तांदळाची बोर विथ सम गपशप

By siddhic on from https://siddhic.blogspot.com

' आजकाल धावपळीच्या युगात दिवाळीचा फराळ घरी करणे म्हणजे फारच अवघड काम. बाजारात वेगवेगळ्या दरांमध्ये हेच पदार्थ सहज उपलब्ध आहेत, त्यामुळे सध्या विकतचेच गोड मानुन दिवाळी साजरी करण्याचा ट्रेंड आहे . पुर्वी घरच्याघरीच ४-५ पदार्थ तरी सहज बनवले जायचे आणि एवढ करुन देखिल ' यंदा जास्त काही करता आल नाही हो.. ' अशी खंत मनात बाळगणार्‍या गृहीनी अश्या फराळाच्या रंगतदार गोष्टी चविचविने सांगत. आजकालच्या स्त्रिया घर आणि ऑफीस दोन्ही सांभाळताना तारेवरच्या कसरती प्रमाने जीवनाची कसरत करत जगतात, तर हे सगळे पदार्थ करण्यासाठी आपल्याकडे किती वेळ असणार म्हणा .... काही घरात मात्र अजुनही काही पदार्थ केले जातात. खुप सारे दिवाळीचे पदार्थ तर आजकालच्या मुलांना माहीतच नाहीत . असाच एक हरवलेला पदार्थ म्हणजे तांदळाची बोर.'एक आठवण - ' सगळा फराळ केला तरीही आजीने बोर केली नाहीत तर आजोबा खट्टु होऊन बसायचे. " यंदा दिवाळीला काय मजा नाही बुवा " हे त्यांचं ठरलेल वाक्य. " म्हातार्‍याना बोर पाहीजेत ना.... करते मग... माझ्या मागे कोण करणार आहे हे सगळ. हयात आहे तोपर्यंत करते." अस म्हणत मग आजी दिवाळी संपता-संपता तरी बोर करायचीच.' आता आजी पण राहीली नाही....आजोबाही गेले.... बोर ही कालवष झाली असच म्हणव लागेल. पण दरवेळेस दिवाळी आली की आजीची आठवण येते. आणि त्या आठवणीमध्ये बोराच स्थान अढळ .... मग मी एखादा शनीवार-रवीवार सगळ आवरुन बसते. आजीच्या आठवणी आणि बोर दोन्हीचा प्रपंच मांडून.... तर चला आज आठवणींची बोर करुया.***बोरासाठी तांदळाचं पीठ बनवण्यासाठीची कृती - इथे भाकरीसाठी वापरलेले पीठ न वापरता थोडे वेगळ्या प्रकारे बनवलेले पीठ वापरले जाते. स्वच्छ धुतलेले तांदुळा ४ तास भिजत घालायचे, मग व्यवस्थित निथळून घायचे . २-३ तास कडक उन्हामध्ये वाळवुन, जाड बुडाच्या पातेली मध्ये हलकेच खरपुस भाजायचे आहे. अजीबात काळे वगैरे करायचे नाहीत . थोडा दुधाळ रंग होई पर्यंत भाजावे. मगच दळणासाठी द्यायचे . आणि दळणार्‍याला द्यावयाच्या सुचनाही भारी असायच्या . " भाऊ जास्त बाईक करु नका हो. जास्त जाड ही नको. दुसरे कोणते धाण्य या दळणामध्ये मिक्स करु नका.... सेपरेटच दळा हो .... " काय आणि काय. बिचारा दळणारा... ' नक्की दळायच कस ' त्याच्या मनात प्रश्न येत असावा. एखादातर चटकन म्हणे , " वैनी तुम्हीच हे दळण करता का ? "   ***साहित्य- चार वाटी तांदळाचं पीठ, चार चमचे (टीस्पून) बारीक रवा , थोडे पांढरे तीळ , थोडी खसखस , २५० ग्रॅम गूळ , १ कप सुख \ओलं खोबरं , मीठ चवीपुरतं , तेल तळण्यासाठी , एक कप दुध..कृती- एक पातेलं गॅसवर ठेवा आणि ते थोडं तापलं की २-३ पेला पाणी घाला. त्या पाण्यात गूळ घालून तो पातळ करुन घ्या. यामध्ये तांदळाचं पीठ, रवा, तीळ, खसखस, खोबरं, मीठ , दुध हे सगळे घटक एकत्र करुन घ्या. हे मिश्रण थोड थंड झालं की मग हलक्या हाताने मळुन घ्यायचे . भाकरीच्या पीठाप्रमाने घट्टसर असेच मळून घावे . पातल करु नये.आता याचे लहान-लहान बोराच्या आकाराची गोळे करावे आणि मंद आचेवर तळावे . एका वेळेस आपण कढई मध्ये १०-१५ बोरे टाकुन तळू शकतो. त्यामूळे जास्त वेळ लागत नाही. जास्त करपू देऊ नयेत..टिप-* बोरं तळताना त्यांना थोडे तडे गेले पाहिजे तरच ते कुरकुरीत लागतात. म्हणजेच बोर थोडीशी फुटली पाहीजेत.* प्रत्येक पदार्थ करताना त्याच्या शी निगडीत कटू-गोड आठवणी मध्ये रमुन जा.... मग त्यामध्ये काही काही कमी-जास्त झाले तरी चालेल. त्याला जी चव येते ती पर्फेक्ट मेजरमेन्ट वापरुन केलेल्या पदार्थालाही येणार नाही. सिद्धि चव्हाण
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 4
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!