दिवाळी अंक २०१९ साठी जनमानस चाचणी
By gmjyotish on ज्योतिष from https://gmjyotish.blogspot.com
मराठी भाषा, दिवाळी आणि दिवाळी अंक याचे अतुट नाते आहे. महाराष्ट्रात दिवाळी अंकाची मोठीच परंपरा आहे. गंभीर वैचारिक विषय, राजकारण, धार्मिक, आरोग्य, भटकंती, ज्योतिष, पाककृती, सौंदर्यप्रसाधने, विनोद आदी विषयांना वाहिलेले दिवाळी अंक आहेत. स्वत:चे वेगळे वैशिष्टय़ राखून असलेले दिवाळी अंकही आहेत.यात ज्योतिष विषयावर दिवाळी अंक आपली स्वतंत्र परंपरा राखून आहेत. यातून नविन संशोधन, केस स्टडीज, राशीभविष्य तसेच एक वर्षापेक्षा जास्त काळ एका राशीत असलेले ग्रह राशी बदलून पुढील राशीत जातात त्याचे राशीनुसार परिणाम जाणण्यामधे अनेकांना आवडते.दिवाळी अंक दोन अडचणी ने ग्रासलेला आहे. पहिली अडचण प्रिंट कॉपीची वाढती किंमत. दुसरी प्रिंट कॉपी वाचणारा वर्ग कमी होत जाणे. या दोन्ही समस्यांवर नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक परीणाम कारक उपाय सुरवातीपासून शोधून आहे. नक्षत्रप्रकाश चा अंक सुरवातीच्या म्हणजे २०१६ पासून ब्लॉगवर उपलब्ध आहे. काही नाममात्र कॉपी आपण प्रिंट कॉपी प्रकारात छापत असतो. याचा उद्देश अंकाचे प्रकाशन करण्याचा कार्येक्रम हा असतो.२०१८ साली नाममात्र देणगी मुल्य स्विकारुन प्रिंट कॉपी ५० च्या वर वाचकांना पोचवली गेली.आजवर उपलब्ध असलेल्या अंकांच्या लिंक येथे उपलब्ध आहेत.१. नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक २०१६ https://www.gmjyotish.tk/p/blog-page_16.html२. नक्षत्रप्रकाश वासंतीक अंक २०१७ https://www.gmjyotish.tk/p/blog-page_25.html३. नक्षत्रप्रकाश वर्षपुर्ती विशेषांक २०१७ https://www.gmjyotish.tk/2018/07/blog-post.html४. नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक २०१८ https://www.gmjyotish.tk/p/blog-page_27.htmlहा फोटो मागील वर्षी प्रसिद्ध झालेल्या अंकाचा आहे.हा अंक कसा असावा हे जाणून घेण्यासाठी एक सर्वे घेत आहे. ह्या सर्वे मधे फ़क्त पाचच प्रश्न आहेत यामुळे आपण पाचच मिनीटे द्या म्हणजे अंक त्या पध्दतीने परिपुर्ण करण्याचा प्रयत्न राहील.दिवाळी अंक दिवाळीच्या आधी म्हणजेच २६ अक्टोंबर २०१९ पुर्वी प्रसिध्द करण्याचा प्रयत्न आहेच.आपण खालील लिंक क्रोम ब्राऊझर मधे उघडून प्रतिसाद द्या ही विनंती. https://forms.gle/wrjSK9XmWa2iytYm9आपण जर जनमानस चाचणी अर्थात इंग्रजीतला ( सर्व्हे ) ला प्रतिसाद दिलात तर येणारानक्षत्रप्रकाश अंक संग्रहणीय होईल यात शंका नाही.