.  खूपच स्ट्रेस घेतोय याची जाणीव तिला झाली.   ***** 'भूमी आणि क्षितिज यांच्या नात्यावर शिक्का मोर्तब झाला होता. कोणीतरी पार्टीमध्ये घडलेली घटना लीक केली होती. पेपर आउट झालेली हि न्यूज बघून विभास हडबडला. माई-नानांना यातील कशाचीही पुसटशी कल्पना नव्हती.  भूमी बद्दल थोडी माहिती मिळाल्यावर तो तिला शोधण्यासाठी निघाला होता. त्याच्या डोक्यात आता वेगळाच प्लॅन शिजत होता. एकतर भूमी आपल्या आयुष्यात यावी नाहीतर तिने नानांची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावे करून द्यावी. यासाठी तो वाट्टेल त्या टोकाला जायला तयार होता.'   'सकाळी सकाळी ऑफिसमध्ये सगळ्यानच्या नजर आपल्याकडेच वाळलेल्या आहेत हे भूमीला लक्षात आलं. एंगेजमेंटची न्यूज लीक कोणी केली आणि का? याच्या विचाराणे ती आधीच वैतागली होती. त्यात भर म्हणून हे ऑफिस मधले बघे. तिची नुसती चिडचिड होत होती. क्षितिजला भेटून विचारावे तर तोही कुठे दिसत नव्हता. हातात असणाऱ्या केसाच्या फाइल मध्ये डोकं खुपसून ती नुसतीच बसून राहिली.'   'क्षितीज आणि मिस्टर सावंत यांनी ताबडतोप मीडियाशी संपर्क साधला आणि हि बातमी त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचवली याची चौकशी केली. मीडियाकडून काही खास प्रतिसाद मिळाला नाही, उडवा उडवीची उत्तरे येत होती. क्षितीजच टेन्शन वाढत चाललं होतं. ‘रात्री कसतरी भूमीला समजावलं होतं, त्यात पुन्हा आज हा नवा गोंधळ कसा निपटावा त्याला कळेना. 'काहीतरी सोल्युशन काढू असे सांगून क्षितिजचे पप्पा बाहेर निघून गेले.जाताना त्यांनी क्षितिजला सूचित केलं होतं. '’भूमीला फोन करून फायदा नाही आणि ऑफिसमध्ये आलास तर मीडियावाले पुन्हा मागे लागतील, 'कंपनीखाली मीडियाची माणसे थांबलेली असणारच त्यांना उत्तर देत बसण्यापेक्षा घरीच राहा.'' त्यामुळे तो घरी थांबला. तरीही त्याने फोन करून भूमीला परिस्थितीची कल्पना दिली आणि मीडियावाले मागे लागण्याची दाट शक्यता असल्याने, मी तिथे आल्याशिवाय एकटीने कंपनीबाहेर  पडू नको, असे सांगितले. साहजिक होत  ती आता काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती.   ***** 'शहरात आल्यापासून विभासने भूमी काम करत असलेल्या कंपनीचे नाव, त्याचा मालक, तसेच क्षितिज आणि S K ग्रुप बद्दल बरीच माहिती मिळवली होती. आता भूमीला कसे अडकवता येईल यासाठी तो संधीच्या शोधात होता. निधी आणि भूमी एकत्र राहतात हे विभासला माहित झाले होते, निधीचा कॉन्टॅक्ट मिळवून त्याने    तिच्याशी फोन संपर्क साधला, अजून काही माहिती मिळते का ते पहिले. ती बाहेर गावी होती. तिने त्याला काहीही न सांगता भूमीशी संपर्क केला आणि तिला याची गोष्टीची कल्पना दिली. भूमीने तिला घडलेली हकीकत सांगितली त्यावर तिचा विश्वास बसेना. भूमी आणि क्षितिजची एक साधीशी एंगेजमेंट झाली हि गोष्टी तिच्यासाठी आनंदाची होती. पण त्यानंतर हि बातमी मीडिया लीक होणे आणि मेघाताई म्हणजेच क्षितिजच्या आईचे असे अनपेक्षित वागणे तिलाही पटलेले नव्हते. दोन दिवसांनी मी तिथे आल्यावर बोलू असे सांगून ने भूमीला काळजी घायला सांगितली.'   'विभास आता इथे का आला आहे? आणि तो माझा शोध का घेतोय? हे भूमीला कळेना. मुखर्जी केबिनमध्ये येऊन तिच्याशी क्षितीज आणि तिच्या एंगेजमेंट बद्दल चौकशी करत होते. वेदांतही अभिनंदन करण्याच्या बहाण्याने येऊन मध्ये-मध्ये डिस्टर्ब करत होता. आता तिला ऑफिसच्या केबिन बाहेर पडण्याची सुद्धा इच्छा होईना. ऑफिसने सीक्यूरीटी दिली होती त्यामुळे विशेष काही त्रास झाला नाही पण क्षितीज तिला एकटीला असं पब्लिकमध्ये सोडून स्वतः घरी बसलाय. हे तिला आवडले नव्हते.  कधी एकदा घरी जाते याची ती वाट बघत होती.'   'का मी त्याला हो म्हणाले? उगा मनस्ताप ओढवून घेण्यापेक्षा आपलं रोजच एकटं जगणं बरं होत.' असे तिला वाटले. लोकांच्या नजरा, मीडियावाले आणि ऑफिसमधले बघे यांचा तिला प्रचंड राग येत होता.  संध्याकाळ होऊन गेली होती. ऑफिस सुटून सगळा स्टाफ घरी निघाला. अजूनही क्षितीज आलेला नाही . तिला एकटीने बाहेर जाणे शक्य नव्हते. त्यामुळे वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. क्षितिजच्या आई-पप्पांचा फोन येऊन गेला होता. काळजी करू नकोस तो ऑफिसमध्ये तुला न्यायला येतोय. असे ते म्हणाले. म्हणून भूमीला थोडंफार बरं वाटलं. दिवसभर चिडचिड, स्ट्रेस याने डोके दुखी जरा जास्तच वाढली होती. काहीही खाल्लेले नसल्याने तिला उभे राहणेही शक्य होईना. सकाळपासून खूप ताण सहन केल्याने तिची कंडिशन नाजूक होत चालली होती. समोरच्या टेबलवर डोकं ठेवून ती शांत पडून राहिली. कोणत्याही क्षणी चक्कर येऊन खाली पडली असती.'  
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!