तो आणि पाऊस - मराठी कविता
By jyubedatamboli on मन मोकळे from https://jyubedatamboli.blogspot.com
तो आणि पाऊस - मराठी कविता✍️ ज्युबेदा तांबोळीफोटो साभार: गूगलतो नि पाऊस दोघे समानएक मोठा दुसरा थोडा लहान।दोघेही धो धो बरसतातप्रेमसरींनी चिंब भिजवतात।कधी जोरजोरात गडगडतातसुखद वर्षावाने तृप्त करतात।एकाला चिंता साऱ्या जगाचीदुसऱ्याला काळजी कुटुंबाची।एकाला म्हणावे घननीळादुसऱ्याला वदावे लेकुरवाळा।त्यांच्यामुळे येई जीवना अर्थतुम्हाविना जीवन होई व्यर्थ।करता तुम्ही सृष्टी हिरवीगारआनंदे नाचे सारा परिवार।कधी तुम्ही जाता फार दूरदूरमनाला लावता फारच हुरहूर।सर्वांना वाटतो तुमचा आधारतुम्हाविना सारेच निराधार।अचानक येता फारच दाटूनखेद मनी येई भरभरून ।तुम्हा दोघांची छानच गट्टीनका करू आमच्याशी कट्टी।