दमलेल्या बाबाची ही कहाणी..

By djsaurabhk on from www.sadhsopa.com

कोमेजून निजलेली एक परीराणी, उतरलेले तोंड, डोळा सुकलेले पाणीरोजचेच आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरी मला तोंड नाहीझोपेतच घेतो तुला आज मी कुशीत, निजेतच तरी पण येशील खुशीतसांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला !आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारीरोज सकाळीस राजा निघताना बोले, गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेलेजमलेच नाही काल येणे मला जरी, आज परी येणार मी वेळेतच घरीस्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्याखुऱ्या परी साठी गोष्टीतली परीबांधीन मी थकलेल्या हातांचा झुला, दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला !ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडूनतास-तास जातो खाल मानेने निघून, एक-एक दिवा जातो हळूच विझूनअशा वेळी काय सांगू काय काय वाटे, आठवांसोबत पाणी डोळ्यांतून दाटेवाटते की उठुनिया तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही पुन्हा लहानगे व्हावेउगाचच रुसावे नी भांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशीउधळत, खिदळत, बोलशील काही, बघताना भान मला उरणार नाहीहासुनिया उगाचच ओरडेल काही, दुरूनच आपल्याला बघणारी आईतरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असा, क्षणा क्षणावर ठेवू खोडकर ठसासांगायची आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला !दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई, मऊ मऊ दूध-भात भरवेल आईगोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशीकुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काही, सदोदित जरी का मी तुझ्या पास नाहीजेवू-खाऊ न्हाऊ-माखू घालतो ना तुला, आई परी वेणीफणी करतो ना तुलातुझ्यासाठी आई परी बाबा सुद्धा खुळा, तो ही कधी गुपचूप रडतो रे बाळासांगायची आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला !बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भातआई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबालुटूलुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, दूरचं पहात राहिलो फक्त, जवळ पहायचंच राहिलंअसा गेलो आहे बाळा पुरा अडकून, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरूनअसा कसा बाबा देव लेकराला देतो, लवकर जातो आणि उशिरानं येतोबालपण गेले तुझे गुज निसटून, उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळी मधूनजरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसेतुझ्या जगातून बाबा हरवेल का ग ? मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग ?सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये, बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये ?
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!